ऑर्फिअसजी!
आपली ही ८+८=१६ मात्रांची मात्रावृत्तातील गझल आवडली! छान! टकारान्ती वा डकारान्ती काफिये/शब्द जरी काव्यात खडबडीत वाटत असले तरी, ते आपण निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. थोडीशी सफाई अजून यायला हवी, असे वाटून गेले.
आपले खयाल नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत.
आपण आता गझलेच्या अगदी जवळ आला आहात.
प्रत्येक शेरावर थोड्या अजून चिंतनाची आवश्यकता वाटली.
अशाने शेर थेट, प्रासादिक व आशयघन होतो.
काफिये वापरण्यापूर्वी काफियाच्या शब्दाचे सर्व अर्थ लक्षात घ्यावे, व मगच तो काफिया शेरात वापरावा. म्हणजे शेरात, काफियाला योग्य न्याय मिळतो व शेर प्रभावी व बोलका होतो.
म्हणून शब्दांच्या अर्थांचे सखोल चिंतन करावे!
आपली ही गझल मी अशी लिहून/ वाचून पाहिली........................
जगणे म्हणजे कटकट नुसती!
मरणासाठी खटपट नुसती!!
शांतपणे मी फक्त ऎकतो......
प्रत्येकाची वटवट नुसती!
व्वा.. व्वा.. व्वा.. अतिशय छान आणि अगदी ठोस पर्याय दिलात. त्याबध्दल खुप खुप धन्यवाद.
आणि शेर लिहीण्या बाबत आपण केलेल्या महत्वाच्या सुचनांबध्दल ही खुप खुप आभार.
आपल्या सुचना मी माझ्या अभ्यासू micro-mind मध्ये Save करत आहे.
ऑर्फिअसजी!
धन्यवाद! मी प्रतिसाद बिचकत बिचकतच दिला होता, कारण बरेच लोक माझ्या प्रतिसादाचा भलताच अर्थ काढतात. पण एखादी गझल, जेव्हा थोडक्यात हुकते आहे, निसटते आहे असे जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझ्यातला गझलकार मला गप्प बसू देत नाही व मग मी त्या गझलेचा खूप खोलवर आभ्यास करतो व मूळ गझलकाराच्या आत्म्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयात्न करतो. एखादा शेर नेमका कशाने निसटू पहातो आहे, यावर सखोल चिंतन करतो. अशा शेरातील एक मिसरा हा साधारणपणे ताकदीचा असतो. तसा मिसरा मूळ शायराने का बरे लिहिला असावा असा विचार करीत मी त्याच्या अंतरंगात डुब्या मारण्याचा प्रयत्न करतो व मग आपोआप माझ्या ओठांवर योग्य असा दुसरा पर्यायी मिसरा येतो.
कधी कधी मूळ शायराला आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला असतो असे मला त्याच्या शेरावरून वाटते. अशा वेळी मी त्याच्या काफियाला व रदीफला न्याय देण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र खयालाचा शेर देतो व काफियाला व रदीफला कसा कलात्मकरित्या न्याय दिला जावू शकतो हे मी व्यक्त करीत असतो. या सगळ्यामधे कुठल्याही तुलनेचा किंवा बढाई मारण्याचा हेतू नसतो.
ऑर्फिअसजी! मी मूळात एक शिक्षक आहे. हा शिक्षक देखिल मला गप्प बसू देत नाही. गेल्या३०-३२ वर्षात मी खूप मोठमोठ्या मराठी-हिंदी-उर्दू शायर व प्राध्यापकांच्या संपर्कात आलो. ही फक्त परमेश्वराची निव्वळ कृपा आहे. त्या मोठमोठ्या शायरांचे, प्राध्यापकांचे ज्ञान मी अक्षरश: शोषून घेतले व मी हळूहळू घडत गेलो. अनेक रात्री (व दिवस) मी श्री सुरेश भटांबरोबर गझलेसाठी जाळल्या आहेत.
हे सर्व ज्ञान, जे मला मोफत मिळाले आहे ते मी माझ्यासारख्या धडपडणा-या गझलकारांकडे फक्त सूपूर्त करू इच्छित असतो. मी फक्त त्या परमेश्वराचा सेवक या नात्याने हे करत असतो. कुठेही अहंकाराची भावना नसते.
