"सत्यमेव जयते"- भाग ११ (Sunset Years, Sunshine Life)

Submitted by ज्ञानेश on 15 July, 2012 - 09:37

आमचे परममित्र आनंदयात्री यांना बहुधा कार्यबाहुल्यामुळे ('बाहुल्ल्या' असे वाचावे) यावेळच्या 'सत्यमेव जयते' वर धागा काढण्यास सवड मिळालेली नाही. सबब त्यांच्या वतीने हे सत्कार्य मी करतो आहे.

आजचा विषय होता- 'वार्धक्य.' सगळ्यांनाच भेडसावणारी समस्या किंवा अवस्था.
हो जाओ शुरू, माबोकर्स !

-------------------------------------------------
या आधीच्या भागांच्या लिंक्स-

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"वार्धक्य" हा असा एक विषय आहे की तो केवळ "स.ज." मुळेच चर्चेला येईल असे नाही तर जगभरातील सर्वच वृद्धांच्या स्थितीविषयीबाबत हळवा ठरू शकेल असा विषय आहे. मराठीच काय पण देशातील विविध भाषी संस्थळावरेही हा विषय वारंवार पटलावर येत असतोच.

आमीर खान टीमने वृद्धांविषयी संशोधन करताना निव्वळ त्यांच्या हलाखीच्या अवस्थेकडे कॅमेरा फोकस केला असे नसून वृद्धांनीही प्राप्त परिस्थितीतूनही आपल्याला आनंद कसा मिळविता येईल याची सोदाहरण आणि सविस्तर माहिती दिली ते फार छान झाले.

विशेषतः पुण्याचे श्री.जोशी आणि श्री.महाजन यांचे या संदर्भातील अनुभव अनेक उपस्थित वृद्धांना प्रेरक ठरल्याचे जाणवत होते. श्री.जोशी यांची वयाच्या ८० व्या वर्षी कॅमेर्‍यासमोरची 'तजेलदार' वर्तणूक अनेकांना कौतुकास्पद वाटत होती. तर श्री.महाजन यानी अगदी ९१ व्या वर्षी केलेला लोणावळा ट्रेक तसेच एका गडावरील रॅपलिंग ("लिम्का रेकॉर्ड" मध्ये नोंद झाली आहे) तर प्रेरणादायक वाटलेच, पण त्यासोबत त्यानी सार्‍याच वृद्धांना उद्देश्यून जे सांगितले ते महत्वाचे ठरेल. श्री.महाजन म्हणाले, "कशाला मुलांकडून ते आपल्याला पाहतील अशी अपेक्षा ठेवता ? तुम्हीच तुमची या वयातील स्थितीविषयीची योग्य ती तरतूद वेळीच करणे आवश्यक आहे. फक्त प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली की झाले. सत्तरीनंतर जितके जेवण तुम्हाला आवश्यक वाटते त्याच्या निम्मेच सेवन करा....एक ग्लास पाण्याच्या जागी चार ग्लास पाणी प्या.... कोणतेही कारण न सांगता चालण्याचा व्यायाम ठेवा....आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी हसतमुख राहा....बस्स."

नव्वदी ओलांडूनही ठणठणीत तब्येतीच्या या हसर्‍या द्रोणाचार्यांचा हा बोलका अनुभव सार्‍यांना फार भावला.

अशोक पाटील

आमीर खान टीमने वृद्धांविषयी संशोधन करताना निव्वळ त्यांच्या हलाखीच्या अवस्थेकडे कॅमेरा फोकस केला असे नसून वृद्धांनीही प्राप्त परिस्थितीतूनही आपल्याला आनंद कसा मिळविता येईल याची सोदाहरण आणि सविस्तर माहिती दिली ते फार छान झाले.>>> +१
त्या 'शुटींग चॅम्पियन' आज्ज्यांचे फारच कौतुक वाटले मला. विशेषत: त्या ज्या समाजातून आलेल्या आहेत, ते बघता त्याम्चे खरंच खूप कौतुक आहे.

काल चा भाग खरच छान होता.
>>त्या 'शुटींग चॅम्पियन' आज्ज्यांचे फारच कौतुक वाटले मला. विशेषत: त्या ज्या समाजातून आलेल्या आहेत, ते बघता त्याम्चे खरंच खूप कौतुक आहे.

श्री.जोशी यांची वयाच्या ८० व्या वर्षी कॅमेर्‍यासमोरची 'तजेलदार' वर्तणूक अनेकांना कौतुकास्पद वाटत होती. तर श्री.महाजन यानी अगदी ९१ व्या वर्षी केलेला लोणावळा ट्रेक तसेच एका गडावरील रॅपलिंग ("लिम्का रेकॉर्ड" मध्ये नोंद झाली आहे) तर प्रेरणादायक ....

दोन्ही ओल्डीजच्या पेअर्स आणि ट्रेकिंग करणारे पुण्याचे आजोब एकदम भारी.
दोन्ही दादी कसल्या स्मार्ट होत्या. त्यांचे घागरे, शुटिंगच्या वेळच्या पोजेस, त्यांची स्कीन एकदम मारु होत्या दोघी. Happy जोशी कपल कसलं लवी-डवी होतं. मला फार आवडले.
या सगळ्यांसारखा बुढापा ग्रेसफुल असावा.