खरंतर आमचा बेत "लेह-लडाख" चा ठरला होता. त्याप्रमाणे तयारीही सुरू झाली होती. मायबोलीकर चंदन, सेनापती आणि प्राची यांच्याकडुन बरीच माहिती गोळा केली. मायबोलीवर बाफही काढला त्यातुनही भरपूर माहिती मिळाली. मी आणि माझी तीन मित्र असे आम्ही चारजण जाणार होतो. जाताना ट्रेनने जम्मु आणि त्यापुढे श्रीनगर आणि परत येताना श्रीनगरहुन विमानाने थेट मुंबई असा एक रफ प्लान तयार केला. आता फक्त जाण्याच्या दिवसाची वाट पहात होतो. पण मध्येच माशी शिंकली आणि एका मित्राला लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा त्याच्या घरच्यांनी घाट घातला. त्यानेही घरी अगदी फिल्मी स्टाईलने "मुझे मेरेही जिंदगी के १५ दिन दे दो" अस इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू केले. पण घरच्यांनी "वर्षभर हुंदडतोयस ना, आता १५ दिवस तरी घरी रहा" असे म्हणत त्याची बोलती बंद केली (सध्या तो मित्र लग्नाच्या बेडीत अडकलाय ). झालं तो आणि त्याचा मित्र कॅन्सल. आता दोघेच काय जायचे याचा विचार करत उरलेल्या आम्हीही मनावर दगड ठेवून "लेह-लडाख" प्लान कॅन्सल केला.
रेल्वे रीझर्वेशन रद्द केले. नंतर आम्ही विचार केला कि विमानाचे बूकींग आहेच तर मग फक्त कश्मिरच फिरून यायला काय हरकत आहे? अशाही सुट्ट्या मंजूर झाल्याच आहेत ना, त्याचा उपयोग करून घेऊया.
दोघे तयार झालो, दोघाचे तीघे आणि तीघांचे पाचजण तयार (अर्थात बजेट आणि सुट्टीचा प्रॉब्लेम होता म्हणुन उरलेले तीघे फक्त कश्मिरसाठी तयार झाले होते). सलग चाळीस एक तासा प्रवास करून श्रीनगरला जाण्याऐवजी एक दिवस दिल्लीला मुक्काम करून थोडी विश्रांती घेऊन श्रीनगरला जाण्याचा बेत झाला. (रस्त्याने जम्मु ते श्रीनगर हा प्रवाशी पाहता येणार होता.)
शुक्रवारी ६ जुलै रोजी मुंबई सेंट्रल ते न्यु दिल्ली दुरांतो एक्स्प्रेसने दिल्लीला निघालो. (मुंबई सेंट्रलहुन गाडी रात्री ११:१५ला सुटते आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी ४:४० पर्यंत दिल्लीला पोहचते. प्रवासाचा एकुण कालावधी १७:४० मिनिटे. तिकिट १३००/- रुपये माणशी (नाश्ता, पाण्याची बॉटल, ३ कोर्स जेवण चहा सर्व तिकिट खर्चात समाविष्ट. मुंबई सेंट्रलहुन कुठेही न थांबता (टेक्निकल हॉल्ट सोडले तर) थेट दिल्ली, मध्ये एकही स्टेशन नाही). संध्याकाळी ५ च्या सुमारास दिल्लीला पोहचलो. तेथे ओळखीच्या एकाने गाडी पाठवली होती. त्यांचे दिल्लीच्या पांडवनगर भागात गेस्ट हाऊस होते. तेथेच आमच्या राहण्याची छान सोय केली होती. मस्तपैकी फ्रेश झाल्यावर अक्षरधाम मंदिर पहायला गेलो पण उशीर झाल्याने मंदिरात प्रवेश बंद झाला होता, त्यामुळे अक्षरधाम मंदिराचे दूरूनच दर्शन घेतले. रात्री दिल्लीतील माझ्या आवडीच्या PSK मॉलमधील PSK हॉटेलमध्ये साग्रसंगीत जेवण झाले (हो, या हॉटेलमध्ये जेवणासोबत तुम्ही लाईव्ह गझलचा आनंद घेऊ शकतात. म्हणुनच कधीही दिल्लीला गेलो तर येथील डिनर फिक्स असतो. ;-)).
