२ कप मैदा (all purpose flour, self rising किंवा साधे)
१ बटर स्टिक (अर्धा कप बटर)
१ कप साखर
१ मोठा चमचा बेकिंग पावडर (self raising असेल तर लागणार नाही.)
३ अंडी (रुम टेम्परेचरला आणून)
१ कप ऑरेंज ज्यूस (किंवा पायनॅपल, ऑरेंज-पायनॅपल, ऑरेंज-पीच आवडेल तो)
३ मोठे चमचे vodka.
चिमूटभर मीठ.
उपकरणे-
स्टँड मिक्सर किंवा हँड ब्लेंडर
९ इंच व्यासाचा बेकिंग पॅन (इतर आकार चालतील)
अव्हन
- बटर फ्रीजमधून बाहेर काढून रुम टेम्परेचरला आणावे.
- अव्हन ३७५ फॅ. ला गरम करुन घ्यावा.
- मैदा बेकिंग पावडर घालून चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालावे.
- मग बटर स्टँड मिक्सर किंवा ब्लेन्डरने मध्यम स्पीडवर अर्धा मिनिट फेटावे.
- मग त्यात हळूहळू साखर घालावी आणि फेटावे.
- एकजीव झाल्यावर एकेक अंडे फोडून घालावे. प्रत्येक अंडे घातल्यावर एक मिनिट फेटावे.
- मग मैदा आणि ज्यूस घालत जावे.
- शेवटी vodka घालून फेटावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
- बेकिंग पॅनला तुपाचा हात लावून वरुन मैदा भुरभुरावा.
- मिश्रण पॅनमध्ये ओतून अव्हनमध्ये ठेवावे.
- ३०-३५ मिनिटे बेक करावे.
- पॅनच्या मध्यभागी टुथपिक घालून केक बेक झाल्याची खात्री करुन घ्यावी. टुथपिकला मिश्रण चिकटले तर अजून थोडा वेळ बेक करावे.
- पॅन बाहेर काढून थंड झाल्यावर केक पॅनमधून सुटा करावा. किंवा वॉर्म खायचा असेल तर प्लास्टिक सुरीने पॅनमध्येच कापून तुकडे सुटे करावेत.
हा केक पाउंड केकसारखा दिसतो.
vodka कोणतीही वापरु शकता. मी हनी व्होड्का वापरली. केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे. ज्यूस-व्होडकाचे प्रमाण झेपेल तसे कमी-जास्त करु शकता.
सांगितलेल्या उपकरणांशिवाय वेगळी उपकरणे वापरु शकता. पण रिझल्ट वेगळा येईल त्याची तयारी ठेवावी, कदाचित जास्त चांगलाही येऊ शकतो.
जबरदस्त दिसतोय केक, मॉईस्ट
जबरदस्त दिसतोय केक, मॉईस्ट आणि फ्लफी. :)..
(----- काय ते खरंच सुचवा ;))
वोडका ऐवजी ----- वापरलं तर चालेल का ?
------- काय ते मागे लाजोनं
------- काय ते मागे लाजोनं लिहिलंय.
'-----' इथे चॉकलेट पण चालेल
'-----' इथे चॉकलेट पण चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'रम' पण चालेल.
'रम' पण चालेल.
हम्म, ते पाहीले होते मागच्या
हम्म, ते पाहीले होते मागच्या पानावरचे , पण मिंट इसेन्स अजिबात नाही आवडत मला , आणि चॉकलेट पण नको... आल्मंड इसेन्स त्यातल्यात्यात चांगलं वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोले.... :आहा: रम मारो रम....
लोले.... :आहा:
रम मारो रम....
@मवा<<, कॉफी वापरू शकतेस... ऑरेंज + कॉफी मस्त फ्लेवर लागतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा लाजो सही आयडीया आहे
अरे वा लाजो सही आयडीया आहे ऑरेंज + कॉफी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतोय केक. ही हनी
मस्त दिसतोय केक.
ही हनी व्होडका कशी लागते? गोड चव असते का?
ही हनी व्होडका कशी लागते? <
ही हनी व्होडका कशी लागते? < पहिल्या घोटाला थोडी गोड लागते.. नंतर... काहीही कळत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबराट दिसतोय.. वीकेंड ला
जबराट दिसतोय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वीकेंड ला करणार..
पहिल्या घोटाला थोडी गोड
पहिल्या घोटाला थोडी गोड लागते.. नंतर... काहीही कळत नाही >> अनुमोदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतोय केक. गटारीला
मस्त दिसतोय केक.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गटारीला करावा का?
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्होडका, रम वा तत्सम
व्होडका, रम वा तत्सम द्रवांशिवाय हा पदार्थ करायचा असल्यास त्याला नुसतेच 'केक' म्हणावे. धन्यवाद.
केकचे 'हनी' हे नाव
केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे >>
मस्तचं
केक ओव्हनमधे आहे. बेस्ट ऑफ लक
केक ओव्हनमधे आहे. बेस्ट ऑफ लक म्हणा आता मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी हनी व्होड्का वापरली.>>>>>
मी हनी व्होड्का वापरली.>>>>> ओक्के तर हा एक व्होडकाचा प्रकार आहे तर! मला वाटलं हल्ली आमच्या देशात हनीओट्स बिस्किटं मिळतात. यात हनी आणि ओट्स असतात. अगदी मस्त हनीची प्रॉमिनन्ट् चव असणारी. तसं व्होडका आणि हनी घालून केलेला केक असं वाटलं.
असो.........पण लोला केक मस्तच!
नंदिनी, झाला असेल
नंदिनी, झाला असेल आत्तापर्यंत..
लोला ....
लोला ....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खाऊन पण झाला असेल तिचा.
खाऊन पण झाला असेल तिचा. खाण्याच्या नादात फोटो काढायलाही विसरली असेल.
लोला, मस्त दिसतोय तुझा केक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोला, काल केला होता केक. मी
लोला, काल केला होता केक. मी वोडकाऐवजी रम वापरली. ऑरेज ज्युससोबत थोडेसे संत्रासाल पण किसून घातले (झेस्ट???)
बेकिंगसाठी मात्र मला जवळजवळ ५० मिनिटे लागली. केक मस्त झाला होता मात्र.
Pages