देवकण - गॉड्स पार्टिकल

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 00:33

माणसाच्या दैनंदिन जीवनात तात्काळ फरक पडणार नसला तरी शास्त्रज्ञांच्या जगात उंच उंच उड्या माराव्याश्या वाटतील असे संशोधन पार पाडण्यात मानवाला यश मिळाले.

आज आपल्या शरीरात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम , लोह व सर्वच्या सर्व घटक हे सूर्यापासून आलेले असून सूर्य हा केवळेक दुय्यम (उद्यानदीप - सेकंडरी - इतर तार्‍यांपासून झालेला) तारा आहे. सूर्यात हे घटक त्याच्या मूळ राक्षसी तार्‍यामधून आलेले आहेत. त्या तार्‍यात ते विश्वाच्या महास्फोटापासून. हा इतिहास चौदा ते वीस अब्ज वर्षे मागे मागे जात राहतो.

प्रश्न असा येतो की उर्जा (एनर्जी) असताना वस्तूमान (मॅटर ) कसे आले? या प्रशाचे तर्कशास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तर देण्याचे अनेक प्रयत झाले त्यातील हिग्ज यांची थिअरी सर्वमान्य होण्यात अडचणी आल्या नाहीत.

अनेक दशकांनी ही थिअरी प्रत्यक्षात कशी कार्यरत होईल याचे डेमो जीनिव्हात झाले आणि जल्लोष झाला.

यातून देवकणाचे अस्तित्व मान्य होईल इतपत पुरावे मिळाले.

निसर्गानेच मानवाला दिलेल्या बुद्धीतून मानवाने पार केलेले हे अफाट बौद्धिक विकासाचे टप्पे पाहून स्तिमित व्हायला होते.

उर्जा व वस्तूमान यांच्या अस्तित्वामागच्या अनेक जादूमय बाबी हळूहळू समजू लागतील. दृष्टिकोन पालटू लागतील. अधिक 'वेल इन्फॉर्म्ड' मानवजात यातून निर्माण होईल.

आम्हा सर्वसामान्यांना हे आधुनिक व अद्भुत जग प्रदान करणार्‍या शास्त्रज्ञांना नमन!

==========================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्चिग त्या लिंक्स काल पाहिल्यात.

मागे मॅक्स प्लँकचे क्वांटम फिजिक्सचे नियम बिग बँग होताना एका विशिष्ट बिंदूला लागू होत नाहीत असं काहीसं वाचनात आलं होतं. त्याचा अर्थ लावण्यास मी असमर्थ आहे. शक्य असल्यास इथे समजावून सांगता येईल का ?

मागच्या शतकात पुढे आलेले दोन सर्वोत्तम सिद्धांत म्हणजे पुंजवाद (क्वांटम मेकॅनिक्स) आणि साधारण सापेक्षतावाद (जनरल रिलेटिव्हिटी). ते अनेक ठिकाणी लागु होतात, त्यांच्यामुळे विश्वाची अनेक रहस्ये गवसली आहेत पण सर्वच बाबतीत दोन्ही सिद्धांतांचे एकमेकांशी पटत नाही. ढोबळमानाने पहिला अतिसुक्ष्म गोष्टींना लागु होतो (उदा. मूलकण) तर दूसरा महाकाय गोष्टींना (त्यातील गुरुत्वाकर्षणाचा भाग वस्तुमान जास्त असतं तिथे जास्त प्रकर्शाने जाणवणार - उदा. एखाद्या ग्रहाजवळून जातांना प्रकाशाचे वक्र होणे).

दोनच घटक्/वस्तु/जागा अशा आहेत की जिथे हे दोन्ही असते - कमी आकारमान आणि जास्त वस्तुमानः (१) बिग बँगच्या वेळची जवळजवळ-शुन्यावस्था, आणि (२) कृष्णविवर. या दोन सिद्धांतांचे या ठिकाणी एकमेकांशी पटत नाही आणि कोणतातरी एक, किंवा दोन्ही आपल्याला थोडातरी बदलावा लागणार आहे (ही प्रक्रीया विज्ञानात सततच सुरु असते - किंबहुना, यालाच विज्ञान म्हणतात). पण काय ते आपल्याला अजुन माहीत नाही.

त्याबद्दल अनेक युनिफिकेशन मॉदेल्स आहेत, कोणतेच अजुन सर्वमान्य नाही. या दुव्यावर थोडी अजुन माहिती आहे:
http://www.infoplease.com/cig/theories-universe/quantum-mechanics-vs-gen...

aschig,

आपला इथला प्रतिसाद वाचला. बरेच काही समजले.

त्यावर एक भोळा भाबडा प्रश्न : Pair Production मध्ये एका फोटॉनचे इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांमध्ये रूपांतर होते. इथे हिग्ज बोसॉन वा हिग्ज फील्ड कसे काय कार्य करते ते समजावून सांगाल का?

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

ग्रेटथिंकर,

>> काहि दिवसांपुर्वीच मायबोलीवर ASCHIG, उदय, गामा पैलवान, रोहित, सोनटक्केबै, जोशी
>> यांनी हिग्जविषयी अक्कल पाजळली होती ती वाचा

तुम्ही दिलेला दुवा चुकीचा आहे. तो ठीक करून घेतल्यास तिथे दिसते की केवळ Er.rohit यांनीच हिग्जविषयी अक्कल पाजळली होती. माझ्या युक्तीवादानुसार हिग्ज फील्डला चर्चेत आणायची गरजच मुळी नव्हती.

आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर गप्प बसावं. किंवा त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळवावी. दोन्ही केलंत तर उत्तमच!

आ.न.,
-गा.पै.

> Pair Production मध्ये एका फोटॉनचे इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांमध्ये रूपांतर होते. इथे हिग्ज बोसॉन वा हिग्ज फील्ड कसे काय कार्य करते ते समजावून सांगाल का?

इथे हिग्ज बोसॉनचा संबंध नाही. हिग्ज फिल्ड असतंच. त्यामुळे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांना आपापलं वस्तुमान जाणवतं (आणि आपल्याला आणि उर्वरीत विश्वालाही) .

> Pair Production मध्ये एका फोटॉनचे इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांमध्ये रूपांतर होते. इथे हिग्ज बोसॉन वा हिग्ज फील्ड कसे काय कार्य करते ते समजावून सांगाल का?

इथे हिग्ज बोसॉनचा संबंध नाही. हिग्ज फिल्ड असतंच. त्यामुळे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांना आपापलं वस्तुमान जाणवतं (आणि आपल्याला आणि उर्वरीत विश्वालाही) .

aschig,

>> इथे हिग्ज बोसॉनचा संबंध नाही. हिग्ज फिल्ड असतंच. त्यामुळे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांना
>> आपापलं वस्तुमान जाणवतं

आपलं उत्तर पटलं नाही. आगोदर वस्तुमान अस्तित्वात नव्हतं. केवळ उर्जा होती. ती फोटॉनच्या स्वरूपात विहरत होती. फोटॉनला हिग्ज फील्डमधून जातांना ओढ (drag) जाणवत नाही. मात्र या फोटॉनला एखाद्या जड अणुगर्भाच्या सहवासात आल्यावर अचानक हिग्ज फील्डचा विरोध (drag) जाणवू लागतो. आणि त्याचं इलेट्रॉन व पॉझिट्रॉन या कणांत विघटन होतं.

मात्र यातून हिग्ज क्षेत्र कसे कार्य करते यावर प्रकाश पडत नाही. तो पडेल काय?

आ.न.,
-गा.पै.

Pages