या कीसाची पूर्व तयारी असली तर आयत्यावेळी १० ते १५ मिनिटात केव्हाही तयार करता येतो म्हणुन झटपट कीस म्हटले आहे.ऑफ सीझन खायला खुपच छान.'ओळखा पाहु' च्या लायनीतला /कॅटेगरीतला आहे.
पांढरी मक्याची कणसे. हिंदी भाषिक यालाच भुट्टा असे म्हणतात .
कणसाच्या अंदाजाने तूप.
जेव्हा गोड कीस करायचा असेल तेव्हा अजुन थोडेसे तूप,साखर, प्रमाणात गरम पाणी व दूध.बदामाचे काप.
प्राथमिक तयारी करण्यासाठी भुट्टयाचे दाणे किसणीवर किसुन घ्यायचे.दाणे दळदार्,दुधीया/गोड असावे.
किसाच्या प्रमाणात तूप घेवुन हा कीस मध्यम आचेवर बदामी रंगावर खरपुस भाजुन घ्यावा.
थंड झाल्यावर मिक्सर मधे रवाळ वाटुन घ्यावा. आता हा कीस एका हवाबंद झाकणाच्या डब्यात भरुन फ्रीज मधे [फ्रीजर मधे नाही] ठेवायचा आहे.असा तुपात परतलेला कीस चार महिने आरामात टिकतो.
जेव्हा कीस करायचा असेल तेव्हा वाटीच्या प्रमाणात कीस काढुन घेवुन बाकी उरलेला पुन्हा फ्रीज मधे ठेवावा.
साधारण १५ ते २० मिनिटे आधी काढुन एका प्लेट मधे पसरुन ठेवावा.१ मोठा चमचा तूप घेवुन त्यात हा कीस घालुन परतुन घ्यावा.त्यात प्रमाणात गरम पाणी व दुध घालुन,झाकण ठेवुन शिजवुन घ्यावा व नंतर साखर घालुन पुन्हा एक वाफ आणावी वरुन बदामाचे कप घालुन आस्वाद घ्यावा.
टिपा-
१] पाणी व दुध दोन्ही घालुन शिजवायचे.म्हणजे कीस मऊ होतो.
२] साधारण रव्याच्या शिर्याप्रमाणेच करायचा आहे.
३] तूपात परतुन मिक्सरमधे रवाळ वाटुन फ्रीज मधे ठेवायचे आहे. हे मिश्रण टि़काऊ असते.त्यामुळे सिझन नसताना भुट्ट्याचा गोड कीस करता येतो..चवीला खुपच अप्रतिम लागतो.
साधारण पावसाला सुरवात झाली कि बाजारात मक्याच्या भुट्ट्यांची / कणसांची सुरवात होते..आज पावसाची सर पाहुन या गोड कीसाची आठवण झाली.म्हणुन पाकृ.लिहीली आहे.त्यामुळे प्रचि.देता येत नाही.
पण तुम्ही करुन पहा.नक्की आवडेल तुम्हाला "भुट्ट्याचा गोड कीस"
गोड कीस..
गोड कीस..
छान.
छान.
छानच
छानच