Submitted by सुधाकर.. on 17 June, 2012 - 11:55
असंभव जगण्याला, चुचकारते आहे मरण.
पारध्याच्या वेधाने, चित्कारते आहे हरण.
अरे कुठे गेले ते पांडव सारे,लढवैय्ये?
पैशावरती बळाचे येथे,होते आहे हरण.
येऊ नको रे हरिश्चंद्रा,वध होईल तुझा.
सत्तेला ही सत्व येथे जाते आहे शरण.
रक्ताळलेले गिधाड,भयभीत होऊन कलकलले,
दयावान बुध्दाचेही,रचले, जाते आहे सरण.
आसवांवर तुझ्या अता विश्वास तरी कसा ठेऊ?
इथे सैतान ही अंभंगाचे गाते आहे चरण.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जमेल जमेल
जमेल जमेल ...............
प्रयत्न चालू ठेवा............
प्रगती आहे थोडीफार..............अजून हवी आहे !!
काफिये जमलेत बर्यापैकी ...............
खायालातही सुसूत्रता आहे यावेळी...............
जरा वृत्त आणि मराठीचा लोचा आहे ...............
असो .............
अभिनन्दन
चालुद्या आम्ही वाचतो आहोत .................
तुमची चिकाटी , रोज एक गझल करण्याची तड्फड पाहून माझे जुने दिवस आठवतात (फार नाही आठएक महिन्यापूर्वीचे )
धन्यवाद
छान
छान
अंहं. नाही आवडली ही.
अंहं. नाही आवडली ही.
अंहं. नाही आवडली ही. >>> सेम
अंहं. नाही आवडली ही.
>>>
सेम हीअर
भयभीत असा शब्द आहे.
भयभीत असा शब्द आहे.
सर्वांचे आभार..!
सर्वांचे आभार..!
गझलतंत्राचा व्यवस्थित परिचय
गझलतंत्राचा व्यवस्थित परिचय करून घ्या असे सांगावेसे वाटते
कृ गै न