ती संपली कहाणी

Submitted by जयन्ता५२ on 14 July, 2012 - 10:33

ती संपली कहाणी
शोधू नको निशाणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!

-------जयन्ता५२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच जयन्ता५२ जी

छोट्या बहराचा मी गेले काही दिवस सराव करत आहे ..........आपला अभिप्राय कळवावा ही विनन्ती

http://www.maayboli.com/node/36419
http://www.maayboli.com/node/36377

आणि

http://www.maayboli.com/node/36421

कळावे
आपला कृपाभिलाषी
वै व कु

जयंतराव ....तुमच्या गझलेवर आपण बेहद्द खुश झालो. ... अतिशय आवडली गझल. Happy

..... हा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी
>>
वा!

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!
>>>
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्तच Happy