अमेरिका एक स्वप्न.........भाग १
लहान पणा पासूनच अमेरिका या देशाबद्दल मनात बरच कुतूहल होत. कधी स्वप्नात हि विचार केला न्हवता कि कधी आपल्याला या देशात जायची संधी मिळेल. जेव्हा भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागलो त्या नंतर तर या शक्यता जवळपास मिटल्याच होत्या पण तरी सुधा कुठे तरी सुप्त इच्छा हि होतीच. कोणी काही म्हणो पण प्रत्येकाच्या मनात निदान हा देश बघायची एकदा तरी संधी मिळो हे असतच. जवळ पास ८ वर्ष सरकारी नोकरी केल्या नंतर हा विचारच मी सोडून दिला होता. अचानक उहाने काहिली झालेल्या दिवशी मेघ दाटवेत आणि पूर्ण निसर्गाचा कायापलट व्हावा तसच काहीसा माझ्या बाबतीत झालं. नवीन नोकरीची संधी काय आली मजेत म्हणून केलेला प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आणि समोर एक कठीण परिस्तिथी उभी राहिली कि जिचा विचार मनाला कधी शिवला हि न्हवता..
सरकारी नोकरी सोडायची म्हणजे हे जरा अतीच झालं. हातच सोडून पळत्याच्या पाठी लागायचा मनात खूप गोंधळ आणि काय करू काहीच सुचत न्हवतं. भाभा मधील नोकरी एक स्वप्नवत सगळ्यांसाठी आणि त्याला लाथ मारून अश्या एका क्षेत्रात पाऊल ठेवायचा कि ज्यातला काहीच माहित नाही अशी एक कंपनी कि जिचा नाव सुधा कोणी ऐकलं नाही. इंटरनेट वर वाचलं स्लाम्बर्जर विषयी तेव्हाच कळलं कि खूप मोठी कंपनी आहे हि. जितका विचार केला त्या पेक्षा मोठी. जवळ पास ८०,००० लोक कामाला आणि १९० देशात काम करणारी असा तिचा आवाका. तरीसुद्धा सरकारी नोकरी सोडण्यसाठी मन तयार होत न्हवतं. मनातून सरकारी नोकरीला कंटाळलो होतो आणि ज्या संधीच मी वाट बघत होतो ती समोर उभी होती. मनात म्हंटला आता नाही तर कधीच नाही. जोस आणि चंद्रा म्हणून माझे वरिष्ठ होते त्यांनी मला जाण्याचा सल्ला दिला. मी अवघ्या १८ दिवसाच्या नोटीस मध्ये भाभा मधून बाहेर आलो. हा एक रेकॉर्ड होता. सरकारी नोकरीत अट ६ महिन्याची असताना फक्त या दोन वरिष्ठांच्या प्रयत्नामुळे मला १८ दिवसात सगळं आटपून स्लाम्बर्जर मध्ये येता आलं. हे इतकं रामायण सांगण्याचा कारण इतकाच कि जेव्हा तुमच्या नशिबात लिहिला असता आणि त्याला जेव्हा कर्तुत्वाची जोड मिळते तेव्हा अशक्य गोष्टी सुधा साध्य होतात.
