मला भेटलेल्या अफलातून वल्ली # ३

Submitted by Mandar Katre on 31 May, 2012 - 13:51

मला भेटलेल्या अफलातून वल्ली # ३

चिपळूण –कराड रोड वर अलोरे गावी “शाह्नुर बाबा” यांचा एक दर्गा आहे .सदरहू दर्गा हा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून खूप प्रसिद्ध आहे . या दर्ग्याची ख्याती अशी की येथील प्रमुख पुजारी चक्क हिंदू आहे . अशोक वडगावकर ही व्यक्ती गेल्या कित्येक वर्षापासून या दर्ग्याची सर्व व्यवस्था पाहते .

या दर्ग्या मध्ये अडल्या-नडल्या सर्व प्रकारच्या व्यक्ती दर्शनासाठी येतात . त्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण येथे होते . चिपळूण चे दानशूर लोवलेकर कुटुंबियांनी येथे खूप सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दर्ग्यामध्ये सप्तशती-नवचंडी हवन आणि गणेश-याग या सरखे यज्ञ विधी ही झालेले आहेत ,तेथे यज्ञ-कुंड ही आहे .

तर मंडळी ,आजच्या विषमतेने आणि धार्मिक विद्वेषाने भरलेल्या युगात खरी धर्मनिरपेक्षता आणि सर्व-धर्म समभाव .श्रद्धा/भक्ती यांचे अनोखे दर्शन जर कोणाला अनुभवायचे असेल तर या दर्ग्याला जरूर भेट द्या ....................

गुलमोहर: