Submitted by सुधाकर.. on 26 July, 2012 - 05:47
नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.
पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.
सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.
आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.
ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.
कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.
-----------------------------------------------------------------------------
ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्याचा जीव वाचवणारा.
पश्च्यात = उद्देशीत व्यक्ती नसताना, मागुर्या. चेहर्याआड
-----------------------------------------------------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त! पाश्यात कोण माझी चेष्टा
मस्त!
पाश्यात कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.>> पाश्यात?
सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.>> वा!
आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.>> सुंदरच..
ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.>>
थँक्स .. बागेश्री.
थँक्स .. बागेश्री.
त्याला 'पश्चात' म्हणतात, आणि
त्याला 'पश्चात' म्हणतात, आणि असा लिहीला तरी गा गा ल येतो ना? जाणकार सांगतीलच
दुरुस्त केले. धन्यवाद.
दुरुस्त केले. धन्यवाद.
काहीकाही ठिकाणी बरी आहे.
काहीकाही ठिकाणी बरी आहे. पssssण .......एकंदर नाही हो आवडली ऑर्फीअस् जी.....:(

पुलेशु !!
छान
छान
मस्त गझल.. मला गझल करायला
मस्त गझल.. मला गझल करायला शिक्वा
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार