बालम की गलीं में.........!

Submitted by सुधाकर.. on 13 June, 2012 - 14:04

हां... ये रसमें ये कसमें सभी तोड के,
तु चली आ चुनर प्यार की ओढ के |
या चला,....जाऊंगा,...मै ये जग छोड के |

सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्‍हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, ज्यानी बॉलिवुड्च्या दुनियेला पुराणी यादें
म्हणुन तिन हजाराहून अधिक गाणी दिली. आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ए॓कणारा प्रत्यकजन पुर्णपणे
नाहूण निघेल तो म्हणजे मुकेश यांचा. ( चित्रपट - कटीपतंग)

जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहेरना नही |

जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां,
उस गलींसे हमें तो गुजरना नहीं |

आजही बहुतेकानां वाटतं, की खरंच ते जुने दिवसच किती सुंदर होते. पण आज ते राहीलं नाही. आणि
माणसा-माणसातील ते सात्वीक प्रेमही उरले नाही. कोणास ठाऊक तसं झालं आहे काय, पण खर्‍या प्रेमाची
त्या वेड लावणार्‍या क्षणांची आणि क्षणा क्षणाला आठवण करून देणार्‍या खर्‍या प्रेमाची एक अस्सल अनुभूती
या शब्दातच नाही का? त्या चोरून भेटण्याच्या जागा, रानफुले, नदी किणारे, झाडा झुडुपांचे आडोसे आणि
रात्रीचा चंद्र कोरून येणारं निखळ चांदणं. आपल्याच नकळत हे किती तरी आपल्या प्रेमाचे साक्षीदार असतात.
व म्हणुनच त्या ठिकाणी आपण परत कधी एकटेच गेलो तर एक क्षणभर देखिल थांबनं किती मुश्कील होऊन जातं.

या गाण्याचं पहीलं कडवं, जे मला अतिशय आवडतं -

जिंदगी में कई रंग रलीयाँ सहीं,
हर तरप मुस्कुराती ये कलीयाँ सहीं,
खु-बसु- रत बहारों की गलीयाँ सहीं |

जिस चमन में तेरे पग में काटें चुबें,
उस चमन सें हमें फुल चुनना नहीं |

जिस गली में...........................!

आSss हा.ss.हांssss फुलांची फुलबाग असो वा सोन्याची सुवर्णनगरी, जिथे माझ्या प्रियेला किंचीतस ही
दु:खं पोहोचेल, अशी वाटच मला चालायची नाही. या पहील्या कडव्यातच आनंद बक्षी यांना दाद दिल्या शिवाय
दुसरा पर्यायच उरत नाही. या अप्रतिम निर्मितीत आणखी एक सिंहाचा वाटा म्हणजे आर.डी. बर्मन यांचा. अतिशय अफलातुन असं संगीत त्यांनी दिले आहे. गाण्याचं प्रत्यक कडवं संपताच एक बासरी(फ्लुट) वाजते. काळजाला स्पर्श करून जाणारी. फार व्याकुळ वाटतं तेंव्हा.......!
katipatang_0.jpgAanand Bakshi_0.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्‍हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही.' अगदी खरे..प्रत्येक चांगल्या गाण्यात एक व्यक्तिमत्व लपलेले असते तसेच एक कथानकही.
सुंदर लिहिलेत.

ऑर्फिअस माझंही हे एक आवडतं गाणं....
नवलाईच्या काळात असं कुणी आपल्याला म्हणावं असं वाटायला लावणारं गाणं Happy