क्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा)

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 May, 2012 - 11:13
cranberry sauce
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
crnb_pkt.jpgcrnb_sz.jpg
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून

(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)

क्रमवार पाककृती: 

१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
crnb_wash.jpg
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्‍याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
crnb_mush.jpg
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.

cr_sauce.JPGcran.JPG

७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)

अधिक टिपा: 

नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)

माहितीचा स्रोत: 
एक ज्येष्ठ मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ टे स्पू ब्राउन शूगर , १/२ टी स्पू दालचिनी पूड मिक्स करुन बनाना ब्रेड / मफिन बेक करताना वरतून पसरायची . मस्त क्रंची टॉपिण्ग होतं

वा वा प्राजक्ता, छान दिसत आहे ..

हा माझा उर्वरीत वृत्तांत ..

तर एकदा फोडणी प्रकरण आटोक्यात आल्यावर क्रॅनबेरीज् पटापट आळल्या .. मी जीर्‍याची पूड, फोडणीतही मोहोरी घातली .. ब्राऊन शुगर नेहेमी सांगतात त्याप्रमाणे पॅक करून घातली एक कप .. पण जरा आंबट चव लागली .. घरच्या सदस्यांनां फार आंबट चव आवडत नसल्याने मग आणखी थोडी अ‍ॅड केली पण आणखी थोडी च्या निम्मी च अ‍ॅड करायला हवी होती (;)) .. तसंच मी मॅश केल्या नाहीत क्रॅनबेरीज् मला अगदी स्मूथ टेक्स्चर आवडत नाही म्हणून ..

तेव्हा फायनली माझी ही साठा उत्तरांची कहाणी आवरती घेते ..

पुढच्या लोकांनां टिप्स् अशा की अंदाजापेक्षा मोठंच भांडं घ्या, कढई घेता आली तर उत्तम .. क्रॅनबेरीज् नीट निथळून घ्या .. घाईघाई करू नका .. आणि मध्ये मायबोलीवर पोस्ट्स् टाकण्याचा मोह आवरा, त्यापेक्षा शेगडीजवळ उभं राहून क्रॅम्नबेरी सॉस चला चलाके करा .. ह्या सगळ्यामुळे नंतर करायला लागणारी साफसफाई आटोक्यात राहील .. Lol

Cranberry sauce 2.jpg

सशल, मस्त भांडं आणि फोटो. Happy
(तुझ्या बॅकस्प्लॅशचाही टाकायचास ना. :P)

>> अंदाजापेक्षा मोठंच भांडं घ्या, कढई घेता आली तर उत्तम
बेलीशेप्ड स्टॉकपॉट (आपल्या हांडीसारखं - आवळ तोंडाचं - भांडं) जास्त चांगलं. म्हणजे शिंतोडे कंट्रोलमधे राहतात.

सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी धन्यवाद स्वाती आंबोळे..
मेथ्या आणि जिर्याचा स्वाद अफलातून...

एक प्रश्न- हा मेथ्यांबा मुबलक करून डीप फ्रीज करून चांगला राहील का?

हा सॉस डच अवन टाईप भांड्यात (मोठ्या तोंडाचं), तर काचेचं जाड झाकण ठेवायचं पॉपिंग होइतोवर. नंतर ते झाकण एक धुतलं की झालं. फोटो भारी हैत. क्रॅन्बेरीज मागवाव्या लागणार Happy

चिवा, डीप फ्रीज करायची आवश्यकता नाही. नुसता फ्रीजमधेही राहील वर्षभरसुद्धा. पाण्याचा हात/चमचा लागू देऊ नकोस मात्र.

सुपर सुपर सुपर रेसिपी!
मी फ्रोजन क्रॅनबेरीचा (मागच्या वर्षी सिजनमधे ताज्या घेऊन फ्रिज केल्या होत्या) केला Happy
रात्रभर बाहेर ठेवल्या होत्या, मस्तच प्रकार आहे. खुप खुप धन्यवाद स्वाती!
chatani 001.jpgchatani 002.jpg

प्रिती मस्त आलाय कलर. सशल मस्त फोटो.
मी परवा टाकलेला (थँक्स गिव्हिंग भाषण टाकून )हा फोटो वाहत्या बाफ वर. आता इथे टाकते.
रेसीपी क्लास आहे एकदम. थँक्स बाई.

परवा हा आयता खायला मिळाला... अस्ले प्रकार आवडीनी खात नाही म्हणुन घाबरतच ताटात घेतले आणि मग भसाभसा २ दा पुन्हा घेतला... अपतिम चव आहे ह्याची.

वा वा सीमा फोटो एकदम भारी आहे .. बोके छान जमला आहे क्रिस्मस ट्री चा .. Happy

(BTW चमचा धरून उभं रहायची ड्युटी लावलीस कोणाला की तो बाटलीच्या कडांवर रेस्ट झाला ? ;))

ह्यांचं मांजर प्रेम लिंनि नाही वाटतं .. शो. ना. हो.! सीमा, ही सिंडरेला बघ काय म्हणते युझ्या फोटोबद्दल .. Proud

ए सुटा इथनं. ओ बाई , यांना बघा जरा. Proud

सशल, चमचा रेस्ट झालाय कडांवर. Happy

मृ Happy छे गं. हे टेक्नीक जरा जमाल्लय येवढचं.

सिंडा बोके बघ. http://digital-photography-school.com/how-to-take-beautiful-bokeh-christ...
इथून शिकतीये मी पण.

मॅक्स मी Kerr च्या बॉटल वापरते कॅनिंग साठी. ही बॉटल त्यातली आहे. अ‍ॅक्च्युअली प्लॅन होता कि मैत्रिणीना ही चटणी कॅन करून द्यायची. TG ला जमले नाही.

मी ह्या पद्धतीने पीचची चटणी करावी असा विचार करतीये समरमध्ये.

अप्रतिम फोटो सीमा. फूड मेगझिनमध्ये असतात तसा प्रोफेशनल लूक आहे फोटोला.
हा सॉस/चटणी वाटीत घेऊन खायचा प्रकार आहे Happy

सीमाच्या फोटोत नीट पाहिल्यास बाटलीवर तिच्या समोरच्या भिंतीवरील पडदा पण दिसतो आहे. Wink
आता सीमा हाणायला याच्या आत पळते इथून.

चेष्टा जौदे पण सीमाचा फोटो खरोखर खूप आर्टिस्टिक आला आहे.

पण ही रेसिपी पहिलीच जी मला स्वतःला फारशी आवडली नसून पण मी २ वेळा केली Happy
धन्यवाद इबा.

स्ट्रॅबेरीला पाणी खूप सुटतं. त्यामुळे शिजवायला जास्त वेळ लागेल कदाचित.

सध्या माझ्या फाकोंचा पोपट होण्याचे दिवस आहेत बहुतेक Wink

Pages