ऑर्फिअसजी! ज्या दिवशी आपण निर्दोष, आशयघन, गोटीबंद, सच्ची व खणखणीत गझल लिहू लागाल, तेव्हा मला होणारा आनंद हा स्वर्गीय व अवर्णनीय असेल. लवकरच अशी गझल आपण लिहू लागणार आहात असे मला दिसत आहे, नव्हे जाणवत आहे. फक्त आपला अहंकार आपल्या गझलेआड कधीही येवू द्यायचा नाही व आपली गझल तपस्या अव्याहत चालू ठेवायची! मी हेच करत आहे. आपण एकटे जरी असे दर्जेदार गझलकार झालात तरी मी माझे मायबोलीवरचे येणे सफल झाले असे समजेन!
कुठलीही दैवी गोष्ट ही मोफत असते. सूर्यप्रकाश, पाणी, हवा या गोष्टी त्या परमेश्वराच्या असतात अन् मोफत असतात. हे गझलज्ञानही तसेच आहे, मिळवायचे घोर तपस्येने व मोफत वाटायचे धडपडणा-या, येणा-या शायरांना. आज उभ्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून अनेक मराठी शायर अत्यंत दर्जेदार गझललेखन करीत आहेत. ही मराठी गझलेच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे. आजचे युग इंटरनेटचे आहे. घरबसल्या आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. नाहीतर आम्हास गुरूच्या घरी जावून मोठ्या मिन्नतवारीने हे ज्ञान हासिल करावे लागायचे. त्या दृष्टीने तुम्ही आम्ही आता फार भाग्यवान आहोत.
थांबायची तयारी ठेवा. स्वत:वर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवा व आपला व्यासंग, आपली तपस्या चालू ठेवा. पहा गझल आपणास वश होते की, नाही ते.
...........प्रा.सतीश देवपूरकर
Submitted by सतीश देवपूरकर on 22 July, 2012 - 09:25
पहिला प्रतिसाद व त्यातील पर्यायी छान आहेत
दुसरा प्रतिसाद (आय मीन... निबंध ) जमला नाही
कधी कधी मूळ शायराला आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला असतो असे मला त्याच्या शेरावरून वाटते. >>>>>>>>>>
हा आपल्याला झालेला संभ्रम नाही ना याची खात्री करून घ्या वेळ मिळाल्यास !!:(
शिवाय या ओळीची सुरुवात चुकीची आहे मी त्यास आक्षेप घेत आहे
'कधी कधी..........(वाटते)' हे साफ खोटं आहे. तुम्हाला नेहमीच / दरवेळेला असे वाटते हे आम्हाला माहीत आहे
मी फक्त त्या परमेश्वराचा सेवक या नात्याने हे करत असतो>> +कुठलीही दैवी गोष्ट ही मोफत असते.(तुम्हाला मिळालेली गझल दैवी आहे अस्संच ना?)>> + परमेश्वरावर श्रद्धा ठेवा >>>
ही असली वाक्ये लिहिताना यापुढे जरा जपून लिहावीत.......
मला भक्तीचा भाव /आव वगैरे बाबी शिकवता ना मिस्टर देवपूरकर ?
काळजी घ्या !!:राग:
छान.
छान.
थँक्स नर्मदा.
थँक्स नर्मदा.
जगणे म्हणजे कटकट नुसती मरणा
जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती
कोणी हसते कोणी रुसते
प्रत्यकाची ही वटवट नुसती.
पैका पैका जोडण्यास ही,
नाती तुटती तटतट नुसती
खयाल आवडले
सुप्रियाजी, प्रतिसादाबध्द्ल
सुप्रियाजी, प्रतिसादाबध्द्ल मनपुर्वक आभार.
छान...
छान...
जगणे म्हणजे कटकट नुसती मरणा
जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती
कटकटेपणाचा मस्त आविष्कार.
देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती
हे तिरकस असले तरी व्यर्थतेच्या कटकट्या थीमशी विसंगत वाटले..
भारतीजी, प्रतिसादाबध्दल
भारतीजी,
प्रतिसादाबध्दल मनपुर्वक आभार,
देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती
हे तिरकस असले तरी व्यर्थतेच्या कटकट्या थीमशी विसंगत वाटले.... आपले हे म्हणने अगदी बरोबर आहे.
