कधीही वागलो नाही तसा मी..

Submitted by वैवकु on 8 July, 2012 - 12:01

कधीही वागलो नाही तसा मी वागतो आहे
कुणावरही अताशा जीव माझा लागतो आहे

स्वतःची मी गझल गातो नि गाते रात्र अंगाई
तिलाही झोप नाही येत मीही जागतो आहे

मला माहीत आहे मी किती नादार आहे ते
तरी मी रोज स्वप्नांना उधारी मागतो आहे

स्वतःचा शत्रु आहे मी स्वतःचा शत्रुहन्ताही
स्वतःच्या मीपणावर शब्दतोफा डागतो आहे

किती स्वार्थी निघाला वैभवा विठ्ठल् तुझ्यामधला
स्वतःचे देवपण गुणतो तुझेपण भागतो आहे

गुलमोहर: 

अजून चांगले शेर होऊ शकले असते. थोडक्यात हुकलेले वाटले.आधिक विचार व्हावा वैभवा!

धन्यवाद कणखरजी
........मलाही काही शेर जरा हुकल्यासारखेच वाटले .बहुधा कवाफी मुळे असेल
तरी तुम्हाला नेमकी कोणकोणती सुधारणा अपेक्षित आहे हे सांगा मी प्रयत्न करून पाहीन

भारी कॅच घेतला, विदिपा.>>>>>>>>>>>>>

अहो हा तर चक्क वाईड बॉल होता!!!!!!Rofl

Better a witty fool than a foolish wit.
-William Shakespeare
>>>>>>>>>>>>>>>

आणि हा डोक्यावरून गेल्यामुळे नो बॉल ..........................:P!!!