'आम्ही'

Submitted by सुधाकर.. on 11 July, 2012 - 10:20

पुढच्याला मागे खेचनारे आम्ही
विजेत्यांचे नांगे ठेचनारे आम्ही

नाही कुठेच आमच्या हक्काचा बाग
दुसर्‍याचीच फ़ूले वेचनारे आम्ही.

बुध्दीने काढतो निर्बुध्दांची सोंगे
अध्यात्माला दूर फ़ेकनारे आम्ही.

आम्हासाठी आणेल घबाड त्याच्या
सरणावरी हात शेकनारे आम्ही.

अंगात आमच्या बाणा कर्तव्याचा
दुबळ्यांची बोटे चेपनारे आम्ही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरेच खूप सुंदर.
नाही कुठेच आमच्या हक्काचा बाग
दुसर्‍याचीच फ़ूले वेचणारे आम्ही.

आवडलं..लेखन शुभेच्छा.