य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर
य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर
यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला. भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते. आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल. इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.
यलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले. मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका भरपूर प्रमाणात आहे.
हा पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.
वेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल. या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून जरूर वाचा.
थर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.
ओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो.
गायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते. साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.
या एरिआत लहान मोठे आनेक गायजर्स आहेत. एकाच खडकातून निघाले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. स्टीमबोट सगळ्यात मोठा आहे. याची माहिती वाचून जर ते पाहिले तर जास्त मजा येइल. नुसते पाहिले तरी सुंदर आहेत.
हाँट वाँटर स्प्रिंग्ज हे तयार होताना खाली प्लंबिंग सिस्टीम नसते. खालचे गरम पाणी वर व वरचे खाली असे कन्व्हेक्शन करंट मुळे पाणी उडते. याच्या बाँर्डरला मिनरल्स साठून लेस सारखा पँटर्न तयार होतो. पाणी जेवढे क्लिअर तेवढे जास्त गरम. या गरम पाण्यात वेगवेगळे बँक्टेरिआज, अल्गी वाढतात. ते पाण्याला विविध रंग देतात. क्तिअर, पिवळा, केशरी, निळा, हिरवा असे मस्त रंग दिसतात.या मायक्रोआँरगँनिझम्स वर इतर प्राणी वाढतात व एक प्रकारची फूड चेन तयार होते.
ग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.
मड पाँटस ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.
फ्युमारोल्स जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.
या एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.
मँमथ हाँट स्प्रिंग्ज - हे या पार्क मधले अजून एक थर्मल फिचर आहे. इथले खडक लाइम स्टोन या प्रकाराचे आहेत. पाणी वर येताना त्यात खूप विरघळलेले कँल्शिअम कार्बोनाट असते. वरती आल्यावर कार्बन डायआँक्साइड रिलिज होतो व कँल्शिअम कार्बोनाटचे थर साठतात.स्वच्छ पांढरे ट्रँव्हर्टाइन तयार होते इतके पांढरे की डोळ्याने नुसते बघताना त्रास होत होता. खडकावरून संथ व एका वेगात पाणी वहात असते. जिथे उतार नसतो तिथे छोटे पूल तयार होउन त्यात पाणी साठते व मस्त निळसर पाणी दिसते. पांढरा पिवळा व केशरी रंग दिसतात. अर्थात हे रंग त्यात वाढणारे बँक्टेरिआ देतात. यातील काही टेरेसेस ड्राय दिसल्या पण इथे कधीही परत त्या लाइव्ह होतात त्यामुळे पुन्हा तुम्ही जाल तर वेगळे चित्र दिसते. हे बदल यलोस्टोनमध्ये सगळीकडे दिसतात. जमिनीखोली जे बदल होतात, शेकडो छोटे भूकंप होतात त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो व पाणी वेगळ्या पध्दतिने बाहेर पडते
इथल्या फायरहोल रिव्हर मध्ये एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.
काँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते. काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.
लाँगपोल ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर पाइन कोन्स ठेवू
शकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात. किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....
वन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते. अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.
ग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन
अनेको वर्षापूर्वी ज्वालामुखी व त्यानंतर ग्लेसिएशन या मुळे ही कँनिअन तयार झाली असे म्हणतात. वरेच पेंटर्स इथे जागोजागी तुम्हाला दिसताल. आर्टिस्ट पाँइंट मस्ट सी. इथला खडक पिवळा दिसते. हा रंग सल्फरचा नसून आयर्न आँक्साइडचा आहे असे जिआँलाँजिस्ट म्हणतात. यावर अजून अभ्यास चालू आहे. या एरिआत अप्पर व लोअर फाँल्स आहेत दोन्हीही न चुकवावे असे. थोडे खाली उतरावे लागते दमछाक होते पण व्ह्यू जबरदस्त. लोआर फाँल पाशी २ छोटी ग्लेशिअर्स पण दिसतात. या सर्व ठिकाणांचे सौंदर्य कँमेरा वंदिस्त करू शकत नाही तेव्हा शक्य तितके डोळ्यात भरून घ्या व मनात साठवा. पाण्याचा फोर्स व बाजूचा निसर्ग दोन्ही नजर खिळवणारा.
पूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.
पेट्रीफाइड फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.
लेक मध्ये असे गरम पाण्याचे गायझर्स दिसतात.
यलोस्टोन लेक हे लेक भूकंपाचा इफेक्ट ने बनलेले आहे. इतके मोठे आहे की त्याला समुद्र म्हणावे असे वाटते. पूर्ण फोटो काढणे अशक्य. समोर मस्त बर्फाच्छादित शिखरे दिसतात. पाण्याचा रंग सुंदर आहे. या लेक मध्ये बोटिंगची सोय आहे.
याच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.
रंग व पँटर्न्स
टाँवर फाँल
लाव्हाने बनलेले काँलम्स
लोअर फाँल विथ ग्लेशिअर
बायसन कळप
खोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन
हिरवाई
फायरहोल धबधबा
बोर्डवाँकवरून दिसणारी वाफ
काही टिप्स....
शक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.
कधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.
पिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे पण ..
२-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.
दुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.
शेवटी टिटाँन पार्क.
हकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.
आम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो. जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.
इतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.
ग्रँड टिटोँन पुढील भागात......
P
फोटो दिसत नाहीत. कसे टाकावे?
फोटो दिसत नाहीत. कसे टाकावे?
मे, तुमचं मुख्य लिखाण वरच्या
मे, तुमचं मुख्य लिखाण वरच्या हेडरमध्येच घाला. हेडरमध्ये संपादन लिहिलेल्या शब्दावर टिचकी मारून तुम्हाला संपादनात जाता येईल. त्या आधी प्रतिसादात लिहिलेला लेख कॉपी करून घ्या. मग संपादनात जाऊन पेस्ट करा. आणि सेव्ह करा. एकदा सेव्ह झालेला दिसला की प्रतिसादात लिहिलेला लेख काढून टाकता येईल. त्याकरता त्या प्रतिसादातल्या संपादनात जावे लागेल.
मे तुमचे वर्णन बघून आमची
मे तुमचे वर्णन बघून आमची मागच्या वर्षीची ट्रीप आठवली ..
इकडे फोटो आहेत ..
हे इथे लिहिलंय तेच आहे न????
हे इथे लिहिलंय तेच आहे न???? होप की तुम्ही त्याच असाल......
मे नमस्कार, मायबोलीवर स्वागत
मे नमस्कार, मायबोलीवर स्वागत आहे.
फोटो कसे टाकावे यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघणार का?
तरीही काही प्रश्न असल्यास कृपया त्याच पानावर विचारा.
-मदत_समिती.
आता फोटो मस्ट बरका! सशल फारच
आता फोटो मस्ट बरका!
सशल फारच सुन्दर फोटो