Submitted by पुरंदरे शशांक on 17 July, 2012 - 07:28
भुर्भुरते जावळ नि
छान छोटे नाक
बसत नाहीत अजून जरी
तोच केवढा धाक
रडून सांगतात महाराज (महाराणी)
आई ऊठ ऊठ ऊठ
कसे कळते आईला
लागलीये यांना भूक
जर्रा जवळ जाताच
कसे हात काढतात
भुर्रर घेऊन चला जरा
हुकूम थेट सोडतात
दुपटं जरा ओलं होता
बिघडून जातो नूर
घरदार डोक्यावर
काढतात महा सूर.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
कसलं छान् लिहिलयं
कसलं छान् लिहिलयं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा.......सुंदर आणि गोडुली
अरे वा.......सुंदर आणि गोडुली कविता.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वीटू कवितेसाठी स्वीटू फोटो-
स्वीटू कवितेसाठी स्वीटू फोटो-
![sweetoo.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39263/sweetoo.jpg)
एकदम मस्त!
एकदम मस्त!
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.......
भारतीताई - मस्त फोटो टाकलाय तुम्ही....... फार लहान पोरांना शाळेत जाताना पाहून मलाही फार वाईट वाटतं.....
खूप छान आहे कविता. आवडली.
खूप छान आहे कविता. आवडली.
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......