जून महिन्याच्या शेवटच्या तीन आठवड्यात अचानक वर्कलोड वाढल. रोज १६-१७ कामाचे तास व्हायला लागले होते. सकाळी १०-११ वाजता ऑफिसला जायचो ते पहाटे ३-५च्या दरम्यान यायचो. अक्षरशः कंटाळुन गेलो होतो. या सगळ्या कामाच्या त्रासातुन दहा एक दिवसाचा ब्रेक म्हणुन कुठे तरी जावंस वाटत होतं. शेवटी कंटाळुन शुक्रवारी ६ जुलै ला ऑफिसला दांडीच मारली. असाच निवांत विचार करत बसलो होतो आणि झोप लागली. थोड्या वेळाने जाग आली, पाहिलं तर सर्वत्र कमालीची शांतता, थंडगार वारा वाहत होता. अचानक आकाशातुन एक निळसर तेजस्वी प्रकाश वेगाने माझ्याकडे झेपावताना पाहिला. भिती वाटली. पाहतो तो काय तो तेजस्वी प्रकाश माझ्याच अंगावर आला. माझे शरीर कापसासारखा हलके वाटु लागले आणि अचानक मी त्या प्रकाशाच्या मागोमाग मंतरल्यासारखा चालु लागलो. कितीतरी वेळ मी त्याच्या मागेच होतो. तो मला घेऊन निघाला आणि माझ्या लक्षात आलं कि मी मुंबई सोडुन कुठे भलतीकडेच चाललो होतो. भीतीने माझी गाळण उडाली. कित्येक तास असेच गेल्यावर लक्षात आलं कि मी जम्मुतवी स्टेशनवर पोहचलोय. आता मात्र माझी चांगलीच तंतरली. दहशतवाद, अतिरेकी कारवायांनी बदनाम असलेल्या कश्मिरमध्ये मी आलो होतो. थोड्या वेळाने "तो" पुन्हा आला आणि मला सोबत घेऊन निघाला. अत्यंत वेगाने आम्ही निघालो होतो. वाटेत रोंरावत जाणारी चिनाब नदी दिसली. जागोजागी उभे असलेले बंदुकधारी सैनिक बघुन भिती जरा कमी होत गेली. आम्ही आता काश्मिर घाटीत प्रवेश केला होता. उंचच उंच डोंगर आणि खोल खोल दरी, जोशात वाहणारी चिनाब नदी बघुन धडकी भरत होती.
साधारण १०-११ तासाचा प्रवास केल्यानंतर "श्रीनगर" असा बोर्ड दिसु लागला. अरेच्चा!! मी चक्क श्रीनगरला पोहचलो होतो. "तो" मात्र माझ्याशी काहिच बोलत नव्हता आणि मी मात्र त्याच्या मागे मंतरल्यासारखा चालत होतो. नंतर "तो" मला दल सरोवराकडे घेऊन गेला. आत्तापर्यंत फक्त चित्रपटात, फोटोत पाहिलेला दल लेक माझ्यासमोर होता. सभोवार पसरलेला निळाशार दल सरोवर, त्यातील शिकारा हे सारं पाहुन माझ मनही दल सरोवरातील त्या शिकार्यासारखे तरंगु लागले. मी शिकार्यात बसलो आणि माझ्यासमोर काश्मिरी गुलाबाच्या "कहावा"चा कप समोर आला. दल सरोवरात शिकार्यातुन प्रवास सोबतीला गरमागरम काश्मिरी कहावा. क्या बात है!!! मी स्वप्नात तर नाही ना? असा विचार केला आणि त्या गरमागरम कहाव्यात बोट बुडवल. अरे! खरंच मी स्वप्नात नव्हतोच. दल सरोवरातील सफर संपवून जेंव्हा परत आलो तेंव्हा पुन्हा "तो" समोर उभा होतो. नंतर त्याने मला श्रीनगरमधील सर्व मुघल बाग (चश्मेशाही, निशात, शालिमार), हजरतबल दर्गा, हरीपर्बत, परीमहल, चारचिनार अशी मस्त भटकंती घडवली.