हा शेर वेगळाच आहे तो कोणतीही कट़कट करत नाही. तो फक्त प्रेम हे निरपेक्ष असावं इतकच सांगतो.
ऑर्फिअसजी! आपली ही ८+८=१६
ऑर्फिअसजी!
आपली ही ८+८=१६ मात्रांची मात्रावृत्तातील गझल आवडली! छान!
टकारान्ती वा डकारान्ती काफिये/शब्द जरी काव्यात खडबडीत वाटत असले तरी, ते आपण निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
थोडीशी सफाई अजून यायला हवी, असे वाटून गेले.
आपले खयाल नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत.
आपण आता गझलेच्या अगदी जवळ आला आहात.
प्रत्येक शेरावर थोड्या अजून चिंतनाची आवश्यकता वाटली.
अशाने शेर थेट, प्रासादिक व आशयघन होतो.
काफिये वापरण्यापूर्वी काफियाच्या शब्दाचे सर्व अर्थ लक्षात घ्यावे, व मगच तो काफिया शेरात वापरावा. म्हणजे शेरात, काफियाला योग्य न्याय मिळतो व शेर प्रभावी व बोलका होतो.
म्हणून शब्दांच्या अर्थांचे सखोल चिंतन करावे!
आपली ही गझल मी अशी लिहून/ वाचून पाहिली........................
जगणे म्हणजे कटकट नुसती!
मरणासाठी खटपट नुसती!!
शांतपणे मी फक्त ऎकतो......
प्रत्येकाची वटवट नुसती!
स्वार्थ माजतो......कोण ऎकतो?
नाती तुटती तटतट नुसती!
काय बोलतो? कळे न मजला!
जनता कापे लटलट नुसती!!
उजाडले ना अजून पुरते;
दिसते गगनी फटफट नुसती!
>..........प्रा.सतीश देवपूरकर
देवसर, व्वा.. व्वा..
देवसर,
व्वा.. व्वा.. व्वा.. अतिशय छान आणि अगदी ठोस पर्याय दिलात. त्याबध्दल खुप खुप धन्यवाद.
आणि शेर लिहीण्या बाबत आपण केलेल्या महत्वाच्या सुचनांबध्दल ही खुप खुप आभार.
आपल्या सुचना मी माझ्या अभ्यासू micro-mind मध्ये Save करत आहे.
ऑर्फिअसजी! धन्यवाद! मी
ऑर्फिअसजी!
धन्यवाद! मी प्रतिसाद बिचकत बिचकतच दिला होता, कारण बरेच लोक माझ्या प्रतिसादाचा भलताच अर्थ काढतात. पण एखादी गझल, जेव्हा थोडक्यात हुकते आहे, निसटते आहे असे जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझ्यातला गझलकार मला गप्प बसू देत नाही व मग मी त्या गझलेचा खूप खोलवर आभ्यास करतो व मूळ गझलकाराच्या आत्म्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयात्न करतो. एखादा शेर नेमका कशाने निसटू पहातो आहे, यावर सखोल चिंतन करतो. अशा शेरातील एक मिसरा हा साधारणपणे ताकदीचा असतो. तसा मिसरा मूळ शायराने का बरे लिहिला असावा असा विचार करीत मी त्याच्या अंतरंगात डुब्या मारण्याचा प्रयत्न करतो व मग आपोआप माझ्या ओठांवर योग्य असा दुसरा पर्यायी मिसरा येतो.
कधी कधी मूळ शायराला आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला असतो असे मला त्याच्या शेरावरून वाटते. अशा वेळी मी त्याच्या काफियाला व रदीफला न्याय देण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र खयालाचा शेर देतो व काफियाला व रदीफला कसा कलात्मकरित्या न्याय दिला जावू शकतो हे मी व्यक्त करीत असतो. या सगळ्यामधे कुठल्याही तुलनेचा किंवा बढाई मारण्याचा हेतू नसतो.
