रसिक मित्रमैत्रिणींनो! ही एक मुसलसल, वर्णनात्मक गझल आहे.
१४-०२-१९९६ साली लिहिलेली. तो दिवस होता valentine day. आमच्या वाडिया महाविद्यालयातील वातावरण दिवसभर फूलमय होते. ते पाहून आम्हाला आमच्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण झाली. तेव्हा(१९७१-१९७५) असा कोणता दिवस साजरा करण्याची प्रथा नसायची. पण भावना, वातावरण असेच प्रेमाचे असायचे! त्याच दिवशी महाविद्यालयामधून घरी आल्यावर ही गझल लिहून झाली. ती येथे देत आहे. आज सकाळी सकाळी सहज माझे जुने लिखाण चाळताना ही रचना मला दिसली व ती पोस्ट करण्याचा मोह झाल्याने मी ही रचना येथे देत आहे. ही एक कविता आहे, जी गझल आकृतिबंधात लिहिली आहे. पहा कशी वाटते ती......
....................................................................
गझल
फुलांचे ताटवे होते मुलांच्या घोळक्यामध्ये!
मुले रंगून गेलेली फुलांच्या उत्सवामध्ये!!
व-हांडे, वर्ग अन् सारे जिनेही फूल झालेले;
फुलांचा गालिचा होता महाविद्यालयामध्ये!
फुले वेणीमधे होती! फुले गज-यांमधे होती!
फुलांचा गोडवा होता मुलांच्या बोलण्यामध्ये!!
फुलांचे हासणे होते, फुलांचे डोलणे होते!
फुलांचा लालिमा होता मुलींच्या लाजण्यामध्ये!!
फुले हातामधे होती, फुले हृदयातही होती!
फुलांचे चेहरे होते, मुलांच्या चेह-यामध्ये!!
सरीवरती सरी, नाना फुलांच्या येवुनी गेल्या;
सुगंधाचे सडे होते महाविद्यालयामध्ये!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
सुंदर सुगंधी गझलमय कविता
सुंदर सुगंधी गझलमय कविता
फुले हातामधे होती, फुले
फुले हातामधे होती, फुले हृदयातही होती!
फुलांचे चेहरे होते, मुलांच्या चेह-यामध्ये!!
सरीवरती सरी, नाना फुलांच्या येवुनी गेल्या;
सुगंधाचे सडे होते महाविद्यालयामध्ये! <<<
व्वा, गझलतंत्रातील या कवितेतील वातावरण निर्मीती आवडली
==============
ही द्विपदी:
<<<फुलांचे हासणे होते, फुलांचे डोलणे होते!
फुलांचा लालिमा होता मुलांच्या लाजण्यामध्ये!!>>>
येथे 'मुलींच्या लाजण्यामध्ये' असे केल्यास? चु भ द्या घ्या! माझ्यामते व्हॅलेन्टाईन डे ला मुले अधिक उत्साहात असतात व लाजरेपणा सोडून देतात, मुलींचे मात्र तसे नसते
==============
(अवांतर - आपल्याला अजून माहीत नसल्यास - येथे कविता व काव्यधारा अशी दोन सदरेही आहेत, ज्यात आपण आपल्या गझल नसलेल्या रचना स्वतंत्रपणे देऊ शकताच)
धन्यवाद भूषणराव! आपण सुचवलेला
धन्यवाद भूषणराव!
आपण सुचवलेला बदल पटला व भिडलाही!
तो बदल मी ताबडतोब केलेला आहे.
असाच लोभ राहू द्या.
..........प्रा.सतीश देवपूरकर
अतिशय सुंदर .... काव्य
अतिशय सुंदर :).... काव्य वाचताना एखाद्या बहरलेल्या फुलांच्या प्रदेशातुनच फिरत असल्याप्रमाणे वाटते.
धन्यवाद ऑर्फिअसजी! आपल्या
धन्यवाद ऑर्फिअसजी!
आपल्या प्रतिसादाबद्दल! गझलेचा अभ्यास कसा चालला आहे?
व-हांडे, वर्ग अन् सारे जिनेही
व-हांडे, वर्ग अन् सारे जिनेही फूल झालेले;
फुलांचा गालिचा होता महाविद्यालयामध्ये!>>>>>>>>हिबेहूब चित्र डोळ्यापुढे उभं केलंत सर .....
फुलांचे चेहरे होते, मुलांच्या चेह-यामध्ये!!>>>>>>>>>>>कमालीची खूबसूरत ओळ अप्रतीम !!
सुगंधाचे सडे>>खूपच छान
मुलींच्या लाजण्यामध्ये>>> चा बदल बेफीजिंनी झक्कास सुचवलाय ! क्याबात- क्याबात- क्याबात !!
या गझलेसाठी सा. दंडवत स्वीकारा 'पर्यायी'गुरुदेव
__________/\___________
(फिर छिडी रात बात फुलोंकी ...हे गाणं आठवलं ...पण इथे मूड/भावना खूपच वेगळी आहे
तुमच्यातला 'प्रा.' दिसून येतोय या गझलेत !!बहोत खूब सर !!)