मस्त पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यांना काहितरी चटक मटक खावसं वाटत असणार. त्यात पुढ्चा महीना श्रावण असल्यामुळे आता सगळ्यांच्या आषाढी पार्ट्या चालु असणार. तेच ते सुक्कं आणि रस्सा खाऊन कंटाळलेल्या लोकांसाठी हा खास, वेगळा आणि तितकाच चविष्ट मेनु...............
साहित्य :
१ किलो चिकन, १ चमचा मोहरी, १/४ चमचा गरम मसाला, ६ चमचे लोणच्याचा मसाला, १ लिंबु,
१ वाटी कोथिंबीर बारीक चिरुन, तेल, मिठ चवीनुसार
एका भांड्यात थोडे तेल तापवून घ्या. त्यात चिकन टाकुन थोडा वेळ परता. मग त्यात १ चमचा मिठ टाका.
थोडेसे पाणी घाला आणि चिकन शिजवुन घ्या. एकदम जास्त पाणी घालू नका. चिकन शिजल्यावर कोरडेच राहिले पाहिजे. आता वाफवलेले चिकन बाजुला ठेवा.
एका कढईत थोडे तेल तापवुन घ्या. १ चमचा मोहरी टाका. मग त्यात शिजवलेले चिकन टाका. थोडेसे मिठ आणि कोथिंबीर टाका. थोडा वेळ परतुन एक दोन वाफा आल्या की कढई झाकुन ठेवा आणि गॅस बंद करा.
पाच मिनिटांनी त्यात लोणच्याचा मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि एका लिंबाचा रस घाला. मसाला सगळी कडे लागला पाहिजे.
पेशन्स असेल तर अर्धा तास मुरु द्या. नसेल तर लगेच खाउ शकता.
-तेल आणि मिठ आपण दोनदा घालणार आहोत. शिवाय लोणच्याचा मसाल्यात पण कधी कधी खुप मिठ असते.
तेंव्हा तेल, मिठ या दोन्हि गोष्टी जपुन, चव पाहुन घालाव्यात.
-हे लोणचे जरी असले तरी टिकाऊ नाही. रेग्युलर चिकन प्रमाणे लगेच संपवा
बरं झालं फोटो टाकला नाही ते
बरं झालं फोटो टाकला नाही ते
सोपी वाटतीय पाकॄ..
लोणच्याचे चिकन नाही केले बर
लोणच्याचे चिकन नाही केले बर झालं
जगावेगळी रेसिपी. छान.
जगावेगळी रेसिपी. छान.
हो चिमुरी. खुप सोप्पी, आणी
हो चिमुरी. खुप सोप्पी, आणी चविष्ट आहे ही पाकॄ.
लोणच्याचे चिकन नाही केले बर झालं>>..:)
धन्स सस्मीत
छान पाककृती. हे चिकनचे लोणचे
छान पाककृती.
हे चिकनचे लोणचे मी हरयाणात कर्नाल इथे असताना खाऊन पाहीलेले, चव अगदि भन्नाट होती. आपल्या समोरच बनवून देतात.
आता 'गटारी अमावस्येला तोंडी लावायला(चकन्याला) बनवावे लागेल.
धन्यवाद.
झक्कास. लोणचे मसाला लावून
झक्कास.
लोणचे मसाला लावून मासे पण मस्त फ्राय होतात.
अगं फोटो का नाही टाकलास?
अगं फोटो का नाही टाकलास?
लोणचे भारीच!!!
लोणचे भारीच!!!
सोपी वाटतीय...... आल - लसूण
सोपी वाटतीय......
आल - लसूण पेस्ट नाहि लावायचि का ?
श्रुती विपू त बघ तुझ्या.
श्रुती विपू त बघ तुझ्या.
(No subject)
धन्स प्रसिक हटके कमेंट दिल्या
धन्स प्रसिक हटके कमेंट दिल्या बद्दल
जगावेगळी ... मि काल केले
जगावेगळी ... मि काल केले ....म स्त झाले होते आवडले ... फ क्त मोहरि जास्त झाली..
धन्स श्रुती. मला वाटलच होतं
धन्स श्रुती. मला वाटलच होतं तु नक्की करुन बघणार ते:)
ह्या रविवारी करुन पाहिलं,
ह्या रविवारी करुन पाहिलं, खूपच चविष्ट झाल होतं. रेसिपी बद्द्ल धन्यवाद!
मस्तच.....
मस्तच.....