फोडशी/कुलू ची एक एक पाती वेगळी करून घ्या खाली जास्त पांढरा भाग असल्यास काढा. मध्ये जर कडक दांडी असेल तर काढा आणि स्वच्छ धुवून चिरुन घ्या.
भांड्यात तेल तापवून त्यावर लसुण पाकळ्या व मिरच्यांची फोडणी देउन कांदा घाला. त्यावर हिंग, हळद घाला व परतवून डाळ घालून परत परता.
ह्यावर टोमॅटो सॉस घालून परता.
आता ह्यावर चिरलेली फोडशी/कुलूची भाजी घाला. व झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परता. भाजी बसल्यामुळे व्यवस्थित परतता येते. भांड्याच्या बाहेर जात नाही.
ह्यावर मिठ घाला व डाळ शिजू द्या. डाळ शिजली की वरून खोबरे पेरून परता आणि गॅस बंद करा. झाली भाजी तय्यार.
हिच भाजी आधी उकडून घेण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे ती मऊ होते. पण डायरेक्ट केली तर माझ्यामते जास्त रुचकर व पौष्टीक होते.
हिच भाजी प्लेन माझ्या आधीच्या रानभाज्यांच्या मालिकेत आहे.
इतर रानभाज्या
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोळशिंद - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006
१७) शेवग्याची फुले - http://www.maayboli.com/node/23204
१८) भूईछत्री/आळंबी (मश्रुम्स) - http://www.maayboli.com/node/29346
१९) हदगा - http://www.maayboli.com/node/31191
वा ! अगं परवाच आईने पाठवली.
वा !
अगं परवाच आईने पाठवली. मस्तच लागते ही भाजी.
धन्यवाद जागू! अगदी योग्य वेळी
धन्यवाद जागू! अगदी योग्य वेळी टाकलीस. कालच वसईवाल्याकडून जुड्या आणल्या आहेत. या पद्धतीने करुन बघते.
मस्त
मस्त
जागू, माझी प्रचंड आवडती भाजी.
जागू, माझी प्रचंड आवडती भाजी. लहानपणी पालेभाज्या न खाण्याच्या वयातही हीच पालेभाजी खायचो.
आमच्याकडे डाळींब्या घालून केली जाते.
म स्त दि स त आहे....
म स्त दि स त आहे.... वसईवाल्याकडे असते पण कधि केलि नाहि अजुन... के लि पाहिजे एकदा..
डाळिंबी उसळ वेगळी चापावी आणि
डाळिंबी उसळ वेगळी चापावी आणि ही भाजी चणाडाळ, मूगडाळ घालून करुन खावी (डाळिंब्या फुकट घालवू नयेत) :डाळिंबी उसळ अत्यंत प्रिय असलेली बाहुली:. शेपूची भाजी मी अशी करते. फोडशी केली नाही कधी.
आमच्याकडे नाही मिळत ही भाजी..
आमच्याकडे नाही मिळत ही भाजी..

जागूडे एकदम यम्मी दिसतेय भाजी..
आमच्याकडे नाही मिळत ही भाजी..
आमच्याकडे नाही मिळत ही भाजी..

जागूडे एकदम यम्मी दिसतेय भाजी..
मस्त जागू . Thanks
मस्त जागू . Thanks
रचना, शर्मिला, स्मितू, माधव,
रचना, शर्मिला, स्मितू, माधव, सृष्टी, सारीका, सामी धन्यवाद.
अश्विनी डाळींब्यांच्या बाबतीत अगदी सहमत.
डाळिंब्या फुकट घालवू नयेत >>
डाळिंब्या फुकट घालवू नयेत >> ज्यात डाळींब्या असतात तो (शाकाहारी) पदार्थ चविष्ट असतो(च).
जागु ताई मस्तच भाजी झालि
जागु ताई मस्तच भाजी झालि आहे.नक्कि करुन बघ्नार.
माधव :स्म्ति: मानसी धन्यवाद.
माधव :स्म्ति:
मानसी धन्यवाद.
जागू, मी या धाग्यासहितच त्या
जागू,
मी या धाग्यासहितच त्या खालच्या १९ लिंकाही पाहिल्या
तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे
आजच केली. पूर्वी लसूण घालत
आजच केली. पूर्वी लसूण घालत नव्हते. आज घातला आहे. छान झाली आहे.
तोंपासु गं जागू.
तोंपासु गं जागू.
अगं यातील खुपश्या भाज्या
अगं यातील खुपश्या भाज्या माहीत सुद्धा नाहीत.
धन्यवाद
बेफिकीर तुम्हाला आशिर्वाद
बेफिकीर तुम्हाला आशिर्वाद
दिवा घ्या, धन्यवाद.
मधु, दक्षिणा, आश धन्यवाद.
कोनि अलुचे किवा पालकअचे फतफते
कोनि अलुचे किवा पालकअचे फतफते कसे करतात ह्यचि रेसिपि देइल का?
अरि इथे आहे अळूचे
अरि इथे आहे अळूचे फतफते.
http://www.maayboli.com/node/17006
अरे, हीसुद्ध भाजी मि नाही
अरे, हीसुद्ध भाजी मि नाही खाल्ली.... पश्चिम-महाराष्ट्रात मिळते का? आता लक्ष ठेवीन बाजारात...
आजच ही भाजी बेसन पीठ पेरून
आजच ही भाजी बेसन पीठ पेरून केली. चांगली लागली.
मी सुद्धा आज पहील्यांदाच
मी सुद्धा आज पहील्यांदाच मुगाच्या डाळीबरोबर केली ,छान झाली होती.
मी आज ही भाजी मुगाची डाळ,
मी आज ही भाजी मुगाची डाळ, कांदा, लसूण, ओलं खोबरं घालून केली. मस्त झाली होती.
(याचा अजून एका पाकृचा धागा आहे ना? तिथे बघून केली.)
खुप छान आहे.
खुप छान आहे.