Submitted by अरविंद चौधरी on 10 July, 2012 - 12:35
*
कशी फेडू निसर्गाची उधारी ?
सदोदित द्यायची त्याची तयारी
रडावे मी कशाला प्राक्तनाला ?
मृगाक्षी हासता आली हुशारी
निराशा पाठ सोडीना जिवाची
तुझ्या हातामुळे आली उभारी
तुझे माधुर्य शब्दांना मिळाले
तुझ्या ओठांत गझलेची खुमारी
मिळाले पंख प्रीतीचे मला तव
अता क्षितिजाकडे घेऊ भरारी
---- अरविंद
गुलमोहर:
शेअर करा
मतला आणि खुमारी हे शेर आवडले
मतला आणि खुमारी हे शेर आवडले
छान परंतू मृगाक्षी हासता
छान परंतू
मृगाक्षी हासता आली हुशारी...... याचे स्पष्टीकरण कळले नाही.
<<<मृगाक्षी हासता आली
<<<मृगाक्षी हासता आली हुशारी...... याचे स्पष्टीकरण कळले नाही.>>>
मृगाक्षी----- मृगनयना
हुशारी--- मरगळ गेली नि मन प्रफुल्लित झाले
वाचल्याबद्दल धन्यवाद
मतला सुरेख. चांगली गझल.
मतला सुरेख. चांगली गझल.
<<<मृगाक्षी हासता आली
<<<मृगाक्षी हासता आली हुशारी...... याचे स्पष्टीकरण कळले नाही.>>>
मृगाक्षी----- मृगनयना>>>
बाकी या वृत्ताचे नांवही मृगाक्षीच आहे. प्रमिला मृगाक्षी
तुझे माधुर्य शब्दांना मिळाले
तुझ्या ओठांत गझलेची खुमारी>>> वा
सर्वांचे मनापासून धन्यवाद...
सर्वांचे मनापासून धन्यवाद...
अरविन्दजी बेहद्द अवडली ही
अरविन्दजी बेहद्द अवडली ही गझल
धन्यवाद
या वृत्ताचे नांवही मृगाक्षीच आहे. प्रमिला मृगाक्षी>>>>>>>>
बेफीजी ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मतला सुरेखच!
मतला सुरेखच!
धन्यवाद वैभवराव ,सुप्रिया जी
धन्यवाद वैभवराव ,सुप्रिया जी
सुंदर गझल.
सुंदर गझल.
धन्यवाद
धन्यवाद