लेकाला हत्ती खूप आवडतो , म्हणून असचं काहीतरी बडबडत होते
पण प्रत्येक वेळी 'हत्तीदादा हत्तीदादा'' नाही म्हटल की त्याला वाटायचं की मी दुसरचं कुठलं गाणं म्हणतेय. मग कुरकुर करायचा .
म्हणून प्रत्येक ओळीत हत्तीदादा आला.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
हत्तीदादा हत्तीदादा दिसता किती छान
ईवले ईवले डोळे आणि सुपाएवढे कान
हत्तीदादा हत्तीदादा खांबासारखे पाय
भले मोठे पोट तुम्ही खातातरी काय
हत्तीदादा हत्तीदादा लांबलचक सोंड
दोन दात बाहेर आणि रिकामेच तोंड
हत्तीदादा हत्तीदादा डुलत डुलत चालता
छोटीशी शेपुट हळुहळु हलविता
हत्तीदादा हत्तीदादा बाप्पासारखे दिसता
खरं सांगा बाप्पा तुमचा दादा आहे का?
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्वस्ति
मे २०१२
******************************************
तुहा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी
*******************************************
केवळ अप्रतिम....... जियो,
केवळ अप्रतिम....... जियो, जियो...
माझ्या कवितेची आठवण करून
माझ्या कवितेची आठवण करून दिलीत .
http://www.maayboli.com/node/24299
आवडली
आवडली
धन्यवाद !
धन्यवाद !
छान कविता. कल्याण
छान कविता.
कल्याण इनामदारांच्या पुढील कवितेची आठवण झाली
हत्तीदादा हत्तीदा झुलता किती छान
मिचीमिची डोळे आणि सुपासारखे कान
अगडबंब अंगाला खांबाएवढे पाय
दोनच दात दाखवण्याची सवय झाली काय
बप्पाच्या सोंडेपरी सोंड आहे तरी
हत्तीदादा बप्पाची होते का बरोबरी......
(पुढच्या ओळी पाठ नाहीत)
ग्लोरी
ग्लोरी
मस्तच आहे... क्युट एकदम...
मस्तच आहे...
क्युट एकदम... प्रत्येक वेळी 'हत्तीदादा हत्तीदादा'' वापरल्याने जास्ती गोड वाटतीये