Submitted by मी अभिजीत on 15 July, 2012 - 01:57
पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
गच्च होतो आसवांनी, पेटतो अन शेवटी
देहसुद्धा वागतो कापूस असल्यासारखा
आज का इतका स्वतःला ओळखीचा वाटलो
आरसाही चेहऱ्याची फूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा
टाकली जेव्हा नव्याने जीवनाची कात मी
भेटला तो काळही मुंगूस असल्यासारखा
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात है... मतला-मक्ता खास
क्या बात है... मतला-मक्ता खास !!!
अतिशय छान गझल.... मतला खुप
अतिशय छान गझल.... मतला खुप आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही गझल कुठेतरी वाचल्यासरखी
ही गझल कुठेतरी वाचल्यासरखी वाटते आहे नक्कीच !! ...तेन्व्हाच मी ही गझल व हा गझलकार लक्षात ठेवला होता पण अभिजितजी तेंव्हा मी आपल्याला कोणत्या संकेतस्थळावर भेटलो होतो हे आता आठवत नाही आहे
गझल तेव्हाही खूप आवडली होती आताही खूप आवडली !!
सुरेख गझल, अभिजीत. सगळेच शेर
सुरेख गझल, अभिजीत. सगळेच शेर आवडले.
'पायरी' शब्दातला श्लेष ( अभिप्रेत आहे का? ) आवडला.
सुरेख. आवडली.
सुरेख. आवडली.
अभिजीतराव! अभिनंदन! आपली गझल
अभिजीतराव! अभिनंदन!
आपली गझल थेट काळजाच्या आरपार गेली!
अत्यंत दर्जेदार, प्रामाणिक, तरल, गोटीबंद, निर्दोष, खणखणीत व बावनकशी चोख गझल!
अंत:करणापासून सांगतो, माझ्या मायबोलीवरील वाचनात आलेली सर्वात दर्जेदार गझल आपली आहे! आज मी धन्य झालो.
हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले आहेत.
आज आमचे दादा (आमचे गुरू कविवर्य सुरेश भट) असते तर या गझलेने
पागल झाले असते! आज स्वर्गात देखिल ते सुखावले असतील आपली गझल
पाहून. कोण म्हणते मराठी गझल मेली? आहेत, अगदी सशक्त गझल लिहिणारे, आपल्यासारखे जातीचे गझलकार येथे आहेत. स्वरसाज चढल्यावर तर ही गझल कुणाचेही काळीज हेलावून टाकेल.
मी ही आपली गझल माझ्या काळजावर कोरून ठेवली आहे.
कोण म्हणते उर्दूतली ताकद मराठीत नाही. त्याने यावे व आपली ही गझल वाचावी!
आजचा माझा दिवस सार्थकी लागला. आज प्रथम मला अस्सल गझल मायबोलीवर वाचायला मिळाली.
आपल्या पुढील गझललेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
>>>..........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: प्रत्येक शेर सुंदर, लावण्याने नटलेला!
................................................................................................
वा देवसर सुंदर प्रतिसाद
वा देवसर सुंदर प्रतिसाद !!!
...........हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले आहेत.!!
गझल आवडली. पायरी आणि फूस हे
गझल आवडली.
पायरी आणि फूस हे शेर आधिक आवडले.
आवडली बहुतेक करुन कविता आणि
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक करुन कविता आणि गझल ओलांडून जाते. पण 'मुंगूस' हे विचित्र नाव वाचून आत काय लिहिलंय पाहिलं आणि गझल आवडली.
'पायरी' शब्दातला श्लेष ( अभिप्रेत आहे का? ) आवडला.>>> + १
अ प्र ति म !
अ प्र ति म !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा>>>
वा, मस्त शेर! (ऐलपैलवर वाचली असेल आपण वैवकु)
पावसा रे वाग की पाऊस
पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा
हे तिनही ज्जाम आवडले....खास अभिजीत स्टाईल!
ग्रेट, सिंपली ग्रेट........
ग्रेट, सिंपली ग्रेट........
आभारी आहे. लिहिण्याचा हुरूप
आभारी आहे. लिहिण्याचा हुरूप वाढवलात..!
'पायरी' मध्ये श्लेषच अभिप्रेत आहे.
(काफिये मर्यादीत असल्यामुळे 'हापूस' घ्यावा लागला. तो निभावण्यासाठी मग श्लेष वापरला.. )
मस्त गझल !
मस्त गझल !
खूप छान गझल!!! "टाकली जेव्हा
खूप छान गझल!!!
"टाकली जेव्हा नव्याने जीवनाची कात मी
भेटला तो काळही मुंगूस असल्यासारखा " हा शेर एकदम भारी!
निवडक दहात नोंद केली आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह अभिजीत ! असल्यासारखा ही
वाह अभिजीत !
असल्यासारखा ही रदीफ निवडून सर्व शेरांना छान बांधलेय एका माळेत. खूप दिवसांनी गझल मनापासून आवडली.
मुंगूस चा अर्थबोध झाला नाही...
मुंगूस चा अर्थबोध झाला
मुंगूस चा अर्थबोध झाला नाही...>>>>>
देवपूरकराना विचार........ मराठी शब्दकोशात असेल तर ते नक्की शोधून काढतील अन् तुला सान्गतील![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असो.................
मुंगूस हा प्राणी सापाचा वैरी आसतो ....त्याला देशी भाषेत नकुल म्हणतात
मुंगूस हा इन्ग्लिश शब्द आहे बहुधा (माझे अगाध ज्ञान!!;))
मुंगूस दिसणे हा शुभशकुन मानला
मुंगूस दिसणे हा शुभशकुन मानला जातो, त्या अर्थाने आहे का असं विचारायचंय.
भाग्यवान गझल! आवडली.
भाग्यवान गझल!
आवडली.
वाह अभिजीत, सुंदरच! पावसा रे
वाह अभिजीत, सुंदरच!
पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा>>>
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा>> थे ट!!!
गच्च होतो आसवांनी, पेटतो अन शेवटी
देहसुद्धा वागतो कापूस असल्यासारखा>> हा शेर मला प्रचंडच आवडला आहे अभिजीत, ही अभिव्यक्ती सुंदर आहे आणि मांडलीये अगदी चपखल...
धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरण, बर्याचदा आयुष्यात आपण
किरण,
बर्याचदा आयुष्यात आपण नव्या गोष्टीसाठी सज्ज होतो, पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि आपला डाव उधळायचे बेत असतात त्याचे. त्या अनुषंगाने शेर लिहिला होता.
तुझ्या प्रतिसादाने या अर्थाला एकदम कलाटणी देणारा अर्थ मिळतो आहे आणि तोही तितकाच चपखल. एका शेराला अर्थाचे नाना पदर असू शकतात आणि प्रत्येकाला तो शेर आपल्या परीने उमजतो हेच खरं.
एक वेगळा आनंद दिलास मित्रा..! धन्यवाद..!