दुसर्या दिवशी पुन्हा "तो" हजर. आता मला त्याची भिती वाटत नव्हती उलट त्याच्या सोबतीची सवयच लागली. होती. त्याच्यासोबत निघालो. वाटेतला निसर्ग न्याहाळत गुलमर्गला/सोनमर्ग/पहलगामला पोहचलो. उंचच उंच डोंगर, धुक्याची चादर त्यावर पसरलेला शुभ्र बर्फ, त्यातुन खळाळत वाहणार्या हिमनद्या. जणु काही त्या पर्वतावर आकाशातुन दुधाचे कलशच्या कलश रिकामे होत होते आणि त्या दुधाची मऊशार साय त्या पर्वतावर अडकुन उरलेलं दूध हिमनद्यांच्या रूपाने धरतीवर खळाळत येत होते. स्वर्ग!!! स्वर्ग!!!! स्वर्ग म्हणतात तो यापेक्षा वेगळा खचितच नसणार. पुन्हा असं वाटल की मी स्वप्नात तरंगतोय. त्या हिमनदीच्या पाण्यात पाय टाकला आणि लगेचच जाणीव झाली, नाही मी स्वप्न पहात नाही. हे सगळं सत्य होतं. या सहा दिवसात "त्याने" मला काश्मिरची सफर घडवली. कामाच टेन्शन, नेहमीचे रूटिन सारं काही विसरून गेलो होतो. या सहा दिवसात पूर्णपणे रीफ्रेश झालो होतो. शेवटच्या दिवशी पुन्हा "तो" आला त्याने मला त्याच्या मागे येण्याचा इशारा केला. मीही हिप्नोटाईज केल्यासारखा त्याच्या मागे निघालो. काही वेळातच आम्ही श्रीनगर एअरपोर्टवर पोहचलो. तेथे मुंबईला जाणार्या विमानात "त्याने" मला बसवल आणि म्हणाला "अलविदा दोस्त".
परत निघताना मात्र मला चांगलच गहिवरून आलं. इथे येताना जी अनामिक भीती होती ती परत जाताना मात्र नव्हती.
मी "त्याला" विचारल, "तु कोण आहेस?"
तो मंदसा हसला आणि म्हणाला, "अजुन मला ओळखल नाहीस?" मी "हुस्न-ए-कश्मीर, जादू-ए-जन्नत". असं म्हणत तो आला तसाच अचानक निघुन गेला आणि विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.
=======================================================================
=======================================================================
कितनी खुबसुरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल बेनझीर है
ये कश्मीर है....ये कश्मीर है
प्रचि ०१
हर चेहरा यहाँ चाँद तो हर ज़र्रा सितारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
प्रचि ०२
(चिनाब नदी)
ये जलवा-ए-रंगीं है किसी ख़्वाब की ताबीर
या फूलों में बैठी हुई दुल्हन की है तस्वीर
या थम गया चलता हुआ परियों का शिकारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
(श्रीनगर)
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३अचबल (अनंतनाग)
प्रचि १४गुलमर्ग
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
ये चोटियाँ बरफ़ों की हैं आज़ादी का परचम
हँसती है ग़ुलामी पे ये इनसान की हरदम
देती है आकाश को बाँहों का सहारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
सोनमर्ग
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
दिन-रात हवा साज बजाती है सुहाने
नदियों के लबों पर हैं मुहब्बत के तराने
मस्ती में है डूबा हुआ बेहोश किनारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
पहलगाम
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
सफरचंद, अक्रोड, अलुबुखार (प्लम), जर्दाळु
हँसती हैं जो कलियाँ तो हसीं फूल हैं खिलते
हैं लोग यहाँ जैसे उतर आए फ़रिश्ते
हर दिल से निकलती है यहाँ प्यार की धारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
कश्मिरी वाजवान (रीस्ता, गुश्ताबो), नमकीन चाय, कहावा, कश्मिरी कबाब
प्रचि ३१
सुकामेवा: बदाम, खारीक, अक्रोड, अंजिर आणि केसर
प्रचि ३२
तटी: नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची हि चित्रझलक. संपूर्ण सफर चित्रमालिकेत प्रदर्शित करण्याचा मानस आहे. तुमची उत्सुकता थोडी ताणुन ठेवत यानंतरचे पहिले दोन भाग कुतुबमिनार आणि दिल्ली असे प्रदर्शित करतो आणि त्यानंतर श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, अवंतीपुर, पहलगाम अशी मालिका घेऊन येईन.
=======================================================================
=======================================================================
(क्रमशः)
श्या!!! एकट्या मलाच का फोटू
श्या!!! एकट्या मलाच का फोटू दिसत नाहीयेत???


चीन मे कश्मीर के फोटू नही दिखते???
हे...कंप्लेंट केल्याबरोब्बर
हे...कंप्लेंट केल्याबरोब्बर दिसू लागले की...

सुंदर सुंदर...अप्रतिम...
वादियाँ,पहाड,बर्फ्,झरने,मेवा,फळं ,फुलं...आहाहा.नॉस्टेल्जिक..............
त्या वाळक्या पानातली खूबसूरती
त्या वाळक्या पानातली खूबसूरती फक्त जिप्स्यानेच कैद करावी.. सुपर्ब!!!
