एका अनोळखी वाटेवरून तू आणि मी चालत होतो. हातात हात कधी गुंफले गेले .. कळालेच नाही .आपण बोटांशी खेळता खेळता एकमेकांच्या कवेत हरवून गेलो .काय होते ते ? तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी !! चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...
आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित !! शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले ? ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे !! चूक कि बरोबर ठावूक नाही , पण कसल्याशा जाणीवेतून आपल्यातले अंतर वाढले .
तू माझ्या नजरेसमोर असताना अचानक तुझ्या माझ्यातले अंतर केव्हा वाढले मला उमगलेच नाही . तू दूर दूर जात राहिलास . आणि आता .. आता आठवणींमध्ये एका ठिपक्याएवढा दिसतोस . मी एकटीच आहे या बेटावर ... तुझ्या एका कटाक्षासाठी , तुझ्या स्पर्शासाठी आसुसलेली ... लाटा आदळतात विचारांच्या आणि त्यांचे तुषार झेलत मी एकटीच उभी आहे ... तुझी वाट पाहत ....येतील का या अनोळखी वाटा कधी एकत्र ?
(No subject)
रुपाली, किती दिवसांनी
रुपाली, किती दिवसांनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निंबुडा - लग्नाचा परिणाम
निंबुडा - लग्नाचा परिणाम
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)