खोबरा लाडु..

Submitted by सुलेखा on 24 July, 2012 - 03:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

lkhobaraa ladu 0000000.JPG
डेसिकेटेड झटपट आंबा लाडु सारखेच हे खोबरा लाडु आहेत. लागणार्‍या वस्तु ही सारख्याच आहेत.बिघडण्याचा चांस मुळीच नाही..
२ सपाट वाट्या खोबरा बूरा/डेसिकेटेड कोकोनट..
१ १/२ वाटी मिल्क पावडर..[१ वाटी घेतली तरी चालेल.]
१/२ वाटी पिठीसाखर..
अर्धी वाटी दूध्.[अंदाजे]
गुलाब पाणी/रोज एसेन्स..

क्रमवार पाककृती: 

खोबरा बूरा,मिल्क पावडर्,पिठीसाखर एकत्र करा.
त्यात थोडे-थोडे दूध घालत मिश्रण हाताने कालवुन घ्या..
मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होईल इतपत च दुध घालायचे आहे..
खोबरा बूरा जर फ्रिज मधेच ठेवलेला अन लगेच वापरत असाल तर दूध किंचित जास्त लागेल.
आता हे मिश्रण मावे.मधे हाय पॉवर वर २-२-२ मिनिटे ठेवावे.पर्त्येक २ मिनिटांनी बाहेर काढुन चमच्याने कालवावे.
लाडु वळण्याइतपत मिश्रण शिजुन तयार होईल ..
गुलाब पाणी १ १/२ चमचा अथवा रोज एसेन्स अर्धा टी स्पुन घालुन मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने कालवुन थंड करायला ठेवा.
मिश्रण कोंबट झाले कि लाडु वळा.

अधिक टिपा: 

गुलकंद मिसळुन करता येतील..
पिठीसाखर व दुध घालण्याऐवजी मध चालेल.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त होतात हे लाडु. यात बदामाची पिठी/भुकटी (almond meal) मिसळावी. छान पौष्टिक लाडु होतात.

सुलेखा, फोटो मस्त आहे. पटकन उचलुन खावासा वाटतोय लाडु.

मस्त.....प्लेटपण मस्त दिसतेय...स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्र्प....:)

बच्चेकंपनीला आवडेल असं वाटतंय...रोझ इसेन्स नसेल तर चालेल का? माझ्याकडे फक्त व्हानिला इसेन्सच असतो केक/मफिन इ.इ. मध्ये एकच युनिव्हर्सल इसेंस म्हणून वापरते......:P

सोप्पी रेसिपी असं वाचताना वाटलंय...;)

मस्तच दिसतायत लाडु Happy

वेका, रोझ इसेन्स नसेल तर वेलची पूड किंवा केशर सिरप घाल किंचित - रंग पण मस्त येइल Happy

(सॉरी सुलेखाताई, तुमच्या रेसिपीवर सजेशन्स देत्येय.. पण मी स्वतः केशर सिरप, बदाम पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क घालुन करते असे लाडु ).

वेका.लाजो, आपल्या घरात जे एसेन्स आहे ,आपल्याला जे आवडते ते वापरायचे..कोणताच एसेन्स वापरला नाही तरी चालते.वे.पुड्,जायफळ पुड्,बदाम-काजु पुड-केशर सिरप -कोणताही क्रश [पाईनॅप्पल्/स्त्र्टॉबेरी/ऑरेंज ]असं काहीही व्हेरीएशन करता येईल..या लाडवांना मूळ पदार्थांची चव छान आहे तेव्हा अजुन काहीही वापरले तर चव द्विगुणीतच होईल.

ओके....विकांताला करून पाहिन.....वेलची पावडर वापरेन तसही तिला मी इतरवेळी विसरतेच Wink जरा संपेल तरी Proud

निवा,खरं च गं,या प्लेट मधे काय ठेवावे याचा विचारच करत होते.तिरंगी कोफ्ता केला तेव्हा या प्लेट मधे ठेवता आला असता ..पण हे नंतर लक्षात आले.असो.देर आये दुरुस्त आये..

वॉव सुलेखा.. सोप्पी दिसतीये रेसिपी.. आणी किती तोंपासु दिस्तायेत लाडू..
मला खूप आवडतात पण अजिबात जमत नाहीत्. जमतील कदाचित!!
रूपा चे ही मस्त दिसत आहेत लाडू.. Happy

रुपा,अप्रतिम दिसत आहेत लाडू.
वर्षु,तू इतक्या मस्त मस्त सिन्धी रेसिपीज करतेस तुला तर अगदी सहज जमतील हे लाडू.

हे माझे 'कोकोनट आईस' लाडु Happy

मी फक्त कंडेन्स्ड मिल्क, डेसिकेटेड कोकोनट आणि चमचाभर मिल्क पावडर वापरली आहे...

स्वादासाठी गुलाबी लाडवात रोझ इसेन्स आणि पांढर्‍या लाडवात व्हॅनिला घातले आहे आणि स्प्रिंकल्स मधे घोळवले Happy

IMG_2088.jpg