सुंदर, झकास, अप्रतिम. तुमची
सुंदर, झकास, अप्रतिम.

तुमची उत्सुकता थोडी ताणुन ठेवत यानंतरचे पहिले दोन भाग कुतुबमिनार आणि दिल्ली असे प्रदर्शित करतो आणि त्यानंतर श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, अवंतीपुर, पहलगाम अशी मालिका घेऊन येईन. स्मित>>>>>>>>>>>>दूष्ट.
अप्रतिम ! पुढच्या भागांची वाट
अप्रतिम !
पुढच्या भागांची वाट पाहत आहे
खल्लास ... हीच खरी जन्नत ...
खल्लास ... हीच खरी जन्नत ... ती पण तुझ्या नजरेतुन अनुभवायाला मिळते आहे हे पण भाग्यच .... जियो दोस्त!!!
अप्रतिम प्रचि.
अप्रतिम प्रचि.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
काश्मिर ची नदी सुध्दा हिरवीच
काश्मिर ची नदी सुध्दा हिरवीच दिसते......... कुपवाडा आणि बारामुल्ला या ठिकाणी सुध्दा एक से एक प्रदेश आहेत....
जिप्सी तुझा कॅमेरा बोलतो. मी
जिप्सी
)
तुझा कॅमेरा बोलतो. मी अजून कश्मीर पाहीलेलं नाही राव ! हे फोटु बघून जावंसं वाटू लागलंय.
( शम्मीची इष्टायिल मारायचा मोह आवरत नाही.. फक्त पाण्यात पडणार नाही. दाल लेक मधे काय काय सोडतात कै माहीत
मी अजून कश्मीर पाहीलेलं नाही
मी अजून कश्मीर पाहीलेलं नाही राव ! हे फोटु बघून जावंसं वाटू लागलंय>>>>>>>> अरे रे रे.......किरण .......... अजुन गेलाच नाहीस ? लगेच जाउन ये
आहाहा ! असाच फिरत रहा, असाच
आहाहा !
असाच फिरत रहा, असाच फोटो काढत रहा, असाच लिहित रहा, असेच मायबोलीवर सगळे टाकत जा, .....
जाता जाता जरा वाकडी वाट करून, तेव्हढी केशराची डबी देऊन जा
मस्त रे, मनापासून धन्यवाद !
अहा!
अहा!
वाळकं पान इज द बेस्ट!
वाळकं पान इज द बेस्ट!
मस्त फोटो!!!
मस्त फोटो!!!
मस्त रे जि प्स्या .. सुंदर
मस्त रे जि प्स्या ..:)
सुंदर आगाज केलायस ... अंजाम पण तसाच असेल ना...
बाकी तो.. च्या जागी ती(काश्मीरची कली) चालली असती... ..
जिप्स्या मस्तच रे, अप्रतिम
जिप्स्या मस्तच रे, अप्रतिम फोटोस.
आहा!! सु.....रे....ख....! कच्
आहा!!
सु.....रे....ख....!
कच्च्या सफरचंदाची तोंडावर रेंगाळली अगदी प्रचि पहाताना!
कहावाचा फोटो असेल तर टाक की..!
सगळेच मस्त आहेत पण १६ वा
सगळेच मस्त आहेत पण १६ वा जास्त आवडला.
मी तुझ्या जागी असते तर अतिरेकी कारवायांपेक्षाही बरोबर टूथब्रश, कपडे, पर्स नाही ह्याची जास्त काळजी वाटली असती
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
तुमची कुंडली पाहिलीच पाहिजे आता>>>>:-)
शंकराचार्यच्या मंदीरात गेलेलात की नाही?>>>>हो जाऊन आलो ना. पण मंदिरात फोटोग्राफी आणि मोबाईल बंदी आहे.
तु कसे काय काढलेस? आणि तुला त्यांनी काढु दिले?>>>>मीरा, आम्ही त्यांच्या परवानगीनेच फोटो काढले.
तसेच बायकांचे फोटो पण .... मुस्लिम समाजात कुराणात सांगितल्या मुळे माणसांची चित्र, छाया चित्र वगैरे काढायला बंदी आहे. ते समजतात फक्त अल्लाच श्रेष्ठ आहे आणि अमर आहे, मानवाला चित्र वा छायाचित्र काढुन अमर व्ह्यायचा अधिकार नाही. .... म्हणुन आम्ही विषाची परिक्षाच घेतली नाही.>>>>>>हे सगळे फोटो आम्ही त्यांची परवानगी घेऊनच काढले. उलट इतर फोटो काढत असतानाच बर्याच जणी "हमारा भी फोटो उठाव ना" असं म्हणत फोटो काढुन घेत होत्या.
