"हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)

Submitted by जिप्सी on 26 July, 2012 - 00:43

सराय रोहिला स्टेशनच्या धावपळीत जाम थकलो, नंतर थोड्या गप्पा मारल्या आणि आपआपल्या बर्थवर जाउन झोपी गेलो. सकाळी जाग आली आणि खिडकीतुन बाहेर पाहिले असता सुजलाम सुफलाम पंजाब राज्यातुन गाडी धावत होती. साधारण अर्ध्या तासाने पंजाबातील शेवटचे स्टेशन माधोपूर आले आणि काहिवेळातच बाजुला रस्त्यावर "काश्मिरमध्ये स्वागत आहे" अशा आशयाचा बोर्ड दिसला आणि आम्ही काश्मिरमध्ये पोहचल्याची चाहूल लागली. साधारण अर्धा-पाऊण तासातच गाडी जम्मुतवी स्टेशनवर पोहचली. स्टेशनबाहेर आलो. मी आणि अजय श्रीनगरला जाणार्‍या गाड्यांची चौकशी करण्यासाठी निघालो. येथे श्रीनगरला जाणार्‍या प्रायव्हेट गाड्यांची मोठी युनियनच आहे. तेथुनच तुम्हाला गाडी बूक करावी लागते (अर्थात रीतसर पावती मिळते). वैष्णोदेवीला जाणार्‍यांची भरपूर गर्दी असल्याने "कटराला" जाण्यार्‍या गाड्या फुल्ल होत्या. आम्ही ५०००रु. मध्ये पाचजणांसाठी क्वालिस गाडी बूक केली. सहजच विचारले कि श्रीनगरला जाण्यासाठी किती वेळ लागतो. उत्तर मिळाले १० ते ११ तास आणि ट्राफिक असेल तर अजुन!!!!! Sad

बॅगा गाडीत कोंबल्या, तेथील एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आम्ही श्रीनगरला निघालो. उंच डोंगर, खोल दरी आणि आमचा पायलट ड्रायव्हर. कश्मिर व्हॅलीचे दृष्य पाहण्यासाठी लाडात पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजुला बसलो होतो पण हा गाडी असा चालवत होता कि पहिल्या हॉल्टमध्ये गुपचुप मागे येऊन बसलो. त्याला दोन-तीनदा गाडी हळु चालवायला सांगितलेही. पण "साहब, गाडी धीरे चलाउंगा तो जवाहर टनलमें जाम लगेगा और देरी हो जायेगी". आम्ही गप्प. जीव मुठीत धरून आमचा तो प्रवास चालु होता. जम्मु ते श्रीनगर प्रवासात निसर्गाच रौद्र रूप पहायला मिळते.साधारण ९-१० तासातच त्याने आम्हाला श्रीनगरला पोहचवलं. Happy

आमच्या ऑफिसमधला उर्दू-कश्मिरी भाषांतर करणारा ट्रान्सलेटर मंजूर मलिक हा कश्मिरचाच स्थायिक असल्याने त्याने राहण्यासाठी गेस्टहाऊस आणि फिरण्यासाठी गाडी आधीच बूक करून ठेवली. श्रीनगरमध्ये तो आमचीच वाट पहात होता. या सहा दिवसात तो आमच्याच सोबत फिरणार होता. मंजूर हा अतिशय मितभाषी आणि कश्मिर युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहे. फ्रिलान्सर म्हणुन तो आमच्यासाठी ट्रान्सलेटरच काम करतो. स्थानिक कुणीतरी सोबत असल्यावर सफर जरा जास्तच चांगली होते याचा अनुभव उत्तरांचल भटकंतीमध्ये आला होताच.

आमचा सहा दिवसाचा प्लान असा होता:
पहिला दिवस - श्रीनगर
दुसरा दिवस - गुलमर्ग
तिसरा दिवस - सोनमर्ग
चौथा दिवस - पहलगाम
पाचवा दिवस - श्रीनगर पायी भटकंती, शॉपिंग इ.
सहावा दिवस - पॅकिंग आणि मुंबईकडे (विमानाने) परतीचा प्रवास
पहिला आणि पाचवा दिवस असे दोन दिवस मुद्दाम श्रीनगरसाठी राखुन ठेवले होते. पहिल्या आणि पाचव्या दिवशी श्रीनगरातील दल लेक, चार चिनार, सगळी मुघल गार्डन, हजरतबल मशिद, हरी पर्बत, परीमहल आणि शंकराचार्य मंदिर पाहिले.
कश्मिर म्हटले कि पहिल्यांदा आठवतो तो सुप्रसिद्ध "दल सरोवर". चला तर कश्मिरच्या या पहिल्या भागाची सुरूवात "दल सरोवरच्या" प्रचिंनीच करूया. दल सरोवर सुंदर आहे यात शंकाच नाही पण सध्या पाणवनस्पतींनी या सरोवराला विळखा घातलाय. आम्हीही गेलो तेंव्हा या पाणवनस्पती काढण्याचे काम चालुच होतो.
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
=======================================================================
=======================================================================

