Submitted by इन्ना on 6 June, 2012 - 03:10
भारतात रहाणारे कोणी डिश वॉशिन्ग मशिन वापरतात का? त्याचे फायदे , तोटे, उपयुक्तता याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा!
: कामवाली बाई ह्या प्रक्रणाने त्रस्त बाहुली:
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरदाने फोन/ इमेल करायची वाट
वरदाने फोन/ इमेल करायची वाट बघितलीस का?
झालंच तर मग!
मी ओटा करून झालाय आधीच.. आणि
मी ओटा करून झालाय आधीच..
आणि सुक्या गच्च्या एवढ्या मोठ्या नाहीत की सगळी यंत्र मावतील.
बघ की नी.. वरदाबै लय बिजी...
बघ की नी..
वरदाबै लय बिजी...
आणि तू प्रखर आशावादी..
आणि तू प्रखर आशावादी..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@ किरणः तुमचा खालील प्रतिसाद
@ किरणः तुमचा खालील प्रतिसाद वाचला.
थोडंसं विषयांतर.. माझ्या सहका-याने एक सिस्टम बसवलीये. एका मोठ्या स्टील पाईपमधून पाणी खेळवलंय. त्या पाईपच्या दोन्ही बाजूंनी मोठे सोलर पॅराबोलिक रिफ्लेक्टर्स ( आरसे) अशा रितीने बसवलेत कि जसा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल तसे ते आरसे त्याच्या बाजूने तोंड वळवतात पण त्यांचा फोकस मात्र पाईपच्या त्याच भागावर पडत जातो. अशा रितीने ३५० डिग्री से ची स्टीम सोलर एनर्जी वर तयार होते. या स्टीम वर १०००० लोकांचा भात आणि इतर शिजवण्याचे जिन्नस पाच मिनिटात तयार होतात. हीच स्टीम पुढे नोझल्सच्या सहाय्याने डिश वॉशरला दिली आहे. दहा हजार लोकांची ताटं पाच मिनिटात लखलखीत होतात.
याबद्दल अधिक माहिती आणि काही सम्पर्क असल्यास हवा आहे.
धन्यवाद.
फ्री-स्टँडिंग डिशवॉशर आणि
फ्री-स्टँडिंग डिशवॉशर आणि बिल्ट-इन डिशवॉशर यांच्यातले फरक, फायदे/तोटे (असल्यास) काय असतात? बॉशच्या साईटवर दोन्ही प्रकारचे दिसतायत.
फ्री स्टँडिंग म्हणजे वॉम
फ्री स्टँडिंग म्हणजे वॉम सारखं कुठेही फिट करता येइल. बिल्ट इन म्हणजे ओटा इ करतांना (किंवा आपल्याला हव्या त्या मॉडेल चे डामएशन्स सोडून ओटा करणे इ) त्याखाली फिट होणारे (हे तुलनेने महाग असतात).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिसेंटली माझ्या कलिग ने घेतलं आहे. उत्तम अनुभव आहे म्हणालाय. लोड करण्याचा काय जो वेळ आणि बारकासा लर्निंग कर्व तेव्हढाच. बाकी चकचकीत भांडी आणि दुसरी कसली कटकट नाही, सो ही इज हॅपी विथ दिस न्यू पर्चेस
हो योकु, घ्यायचं नक्कीच केलंय
हो योकु, घ्यायचं नक्कीच केलंय मी जवळपास. पण या दोन प्रकारच्या डिशवॉशर्सच्या कामाच्या क्वालिटीत किंवा विजेच्या/पाण्याच्या वापरात वगैरे काही फरक असतो का, असा प्रश्न आहे. इनबिल्टची किंमत जास्त का असते?
म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये फ्रंट लोड असेल तर जास्त चांगलं असं म्हणतात, तसं डिशवॉशरमधे काही आहे का? कारण किमतीत बराच फरक दिसतोय.
नक्कीच घ्या आम्ही एक महिन्या
नक्कीच घ्या आम्ही एक महिन्या पूर्वी घेतलाय. खूपच फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बायको जाम खुश आहे :). आम्ही LG चा घेतला. जरा किंमत जास्त आहे पण २ कारणासाठी घेतला:
१. बाकी सगळ्यांना खूप वेटिंग आहे - २ महिने
२. ह्याची quality एकदम उत्तम आहे. आणि वीज बचत पण होते. रोज वापर असल्याने quality ला प्राधान्य दिले आहे.
विजय सेल्स मधून घेतला .
Pages