आकाशवाणीवर गझल मुशायरा

Submitted by अभय आर्वीकर on 2 June, 2012 - 23:24

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

दि. ०३ जुन २०१२ ला यवतमाळ आकाशवाणी वरून (१०२.७) रात्री ९.३० वाजता मराठी गझल मुशायर्‍याचे प्रसारण करण्यात आले.

या मुशायर्‍यात सिद्धार्थ भगत, ललित सोनवणे, मसूद पटेल, प्रा. रुपेश देशमुख, गंगाधर मुटे, पवन नालट, प्रमोद चोबितकर. विनय मिरासे, उज्वल सरदार यांचेसह अनेक गझकारांचा सहभाग होता.

यवतमाळ आकाशवाणी प्रसारणाचा संपादीत भाग येथे ऐकता येईल.

गुलमोहर: 

यवतमाळ आकाशवाणी म्हणजे तुमच्याच भागात ना? रेकॉर्डिंग मिळालं तर घ्या आणि लिंक द्या परवानगी मिळाल्यास...

हार्दिक अभिनंदन !

या मुशायर्‍याला थोडी दु:खाची झालर सुद्धा आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरीत आपले मायबोलीकर गझलकार विद्यानंद हाडके यांनी आकाशवाणीला भरपूर मदत केली. सर्व गझलकारांचे पत्ते मिळवून त्यांना निमंत्रणे पाठविणे वगैरे कामात हाडके यांचे खूप योगदान आहे.

पण मुशायर्‍याला हजर राहण्यासाठी संजय इंगळे, अनंत नांदुरकर यांचेसमवेत यवतमाळकडे येत असतांना त्यांच्या चारचाकीला मोठ्ठा अपघात झाला. गाडी कंपाऊंडवालवर आदळल्याने ती भिंत कोसळली. पलटी झाल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले. पण,

सुदैवाने सर्वच अगदी सुखरूप बचावले. साध्या किरकोळ जखमा देखील झाल्या नाहीत.

मात्र ते मुशायर्‍याला उपस्थित राहू शकले नाहीत. Sad