ऑर्फिअसजी! मी मूळात एक शिक्षक आहे. हा शिक्षक देखिल मला गप्प बसू देत नाही. गेल्या३०-३२ वर्षात मी खूप मोठमोठ्या मराठी-हिंदी-उर्दू शायर व प्राध्यापकांच्या संपर्कात आलो. ही फक्त परमेश्वराची निव्वळ कृपा आहे. त्या मोठमोठ्या शायरांचे, प्राध्यापकांचे ज्ञान मी अक्षरश: शोषून घेतले व मी हळूहळू घडत गेलो. अनेक रात्री (व दिवस) मी श्री सुरेश भटांबरोबर गझलेसाठी जाळल्या आहेत.
हे सर्व ज्ञान, जे मला मोफत मिळाले आहे ते मी माझ्यासारख्या धडपडणा-या गझलकारांकडे फक्त सूपूर्त करू इच्छित असतो. मी फक्त त्या परमेश्वराचा सेवक या नात्याने हे करत असतो. कुठेही अहंकाराची भावना नसते.
ऑर्फिअसजी! ज्या दिवशी आपण निर्दोष, आशयघन, गोटीबंद, सच्ची व खणखणीत गझल लिहू लागाल, तेव्हा मला होणारा आनंद हा स्वर्गीय व अवर्णनीय असेल. लवकरच अशी गझल आपण लिहू लागणार आहात असे मला दिसत आहे, नव्हे जाणवत आहे. फक्त आपला अहंकार आपल्या गझलेआड कधीही येवू द्यायचा नाही व आपली गझल तपस्या अव्याहत चालू ठेवायची! मी हेच करत आहे. आपण एकटे जरी असे दर्जेदार गझलकार झालात तरी मी माझे मायबोलीवरचे येणे सफल झाले असे समजेन!
कुठलीही दैवी गोष्ट ही मोफत असते. सूर्यप्रकाश, पाणी, हवा या गोष्टी त्या परमेश्वराच्या असतात अन् मोफत असतात. हे गझलज्ञानही तसेच आहे, मिळवायचे घोर तपस्येने व मोफत वाटायचे धडपडणा-या, येणा-या शायरांना. आज उभ्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून अनेक मराठी शायर अत्यंत दर्जेदार गझललेखन करीत आहेत. ही मराठी गझलेच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे. आजचे युग इंटरनेटचे आहे. घरबसल्या आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. नाहीतर आम्हास गुरूच्या घरी जावून मोठ्या मिन्नतवारीने हे ज्ञान हासिल करावे लागायचे. त्या दृष्टीने तुम्ही आम्ही आता फार भाग्यवान आहोत.
थांबायची तयारी ठेवा. स्वत:वर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवा व आपला व्यासंग, आपली तपस्या चालू ठेवा. पहा गझल आपणास वश होते की, नाही ते.
...........प्रा.सतीश देवपूरकर
हा. प्र. का. टा. आ.(दोनदा
हा. प्र. का. टा. आ.(दोनदा प्रकाशित झाल्यामुळे..........)
ऑर्फी मस्त गझल लिहिलीस
ऑर्फी मस्त गझल लिहिलीस रे
अभिनंदन
____________________
देवसर
पहिला प्रतिसाद व त्यातील पर्यायी छान आहेत
दुसरा प्रतिसाद (आय मीन... निबंध ) जमला नाही
कधी कधी मूळ शायराला आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला असतो असे मला त्याच्या शेरावरून वाटते. >>>>>>>>>>
हा आपल्याला झालेला संभ्रम नाही ना याची खात्री करून घ्या वेळ मिळाल्यास !!:(
शिवाय या ओळीची सुरुवात चुकीची आहे मी त्यास आक्षेप घेत आहे
'कधी कधी..........(वाटते)' हे साफ खोटं आहे. तुम्हाला नेहमीच / दरवेळेला असे वाटते हे आम्हाला माहीत आहे
मी फक्त त्या परमेश्वराचा सेवक या नात्याने हे करत असतो>> +कुठलीही दैवी गोष्ट ही मोफत असते.(तुम्हाला मिळालेली गझल दैवी आहे अस्संच ना?)>> + परमेश्वरावर श्रद्धा ठेवा >>>
ही असली वाक्ये लिहिताना यापुढे जरा जपून लिहावीत.......
मला भक्तीचा भाव /आव वगैरे बाबी शिकवता ना मिस्टर देवपूरकर ?
काळजी घ्या !!:राग:
धन्यवाद !!
देवसर, वैभू ...आपले मनपुर्वक
देवसर, वैभू ...आपले मनपुर्वक आभार.