दुसर्या दिवशी सकाळी जर लवकरच उठलो. कारण आमच्या हातात रविवार ८ जुलैचा फक्त एकच दिवस होता दिल्ली फिरायला. तसं गेल्यावर्षी माझी दिल्ली भटकंती झाली होती, पण इतर मित्रांची बाकी होती. सकाळी साधारण दहाच्या सुमारास ठरवलेल्या तवेरा गाडीने राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार, लक्ष्मीनारायण मंदिर, लोटस मंदिर अशी भटकंती करून साधारण सहाच्या दरम्यान परत गेस्टहाऊसवर आलो. रात्री १०:१५च्या दिल्ली (सराय रोहिल्ला) ते जम्मुतावी अशी दुरंतोची तिकीट तात्काळ कोट्यातुन मिळाली होती. पांडवनगरहुन सराय रोहिल्ला ला जाण्यासाठी निघालो. गमतीचा भाग असा कि आमच्या ड्रायव्हरलाही माहित नव्हते हे स्टेशन नक्की कुठे आहे. साडेनऊ झाले तरी आम्ही आपले स्टेशन कुठे आहे हेच विचारत चाललो होतो. वाटलं आता नक्की हि ट्रेन चुकतेय. साधारण दहाला स्टेशनवर पोहचलो गाडीतून बॅगा काढुन घेऊन अक्षरशः धावत प्लॅटफॉर्मवर निघालो. त्या रोहिला स्टेशनवरचे फक्त दोन प्लॅटफॉर्म जागे होते. तेथे गेलो तर जत्रा भरलेली. सगळा गोंधळ होता. कुठली गाडी कुठे लागते याचा काहीच ताळमेळ नव्हता. आमची गाडी कुठे लागेल याची चौकशी केली असता प्लॅटफॉर्म २ किंवा ३ वर लागेल अशी उत्तरे मिळाली (झालं म्हणजे बॅगा घेऊन फिरा आता इकडे तिकडे). कुठेही दुरंतो गाडीची अनाउंसमेंट होत नव्हती. आम्ही चिंतेत होतो कि चुकीच्या स्टेशनवर तर नाही आलो? एक-दोन जणांकडे विचारल असता तेही त्याच गाडीसाठी थांबले होते. साधारण पाऊण एक तासाने (गाडी १.१५ मि. लेट झाली होती) गाडीची अनाउन्समेंट झाली. हुश्श्श!!! जीव भांड्यात पडला. एव्हढे मोठे जंक्शन पण कसलीच सोय नाही. स्टेशनही कमालीची अस्वच्छ दिसत होते. (खरंच या बाबतीत आपली मुंबईची सीएसटी, दादर, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, इतकंच काय तर टिळक नगर टर्मिनसही खुपच चांगलं आहे. शेवटी मुंबई ती मुंबईच ;-)). फायनली आमची दुरंतो सराय रोहिल्ला स्टेशनहुन जम्मुकडे जाण्यासाठी निघाली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे.
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार
=======================================================================
=======================================================================
अक्षरधाम मंदिर
प्रचि ०१एक संध्याकाळ (अक्षरधाम मंदिराजवळील मेट्रो ब्रीजवरून काढलेला फोटो)
प्रचि ०२राजघाट
प्रचि ०३राजघाट परीसरातील तलाव
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६लाल किल्ला
प्रचि ०७
प्रचि ०८श्री लक्ष्मीनारायण मंदिर
प्रचि ०९इंडिया गेट
प्रचि ०१०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४लोटस टेंपल
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
=======================================================================
=======================================================================
(क्रमशः)
अरे वा. दिल्लीवारी पार पाडली.
अरे वा. दिल्लीवारी पार पाडली. वर्णन येऊद्या. प्रचि ०५ , १२ आवडेश.
पक्षी आवडले..
पक्षी आवडले..
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
भारी रे ... लाल किल्ल्याच्या
भारी रे ...
लाल किल्ल्याच्या आत गेला नाहिस का...
झक्कास .... एकदम क्रिस्टल
झक्कास .... एकदम क्रिस्टल क्लिअर फोटो
धन्यवाद!!! लाल किल्ल्याच्या
धन्यवाद!!!
लाल किल्ल्याच्या आत गेला नाहिस का...>>>>नाही रे. आत नाही जाता आले. रविवार असल्याने खुपच गर्दी होती. तिकिट काढण्यासाठीच भलीमोठी रांग होती.