स्लाम्बर्जर मध्ये आलो ते पण एका वेगळ्या देशात मलेशिया मध्ये. पुढे जाण्याच्या अंमर्याद संधी होत्याच. तशीच एक संधी आली २०१० साली. अमेरिके मध्ये असणाऱ्या एका ट्रेनिंग साठी जायची संधी मिळाली. जवळ पास ६ आठवड्याचं ट्रेनिंग होता ते हुस्टन ह्या शहरात. टेक्सास या राज्य मधले हे शहर जवळ पास जगात सर्वाना माहित आहे ते या ठिकाणी असलेल्या नासा या संस्थेमुळे. संधी तर मिळाली पण खूप काही अडचणी सुधा होत्या सगळ्यात महत्वाची म्हणजे अमेरिकन व्हिसा. सगळ्यात कठीण आणि बे भरवश्या ची पायरी होती अगदी सगळ्या गोष्टी योग्य असताना सुधा किती जणांना व्हिसा मिळत नाही अस ऐकून होतो. त्याची मुलाखत हा अजून एक वेगळाच सोपस्कार होता. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे माझ्या मागील अनुभवाची. भाभा सारखी संस्था असल्याने व्हिसा ची मोठी गोची होणार हे मी जाणून होतो तरीसुद्धा कुठे तरी छोटी अशा होती कि सगळ काही विनायास पार पडेल..या कमी सगळ्यात मोठी मदत झाली ती म्हणजे जयेश दादा आणि किरण दादा ची. जयेश दादा आधीच अमेरिकेमध्ये होता त्याच्या कडून बरीचशी कल्पना मिळाली कि कस स्वताला तयार करायचा. सगळी कागदपत्र आणि मनाची तयारी केल्यावर शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी ७ वाजता जाऊन अमेरिकन कौन्सलेत च्या बाहेर रांगेत उभा राहिलो. जाचक सुरक्षा व्यवस्था आणि कागत पात्रांचे सोपस्कार पूर्ण करून माझ्या नंबर ची वाट बघत बसलो. सगळेच एका धर्म संकटात कि व्हिसा मिळेल कि नाही. जवळ पास १० वाजता माझा नंबर लागला. अमेरिकन बाई ने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली क च्या पाड्यातील सगळे प्रश्ना तिने मला विचारले. मी सुधा तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर दिली. अचानक मला माझ्या बायकोचं नाव विचारला आणि म्हणाली तुमचा व्हिसा ३ दिवसात मिळेल. अचानक मिळालेल्या या उत्तराने मी सर्दच झालो. अवघ्या २ मिनिटा मध्ये मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला होता. हातात असलेली ती जाडजूड कागदपत्रांची फाईल बघून मनात विचार करत होतो किती कष्ट घेतले होते या साठी. सगळ्यांचे उंबरठे झिझवून बँकेची कागद पत्रे , ऑफिस ची कागद पत्रे या कडे साधा ढुंकून बघितला सुधा नाही पण मनात खूप खुश होतो असला अनपेक्षित धक्का होता मला. नंतर कळलं कि माझ्या पुढे असणार्या ५ जणांना तिने परत माघारी पाठवलं होत यात एक इन्फोसिस चा कर्मचारी हि होता. पण सगळ्या शक्यतांना दुरावत मी एक अवघड टप्पा पार केला होता. आता पासपोर्ट वर अमेरिकन व्हिसा चा शिक्का बघितल्या शिवाय कोणाला काही सांगायचा नाही अस ठरवल होत. शेवटी तिने सांगितल्या प्रमाणे ३ दिवशी पासपोर्ट मिळाला आणि अमेरिकन व्हिसा च्या शिक्या सह तेव्हा मात्र आपला स्वप्ना खर होणार याची चाहूल लागली होती.....................क्रमश:
छान अनुभव आहे हा...... येउ
छान अनुभव आहे हा...... येउ दयात पुढचे भाग लवकर.......
(No subject)
छान ओघवती भाषा आहे तुमची,
छान ओघवती भाषा आहे तुमची, लिहित रहा.
आवडले लेखन. सिन्सियर वाटते.
आवडले लेखन. सिन्सियर वाटते. जरूर लिहा पुढे.
पुढेमागे तुमच्या क्षेत्रातील माहिती व अनुभव ही आवडतील वाचायला.
छान लेखन, लिहीत रहा.
छान लेखन, लिहीत रहा.
विनीत मस्त . लिहित जा
विनीत मस्त . लिहित जा
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद... याचा पुढचा भाग हि लवकरच टाकीन इकडे तो हि नक्की वाचा...