त्यांचे फोटो काढल्यावर त्यांना दाखवल्यावर चेहर्यावर दिसणारा आनंद मात्र अवर्णनीय होता. 
नाहितर काय एक एक सुरेख मुली होत्या!!!!!>>>>>सोलह आणे सच बात.
प्रचि ९ वा अगदी वासोटा ट्रेकचा वाटतोय पाठचा पर्वत अगदी सह्याद्रीच.>>>>अगदी अगदी नितीन
योग्या तरी काही फोटो थोडे ब्लर आलेत मित्रा.
ब्राईटनेस आणि शार्पनेस थोडा कमी वाटतो आहे का ह्यावेळच्या फोटोंना ?>>>>>सुकी, पराग वातावरण खुप वेळा धुसर होते. त्यामुळे हवा तो शार्पनेस नाही मिळाला. काहि ठिकाणी (उदा. पहिला प्रचि) तर पाऊस आणि धुकेही भरपूर होते. कदाचित त्यामुळे असेल.
अशा स्वर्गीय अनुभूतीला 'आफरीन आफरीन' का म्हणतात हे तुम्हालाच जास्त समजले असेल.>>>>अगदी अगदी
इंद्रा, जुई
प्रचि ६ कसले आहे?>>>>दल सरोवरातील कारंजे.
धन्स वर्षूदी
कुपवाडा आणि बारामुल्ला या ठिकाणी सुध्दा एक से एक प्रदेश आहेत...>>>>>येस्स
बारामुल्ला कि घाटी म्हटलं की "जो जिता वोही सिकंदर" आठवतो. 
किरण, रोमा
जाता जाता जरा वाकडी वाट करून, तेव्हढी केशराची डबी देऊन जा >>>>नक्कीच आरती
अतिरेकी कारवायांपेक्षाही बरोबर टूथब्रश, कपडे, पर्स नाही ह्याची जास्त काळजी वाटली असती>>>>सायो
फोटो छान आहेत .. नोस्टॅल्जिक
फोटो छान आहेत .. नोस्टॅल्जिक वाटलं फोटो बघून ..
वा ! सुरेख!....पुढच्या
वा ! सुरेख!....पुढच्या प्रचिंच्या प्रतिक्षेत!
फोटो छान आणि वेगळे आहेत.
फोटो छान आणि वेगळे आहेत. आम्ही गेलो तेव्हा सगळीकडे बर्फ होता, अतिरेकी यायच्या पूर्वीचे / नुकतेच आले होते ते दिवस. १९९०) दाल लेक तेव्हा जास्त सुंदर होते असं वाटून गेले! तेच चित्र डोळ्यात / डोक्यात फिट्ट बसलंय.
हे वेगळं काश्मिर वाटले त्यामुळे!! 
अफाट सुंदर फोटो! १७वा तर
अफाट सुंदर फोटो! १७वा तर प्रचंड आवडला.
तूझ्याकडून हीच अपेक्शा होती.
तूझ्याकडून हीच अपेक्शा होती. नेहमीप्रमाणे अप्रतीम फोटो.
चला तूझ्यामूळे काश्मीर तरी दिसल.
काय जबरी फोटो काढतोस राव - लय
काय जबरी फोटो काढतोस राव - लय भारी......
त्या सर्व समर्पक ओळीही सुरेखच.....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद दाल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
दाल लेक तेव्हा जास्त सुंदर होते असं वाटून गेले>>>>हो बस्के, मलाही दल लेकबद्दल जितक्या अपेक्षा होत्या तितकासा आवडला नाही
सगळीकडे पाणवनस्पती वाढल्या होत्या. त्यामुळे कदाचित त्याचे मूळ सौंदर्य हरवले असेल.
वाह्,क्या बात है!!! शब्दच
वाह्,क्या बात है!!! शब्दच अपुरे आहेत या कश्मिरी नजार्याचे वर्णन करायला!!!
तुझी फोटोग्राफी _/\_
बादवे, 'तो' होता की 'ती' होती??? खर्र खर्र सांग
जिप्सी, अप्रतिम आलेत फोटो.
जिप्सी,
वर्णन पण अगदी चपखल बसेल असेच आहे प्रत्येक फोटोला.
अप्रतिम आलेत फोटो.
जबरदस्त... सलाम
जबरदस्त... सलाम तुम्हाला.....
मी बी अगदी तसच करावं म्हन्तु... 
असाच निवांत विचार करत बसलो होतो आणि झोप लागली.>>> जरा मला पण सांगा कोणता विचार निवांतपणे केल्यावर अस सगळ हुतयं
Pages