तुझ्या प्रचिंतून दिसणारा भारत
तुझ्या प्रचिंतून दिसणारा भारत कसा स्वच्छ स्वच्छ दिसतो, आकाश निळं निरभ्र दिसतं..
प्रत्यक्षातही असंच दृष्य असू दे!!
मस्तच. सगळेच प्रचि चांगले
मस्तच.
सगळेच प्रचि चांगले आहेत.प्रचि नं. ६ मधल ते पिल्लू भलतच वात्रट आहे वाटत्, आईने सांगून पण रांग सोडून चाललय ना एकटच म्हणून म्हंटल रे.
मस्तच!!! प्रचि १, ५ १२, १८
मस्तच!!!
प्रचि १, ५ १२, १८ खास
वर्षूताई ++१००
छान फोटोग्राफी, प्रचि नं. ६
छान फोटोग्राफी,
प्रचि नं. ६ मधल ते पिल्लू भलतच वात्रट आहे वाटत्, आईने सांगून पण रांग सोडून चाललय >>>
प्रचि नं. ६ मधल ते पिल्लू
प्रचि नं. ६ मधल ते पिल्लू भलतच वात्रट आहे वाटत्, आईने सांगून पण रांग सोडून चाललय>>>>>:हाहा:
जिप्स्या तुझा कॅमेरा नो डाऊट
जिप्स्या

तुझा कॅमेरा नो डाऊट बोलतोच
पण दिल्लीचे (फक्त) हेच फोटु पाहून लोकांना दिल्लीबद्दल आकर्षण वाटण्याची शक्यता ध्यानी घेऊन पहाडगंज, पुरानी दिल्ली, खारी बावली, सदर बाजारा, आयएसबीटी, शाहदरा या भागातली प्रचि जरूर टाकावीत
मस्त फोटोज... मजा आली...
मस्त फोटोज... मजा आली...
वा सुंदर.
वा सुंदर.
सहीच्.......मस्त आलेत सर्वच
सहीच्.......मस्त आलेत सर्वच प्रचि......
सह्हीईईईईह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्च
सह्हीईईईईह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्च
नेहमी तेच तेच म्हणावं
नेहमी तेच तेच म्हणावं लागतं... सह्हीईईईईह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्च
तसं आतून जळजळ होतेचे...
सही फोटोज् मित्रा... ५ चे
सही फोटोज् मित्रा...
५ चे काँपो तर झकास आहे...
जिप्सी ने फोटो काढले तर
जिप्सी ने फोटो काढले तर पहाडगंज, खारी बावली, सदर बाजार, आयएसबीटी इ सोडा, पण त्या सराय रोहिला स्टेशनचे फोटो पण छानच येतिल.
छान फोटो.
छान फोटो.
वॉव्...सहीयेत फोटो. हौज खास,
वॉव्...सहीयेत फोटो.:)
हौज खास, बुद्धा गार्डन,पुराना किला, सफदरजंग टोम्ब, मुख्य म्हणजे चांदनी चौकाचे पण टाक.
कुतुबमिनार राहिला.
देलही है दिलवालोंकी ! छान
देलही है दिलवालोंकी ! छान प्रचि.
१,२,९,१८ खूप आवडले
१,२,९,१८ खूप आवडले
झक्क्क्कास.....पहिला आणि
झक्क्क्कास.....पहिला आणि रांगेत चालणार्या पक्ष्यांचा एकदमच सही.
<< जिप्सी ने फोटो काढले तर पहाडगंज, खारी बावली, सदर बाजार, आयएसबीटी इ सोडा, पण त्या सराय रोहिला स्टेशनचे फोटो पण छानच येतिल. >> ++१०००
मस्त!
मस्त!
उत्क्रुष्ट फोटो आहेत. आणी
उत्क्रुष्ट फोटो आहेत. आणी वर्णनही.
मागील १० वर्षे दिल्लित असलेला....जेम्स बॉन्ड.
झक्क्क्कास !!!!
झक्क्क्कास !!!!
तुझ्या प्रचिंतून दिसणारा भारत
तुझ्या प्रचिंतून दिसणारा भारत कसा स्वच्छ स्वच्छ दिसतो, आकाश निळं निरभ्र दिसतं..
प्रत्यक्षातही असंच दृष्य असू दे!!>> अनुमोदन..मी ही हेच म्हणणार होते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
त्या सराय रोहिला स्टेशनचे फोटो पण छानच येतिल.>>>>अल्पना
सुंदर रे !
सुंदर रे !
Pages