व्हेज सिझलर

Submitted by रेव्यु on 23 June, 2012 - 09:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवर इ, कृतीत पहा

क्रमवार पाककृती: 

मी आज व्हेज सिझलर केले. मस्त झाले.( ही सर्व कृती फारशी तर्क संगत म्हणजे एका विशिष्ट पाककृतीच्या घराण्यास अनुसरून नाही ).
साहित्य- कॉलिफ्लॉवर ( फ्लॉरेट-हळद व मीठाच्या पाण्यात घालून डिसिन्फेक्ट करून घ्या), २ मिडियम साईझ स्लाईस्ड बटाटे ( फिंगर साईझ्-तळून घ्या). फ्रेंच बीन्स ८-१० -१ इन्च कापून, २ मध्यम वांगी , फिन्गर स्लाईस्ड, गाजर १ -फिन्गर स्लाईस्ड, बटन कांदे -१० -१२, मोठा कांदा रिंग स्लाईस, बेबी कॉर्न ८-१० , मक्याचे दाणे वाटीभर, ---हे सर्व पाण्यात घालून २० मि -सेमि हार्ड बॉईलहोई पर्यंत उकळा.
पाणी काढून गार पाण्याखाली धरा व वेगळे ठेवा.
४ मोठे लाल टोमॅटो उकळा व साल काढा. १ इंच आले, एक अख्खी लसूण ( म्हणजे १२ पाकळ्या, ८-१० हिरव्या मिर्च्या, ४ लवंगा, व उकडलेले टोमॅटो पेस्ट होईपर्यंत ग्राईंड करा व मसाला वेगळा ठेवा.
एक वाटीभर दाण्याचा कूट करा.
आता कढईत ३ चमचे ऑलिव्ह ओईल टाका व मध्यम तापू द्या, त्यावर हा मसाला टाका व थोडासा परतून घ्या.
त्यात दाण्याचा कूट टाका- वरतून सर्व भाज्या टाका ,चवीनुसार मीठ घाला,पाणी टाका व जरा घट्ट होईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्या.
पाऊण पाकीट बँबिनो नूडल्स (शेवया)उकळत्या पाण्यात टाका- २ मि. शिजवा व गार पाण्याखाली सीव्ह करून घ्या.
आता एका चिनी मातीच्या प्लेटवर पत्ताकोबीची पाने सजवा. त्यावर १ १/२ ते २ पोर्शन नूड्लेस ठेवा व ही प्लेट माय्क्रो मध्ये २ मि ठेवा.
बाहेर काढल्याबरोबर भाजी पसरवा, वर बटाट्याच्या फ्रेंच फ्राईज , तांबड्या मिर्चांची कोर्स पावडर व अ‍ॅरिगानो पसरा व लगेच वन बाय वन सर्व्ह करा.
बरोबर रेड वाईनचा ग्लास आणखी लज्जत आणतो. फोटो येथे लोड करता येत नाहीये.
कसा करू? ती पिकसो वरील लिंक दिसत नाही या फोटोसोबत. फोटो पिकसो वर लोड केला आहे
लिन्क देत आहे बघूया
https://picasaweb.google.com/106902849445596370240/June232012#
टीप : माझ्याकडे ती स्किलेट नाही , पण ती फक्त वातावरणनिर्मितीसाठी असते

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
स्वत्;ची कृती
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेव्यु, आणखीन एक. संपादनात पेजच्या एकदम खाली जाऊन फक्त गृप सभासदांकरता न ठेवता सार्वजनिक करा म्हणजे सर्चमध्ये मिळेल.

वावावा
छान झालंय.
पार्टी कधी देताय? Wink
प्रतिसाद लिहिण्याच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' असे म्हटले आहे नं? तिथे तुमच्या पिकासा च्या फोटो ची लिंक डकवता येइल.

फोटो मस्त. Happy
चिनी मातीच्या प्लेटमध्ये होतात का चांगले? माझ्याकडे सिझलर प्लेटस् नाहीत. म्हणून मी टाळते नेहमी.

अरे वा मस्तच!!!

इतके दिवस मी प्लेट नाही म्हणुन बाचकत होते करायला... आता ही क्रुती एकदम फ्रेंडली वाटते आहे... ह्या शनिवारचा बेत ठरला.....

( नाही तरी माझी मुलगी योकोज च्या सीझलर वर एकदम मरत असते... तिला जर कळलं की आई पण करु शकते तर नक्कीच कॉलर ताठ आईची......)

आधी भांड्यात करून घ्यायचे अन मग चिनी मातीची भांडी म्हणजे प्लेट, सगळे पसरून मायक्रो मध्ये हीट करायचे . फार टॉप होतात. आत्म प्रौढी म्हणून नाही Happy पायपिंग हॉट सर्व्ह करा[वन बाय वन्/उत्कंठा वाढवित अन मग वाट्टेल तितके इंप्रोव्हाईज करा