नूडल्स ब्रेकफास्ट - फोटोसह

Submitted by दिनेश. on 7 June, 2012 - 14:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
या मोठ्या पकिटात साधारण चार जणांना पुरतील एवढ्या होतात. भाज्या मात्र भरपूर हव्यात.
माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

दिनेशदा ,

किती प्रकार बनवलेत !!!!

प्रत्येक प्लेट वेगवेगळी दिसतेय.

अगदी तोपांसू ! झकास !!

अह्हाहा.... ए-वन.... मस्त दिसतायत सगळेच प्रकार Happy

मी देखिल अश्याच नुडल्स वापरते. यात राईस, व्हीट, बकव्हीट अश्या व्हरायटीच पण मिळतात.

मी ब़कव्हीट नूडल्स वापरल्या.भाज्या-मटर-गाजर -कोथिंबीर-टोमॅटो सॉस घालुन त्याचे असे "देशीकरण"केले व फिरंगींना खाऊ घातलें.।ही नवीन चव त्यांना खुप आवडली.

जबरी दिसतेय. मस्तच..
मी पण करते अशा नूडल्स भरपूर भाज्या घालून. पण तुमच्या फारच सुबक दिसताहेत.
बरं, "या " नूडल्स म्हणजे काय? त्या दोन मिनिट वाल्या सोडून इतर कुठल्याही चालतात का? भारतात कुठल्या ब्रँडच्या बर्‍या आरोग्याच्या दृष्टीनं?

दिनेशदा...

खरच सुगरण आहात. नुसता स्वयंपाक नाही तर ताट ही सजवता आले पाहिजे. खरच तुम्ही संजीव कपुर आहात माबो वरचे.........

सगळे एकाचवेळी नाही, पण बहुतेक रविवार सकाळचा हा ब्रेकफास्ट असतो. मायबोलीकरांना दाखवायला म्हणून खायच्या आधी फोटो काढून ठेवतो !

संघमित्रा, भारतातला नेमका ब्रँड आता आठवत नाही, पण हक्का नूडल्स मागितल्यावर नक्कीच मिळतील.

पण हक्का नूडल्स मागितल्यावर नक्कीच मिळतील

मला वाटलेले हक्का नुडल्स पण तळलेल्याच असतात. इथे हक्का नुडल्स मिळतात पण त्या गोल असतात, चपट्या नुडल्स फक्त चायनिज हॉटेलात बघितल्यात.

इथेच माबोवर योगिताने टाकल्यात पिठाच्या नुडल्स, त्या वापरुनही करता येईल पौष्टीक नाश्ता.

प्रत्यक्ष पदार्थ करताना दाखवता येत नाहीत, ही मोठी त्रुटी आहे ना !

सगळ्या त्रुट्या कमी करायचे काम नेट नेटाने करतेय. पदार्थ बनवताना कोणालातरी विडिओ काढायच्या कामाला लावा आणि मग तुनळीवर चढवा आणि द्या इथे दुवा. हाकानाका....

साधना, परत कधी मोठ्या दुकानात गेलीस तर विचारून बघ. म्हणजे तो ब्रँड मला सांगता येईल.
बहुतेक मिळतातच.
(रविवारी ज्यावेळी मी ब्रेकफास्ट करतो त्यावेळी सर्व नैरोबी गाढ झोपेत असते ! )

दिनेशदा, एवढा यम्मी आणि हेल्दी ब्रेफा असेल तर काय मजा येइल. भरपेट खा पण कॅलरीजची काळजी नको. मी अगदी हाच्च ब्रेफा बनवणार उद्या.

संघमित्रा, पुण्याची आहेस का? दोराबजी, कॅम्प मधे नुडल्सचा वेगळा सेक्शन आहे. खुप वरायटी मिळते.

धन्स दिनेश.
मनिमाऊ, होय पुण्यातच. दोराबजीत चॉकलेट्स सेक्शन, श्रूजबेरी बिस्किट्स आणि वरचा मजला हे सोडून बाकी आठवत नाहीये Happy पण बघेन आता जाऊन.

संघमित्रा, अगं दोराबजी आता ३ मजली झालं आहे. बिलिंग सेक्शनच्या बरोबर मागे चिंग्ज आणि मॅगीचे रॅक्स आहेत. त्या रॅकची मागची बाजु म्हणजे भरपुर वरायटी नुडल्स. हल्ली तिथे मदत करायला फारसं कोणी दिसत नाही. काही मिळत नसेल तर फार शोधाशोध करावी लागते.

Pages