Submitted by कमलाकर देसले on 15 July, 2012 - 13:39
कसा देश होता..
कसा देश होता, कसा देश झाला ;
मतांचा भिकारीच राजेश झाला ..
तुला दान मतदार देतो म्हणोनी ;
मतांचा तुला हा धनादेश झाला ..
जयाने कधी दान स्वर्गास द्यावे ;
कसा कर्ण तो आज दरवेश झाला ..
दिशा आकरावी ;तिथे त्यास शोधा -
गुरूंचा मला यार आदेश झाला ..
किती छान डोळ्यातुनी बोलते तू ;
तुझे मौनही छान संदेश झाला ..
जिण्याचे खरे भान दु:खात आले ;
सुखारे तुझ्याने मला क्लेश झाला ..
गुलमोहर:
शेअर करा
दिशा आकरावी ;तिथे त्यास शोधा
दिशा आकरावी ;तिथे त्यास शोधा -
गुरूंचा मला यार आदेश झाला ..
मस्तच ..... देसले साहेब !
खूप वेगळा शेर
वैभवजी , धन्यवाद.
वैभवजी , धन्यवाद.
कमलाकरराव! गझल आवडली. फक्त
कमलाकरराव! गझल आवडली.
फक्त काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात...........
१)धनादेश (चेक) झाला हे जरा खटकते का? धनादेश देतात/देणे/येणे/येतात असे साधारणपणे आपण म्हणतो.
२)बोलतेस तू असे हवे का?
३)मौनही संदेश झाला की झाले हवे?
४)सुखारे तुझ्याने की तुझ्यामुळे?
बाकी सर्व शेरांतील खयाल आवडले!
...............प्रा.सतीश देवपूरकर
तो आकराव्वी शेर - त्यातला
तो आकराव्वी शेर - त्यातला खयाल मस्त आहे
(अकराव्वी / अकरावी - असे काहीसे )
(दहाही दिशा त्यागुनी त्यास शोधा - गुरू हे म्हणत कोठुनी पेश झाला) (असा शेर 'बहुधा' 'जरा जास्तच' आशयघन व्हावा) ( कृ गै न )
==============
किती छान डोळ्यातुनी बोलते तू ;
तुझे मौनही छान संदेश झाला ..>>>
(छान या शब्दाची 'उगाचच' पुनरावृत्ती झाल्या'सारखे' 'वाटले')
तुझे मौन डोळ्यातुनी बोलले अन
तुझे पाळणे मौन... संदेश झाला (कृ गै न)
जिण्याचे खरे भान दु:खात आले ;
सुखारे तुझ्याने मला क्लेश झाला ..
(असुलभ वाटली द्विपदी)
जिण्याची खरी धुंद दु:खात आली
सुखाहून थोडा कमी क्लेश झाला
(कृ गै न)
============================
देसले साहेब, मी आपला रात्री बेरात्री लहान तोंडी मोठा घास घेत बसतो राग मानू नयेत
-'बेफिकीर'!
जिण्याची खरी धुंद दु:खात
जिण्याची खरी धुंद दु:खात आली!
सुखाहून थोडा कमी क्लेश झाला!!
वा! वा! बेफिकीरजी! सुंदर शेर! सुंदर, गोटीबंद मिसरे व दाहक वास्तव!
कैलासराव! बेफिरजींनी सुचवलेला पर्याय सुंदर आहे, आपण तो जरूर स्वीकारावा.
कैलासराव! ???? संताजी धनाजी
कैलासराव! ????
संताजी धनाजी
आबा छान गझल... बदलांसह
मस्त
मस्त
देव सर ,आभारी आहे . आप्ल्या
देव सर ,आभारी आहे . आप्ल्या सुचना मार्ग्दर्शकच असतात .
भुषणजी,मी आपला गझलेतला अधिकार जाणूण आहे. मी आपला आणि आपल्या गझलेचा चाहता आहे .
मला चागल्या सुचना आवड्तात मित्रा. आपण आवर्जुन वाचतात. स्पस्ट प्र्तिक्रिया देतात . मला आवड्ते .
वैभवजी, शामजी आभारी आहे .
राज्-राजे आपलाही आभारी आहे .