Submitted by मयुरेश साने on 6 July, 2012 - 14:11
मरण माझेच आयुष्यात माझ्या रोज डोकावे
अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे
सुखे असतील जर कोठे मला भेटू नका आता
कशाला मी तिचे व्हावे व्यथेशी गोड बोलावे
असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे
उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती अता माझे कसे व्हावे
मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे
...मयुरेश साने
गुलमोहर:
शेअर करा
असे भलतेच काही चेहरे माझ्यात
असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे
उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती आता माझे कसे व्हावे
>>>>
हे दोन आवडले
मतला मस्तच.. मनी जे दाटते ते
मतला मस्तच..
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे...खूप आवडला हा मिसरा
बाकी गझलही छान!
छान गझल...
छान गझल...
सगळ शेर आवडले
सगळ शेर आवडले
असे भलतेच काही चेहरे माझ्यात
असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे
मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे>>>
खयाल आवडले
छान आहे! 'आता' ऐवजी 'अता'
छान आहे!
'आता' ऐवजी 'अता' असायला हवं.
सगळ्यांचे आभार आतां कोठें
सगळ्यांचे आभार
आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥
माझाही घोळ होतो कधी कधी,,,पण मी या तुकारामांच्या अभंगावरुन ठरवलं की आता बरोबर आहे
मी या तुकारामांच्या अभंगावरुन
मी या तुकारामांच्या अभंगावरुन ठरवलं की आता बरोबर आहे >>> आताही बरोबरच आहे पण येथे वृत्ताची मागणी "अता" अशीच आहे... रणजीतला हेच सांगायचे असावे. शाम
उत्तम गझल. मतला विशेष आवडला !
उत्तम गझल.
मतला विशेष आवडला !
>>>>येथे वृत्ताची मागणी "अता"
>>>>येथे वृत्ताची मागणी "अता" अशीच आहे... रणजीतला हेच सांगायचे असावे.<<<<
हो. धन्यवाद!
धन्यवाद -शाम , ज्ञानेश ,
धन्यवाद -शाम , ज्ञानेश , रणजीत ...
अता दुरुस्ती केली आहे..
मस्त, सुंदर गझल...........
मस्त, सुंदर गझल...........