सोचो के झीलों का शहर हो
लहरों पे अपना एक घर हो

दल सरोवर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
हाऊसबोट
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
मिशन कश्मीर या चित्रपटाची शूटिंग या हाऊसबोटमध्ये झाली होती. Happy
प्रचि १८
दल सरोवरातील मार्केट
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
दल सरोवरातील सुप्रसिद्ध "चार चिनार"
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

=======================================================================
=======================================================================

क्रमशः (पुढिल भागात -"हुस्न-ए-कश्मीर" — श्रीनगर (मुघल गार्डन्स)

गुलमोहर: 

वॉव......सहीच्........काय सुंदर आहे अगदि अप्रतिम..... Happy

१ ला, २ रा आणि ३४ वा प्रचि तर सुरेख..... अतिसुंदर..... Happy

कारंज्याच्या बाजुने नाही घेतलेस फोटो .. ????>>>उदयन, असा फोटो पहिल्या भागात आहे. Happy म्हणुन इथे नाही टाकला.

मस्तच रे मित्रा !
सुंदरच आहे त सर्वच प्रचि ! २० वा पाहून थोडा नॉस्टॅल्जिक झालो, लहानपण आठवले Happy
धन्यवाद !!

.कारंज्याच्या समोरच रस्त्याच्या पलिकडे सफरचंद ची मोठी बाग आहे.>>> ओह्ह!!! ती नाही पाहिली. Sad

२० वा पाहून थोडा नॉस्टॅल्जिक झालो, लहानपण आठवले>>>>+१

धन्यवाद लोक्स Happy
आता पर्यटक वाढले का तसाच शुकशुकाट असतो ?>>>>दिनेशदा, पर्यटक खुपच वाढलेत सध्या. Happy

पण नेहमीचा 'जिप्सी टच' नाही जाणवला.>>>>>>ह्म्म्म Happy

मस्त रे.
बाकी त्या १५व्या प्रचिमधे अँगल काय आहे?
पाण्यात एवढा उंच कसा गेलास? की पैलतीरावर होतास? Uhoh

धन्यवाद लोक्स Happy

बाकी त्या १५व्या प्रचिमधे अँगल काय आहे?>>>मोनाली, तो फोटो ब्रीजवरून काढलाय. झेलम नदीवर असलेला ब्रीज. झीरो ब्रीज असं नाव आहे त्याचं. Happy

वॉव!
भारतातला नाही...........अवघ्या पृथ्वीतलावरचा स्वर्ग!

वा मस्तच ! मी २००६ मधे काश्मिरला गेलो होते तेव्हा "चार चिनार पैकी एक चिनार चे झाड जरा सुकल्यासारखे वाटत होते. आता नवीन लागवड केली का ? की तसेच आहे ?

योगेश....

काही कार्यालयीन कामे घरी करीत असताना प्रचंड थकवा जाणवत होता, आणि सततच्या ई-मेलिंगमुळे डोळेही दमल्यासारखे झाले होते. अशावेळी सहज मायबोलीवर आलो तर तुझ्या धाग्याच्या 'हुस्न-ए-कश्मीर' या हव्याशा वाटणार्‍या शीर्षकामुळेच तिकडे ओढला गेलो आणि बिलिव्ह मी, काही क्षणापूर्वी दुखत आहेत असे वाटणारे डोळे 'कश्मीर' प्रचिंनी प्रफुल्लीत झाल्यासारखे वाटले. जितकी चित्रे सुंदर तितकेच तुझी प्रवासवर्णनाची धाटणीही. प्रसन्न वाटले.

"हेलेन ऑफ ट्रॉय" पाहून नक्की वाटू लागले आहे की एक ना एक दिवस तिथे किमान एक रात्र तरी मुक्काम करावाच.

अशोक पाटील