मने करुन फूलांची......!

Submitted by सुधाकर.. on 12 July, 2012 - 10:18

लहानांसाठी कधी मने, करुन फ़ूलांची लहान व्हावे
उपकाराचे हात देऊन, मरणा अंती महान व्हावे.

सुख दु:खाची करुन वारी, गाणे येईल तुमच्या दारी
मंतरलेल्या शब्दांसाठी, कधी गाण्याची तहान व्हावे.

झाडाला कधी नसते दु:ख, काळजाला सांगून द्यावे
अन्यायात कधी दुर्बलांच्या तलवारीची सहाण व्हावे.

सांग कथा ती प्रत्यकाला, जय नावाच्या पराजयाची
लढणार्‍यास ही मौनाची भाषा त्यांची आव्हान व्हावे.

ना देता आले सुख कधी, तरी द्यावे असे दिलासे की,
आनंदाच्या अश्रूमध्ये सवंगड्याचे नहाण व्हावे.

--------------------------------------------------
कठिण शब्द येता :-----
..........................
सहाण = धार लावण्याचा दगड.
जय नावाचा पराजय = महाभारतावरील विष्लेशक कथेचा संदर्भ.
--------------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वैभवराव ... विठोबाच्या देवळातल्या सहाणेवर नुसतीच गंधगोळी उगाळत बसू नका, डिक्शनरी हातात घेऊन जरा
असा ही उपयोग करायला शिका.