नागपंचमी स्पेशल --- पुरणाचे दिंड ----

Submitted by निवा on 22 July, 2012 - 23:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

साहित्य -- हरबरा डाळ एक वाटी, गुळ बारीक चिरलेला दीड वाटी, जायफळ पुड एक छोटा चमचा,

पारीसाठी साहित्य -- एक वाटी कणीक...चिमूटभर मिठ घालून घट्ट भिजवुन ठेवणे.

क्रमवार पाककृती: 

कॄती-- प्रथम डाळ शिजवुन घ्या त्यातले पाणी (कट) काढून घ्या,त्यात गुळ घालून पुरण चांगले तयार करुन घ्या ( पुरण शिजल्याची खूण म्हणजे पुरणात जर उलथने मधोमध उभे राहिले तर झाले) त्यात जायफळ पुड घाला,आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......:) पुरण गार करायला ठेवा.

कणकेची पारी लाटून घ्या त्यात एक ते दीड चमचा पुरण भरुन ती पारी चारी बाजुनी दुमडून घ्या, चौकोनी
घडी करुन घ्या, अशे सर्व दिंड बनवा, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा....नंतर त्यावर चाळणी ठेवुन त्यात हे सर्व कडबु ठेवा, दहा ते पंधरा मिनिटे वाफ़वुन घ्या....
झाले तय्यार पुरणाचे दिंड.....आता खायला घेताना दिंड मधुनच थोडे फ़ोडा व त्यात भरपुर साजुक तुप घालुन गट्ट्म करा....... :p

ह आता तुम्ही म्हणाल फ़ोटू कुठाय....आत्ता दुपारी करणार आहे मी दिंड...त्यावेळी फ़ोटो टाकीनच...:)

वाढणी/प्रमाण: 
तीन
अधिक टिपा: 

टीप -- ह्याच्या जोडीला बटाटा भाजी करतात....एक गोड --एक तिखट..

माहितीचा स्रोत: 
आईकडून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणेरी पदार्थ कालच बहीणाबाई येऊन गेल्या त्यांच्या कडून कळला हा पदार्थ
मस्तच खायचाय एकदा ! Wink
आमच्याकडे उकडीचे मोदक असतात Happy

मस्तच. Happy
आई आज शगुनउंडे (मुगाच्या डाळीचे पुरण) करते. तो घमघमाट आणि साजुकतुपात लडबडलेले शगुनउंडे अहाहा तोंपासुच :लाळ गाळणारी बाहुली:

आमच्याकडे आज मोदक असतात आणि उकडलेले मिक्स कडधान्य.

शुभांगी मागच्या उंच माझा झोका ह्या सिरियल मध्ये शकुन उंडे ऐकल. तुझ्यासारखेच त्या रमेने वर्णन केले. आईला विचारून नक्की रेसिपी टाक त्याची.

उप्स, हा पदार्थ विसरलेच होते पुर्णपणे. आज संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशींना करुन ठेवायला सांगते. अनेको वर्षांनी करणार आणि खाणार आहे.
चवीला कसा असतो ते आता आठवत नाही. लहानपणी एकदाच खाल्ला होता. माझ्या बाबांना अजिबात आवडायचा नाही, म्हणुन आमच्या घरी कधी झालाच नाही. नागपंचमी आली की बाबा आईला सांगायचे कि पुरणपोळी कर किंवा कडबु ( पुरणाच्या तळलेल्या करंज्या) कर, पण ती गाठोडी नकोत. Proud

आमच्याकडेही पुरणाचे दिंडच करतात. अगदी निवाने सांगितले आहे तसेच.

देशावर चणाडाळ, गूळ, कणिक (गहू) यांचे प्रस्थ फार. कोकणात नारळ आणि तांदूळ. म्हणून सणावारचे पदार्थ सुद्धा याच साहित्यातून बनलेले.

नागपंचमीला भाजत, तळत नाहीत, वाटायचेसुद्धा नाही. मग पूरण्पोळी कशी करणार? म्हणून दिंड. त्याच्या चॉकोनी आकारावरून त्याला पाकिटे असेही म्हणतात.

गरमच खावीत, भरपूर तूप घालून.

आज संध्याकाळी स्व.मावशींना करुन ठेवायला सांगते

आजवर 'स्व.' हे फक्त स्वर्गवासींच्या नावाआधी लावलेले वाचलेले. इथे वाचल्यावर एकदम दचकलेच.. Happy

अरे वा, मस्त. नाव ऐकले आहे पण खाल्ली नाहीत कधी. करुन बघायला पाहिजेत.
शकुनउंडे ह्या पदार्थाचा उल्लेख पं.महादेवशास्त्री जोशी ह्यांच्या 'घररिघी' ह्या कथेत वाचला आहे. त्यामध्ये मुगाच्या डाळीचे पुरण तांदुळाच्या पातळ पिठात बुडवून तळायचे आणि वरुन तूप घालून खायचे अशी कृती सांगितली होती. पण तळलेले उंडे नागपंचमीला कसे चालतील ? त्या कथेत ते ललितापंचमीला केलेले दाखवले आहेत Happy

साधना, हे लक्षातच आलं नाही. Happy मी पोस्ट एडिट केली माझी. बिचार्‍या मावशी !

निवा, थँक्स ! हा विसरलेला पदार्थ होता. अनेक वर्षांनी केला गेला. गेस, हा गरमच छान लागतो. रि-हीट करुनही छान लागणार नाही.

झंपी, उकडल्या उकडल्या तुपाबरोबर मस्त लागतात. गार झाल्यावर अगदी बंडु लागणार बहुतेक. Happy

मस्त गं निवा....मी कधी केले आणि खाल्ले पण नाहीत... बघुया कधी तरी ट्राइन.. Wink

मनिमाऊ हो गं थंड झाले तर टंपडच लागतील.....
झंपी, एकदा मी उकडीचे मोदक करणार होते आणि अगदीच आयत्यावेळी लक्षात आलं की मोदकाचं पीठ समजत होते तो मैदा आहे मग नवरोबाच्या सल्ल्याने कणकेचे मोदक करून ते उकडवले प्रयोग म्हणून. गरम गरम तूप घालून चांगलेच लागले...थंड झाले की पुन्हा मायक्रोवेव्हमधे चटका दिला की बरोबर होतात..पण हा प्रयोग अर्थात पुन्हा नाही केला कारण उमो तांदळाच्याच पिठाचे चांगले...
पण तुझा प्रश्न असा जनरीक होता तर हे पण आठवलं... Proud