मोठ्यांसाठी बालकविता : झाडं असतात विद्यार्थी

Submitted by ग्लोरी on 31 May, 2012 - 05:07

झाडं असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरू असतात
झाडांचीही परिक्षा असते झाडंसुद्धा पेपर देतात
ऊन पाऊस वादळवारा अवघड अवघड विषय असतात
झाडांनाही ताण येतो झाडंसुद्धा कंटाळतात
अशावेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात
जगत राहणं यालाच झाडं खरं मेरीट म्हणत असतात
वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाही
उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत .....

- ग्लोरी

गुलमोहर: