कोरेगाव पार्क

Submitted by नताशा on 27 May, 2012 - 16:31

मध्यंतरी दीपांजली यांनी कॅम्पाविषयी एक धागा सुरु केला. तेव्हापासूनच कोरेगाव पार्कासाठी ही एक धागा असावा (मुख्य म्हणजे इथल्या रेस्टॉरंट्स साठी) असं वाटत होतं. आज मुहुर्त लागला. बहुतेक मुद्द्यापर्यंत पोचेपर्यंत भरपूर वहावत जाणार आहे मी. Wink

मला पुण्यात पहिली नोकरी मिळाली तोपर्यंत मी फारशी पुण्याला आले नव्हते. जेव्हा केव्हा लहानपणी आले असेन तेव्हा औंध, कोथरुड, डेक्कन वगैरे भागातच राहिले होते. शिवाय माझ्या मनात ऐतिहासिक पुस्तकं आणि पुलंची पुस्तकं वाचून पुण्याविषयी एक वेगळेच रम्य चित्र होते. पुणं म्हटलं की लालमहालातून तुटक्या बोटांनी पळणारा शाहिस्तेखान, घोड्यांवर बसलेल्या शिपायांच्या बंदोबस्तात पालख्यांमधून सारसबागेत दर्शनाला जाणार्‍या पेशवे स्त्रिया, "काका मला वाचवा" म्हणत पळणारे नारायणराव किंवा मग थेट डेक्कनचे इंटरनॅशनल दिक्षीत, हिराबाई बडोदेकरांचे गाणे ऐकणारे रास्तापेठ, पुलं राहात असलेले (आणि मी "आहे मनोहर तरी" वाचून इमॅजिन केलेले) घर, असं एक वेगवेगळ्या रंगाच्या काचांचं पण एक सुबक, सुरेख, एकसंध कॅलिडोस्कोप माझ्या मनात तयार व्हायचं. थोडक्यात माझ्या मनातल्या पुण्याला कॉस्मोपॉलिटन कल्चरचा गंध ही नव्हता आणि रंगही नव्हता.

नोकरीसाठी पाऊल ठेवलं आणि पहिलंच घर मिळालं बोट क्लब रोडला. ऑफिससाठी तेच सोयीचं होतं आणि मित्र्-मैत्रिणीही तिथेच राहाणार होते. नाही म्हणायचं कारण नव्हतंच. पण मला मात्र मनातल्या मनात काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूच्या परिसरात माझ्या मनातल्या पुण्याची एक काचही नव्हती. मी तोपर्यंत राहात आलेल्या शहरांत अन पुण्यात काहीच फरक दिसेना. बदललेल्या पुण्याचा जरा रागच आला. मग आता इथेच राहायचं तर जरा आजूबाजूला बघु तरी काय आहे, असं म्हणून कॅम्पात, कोरेगाव पार्कात ज्या चकरा चालू झाल्या त्या अजूनही सुरुच आहेत.

नवीन नोकरी अन त्यात मिळणारा "एकटीसाठी भरपूर" पगार ;), नवे मित्रमैत्रिणी, २००५ चा अंदाधुंद पाऊस अन कोरेगाव पार्क असा मस्त माहोल बनला. त्यावेळी आमच्या शेअर्ड घरात स्वयंपाकाची काहीही सोय नव्हती. सगळ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळाही नक्की नव्हत्या. त्यामुळे दिवसा ऑफिसमध्ये अन रात्री सहसा बाहेर जेवणे हा बेस्ट उपाय आम्ही शोधला. मग "आज रात्री जेवायला कुठे जायचं" यावर रोज सकाळच्या नाश्त्यानंतर लगेच चर्चा सुरु होई. फोन्सच्या अन मेल्सच्या फैरी झडत. रोज हायफाय रेस्टॉरंट्स मध्ये जाणं परवडणारं नव्हतंच. त्यामुळे आम्ही महिन्याचं, आठवड्याचं असं बजेट ठरवून जेवायला जायचो. आठवडा म्हणजे शुक्रवार रात्र ते पुढच्या शुक्रवारची सकाळ. Happy त्यामुळे विकेंड्ला आमचं जे बजेट चांगलंच तगडं असायचं, ते पुढचा गुरुवार येईपर्यंत अगदी मरतुकडं व्हायचं. Wink त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत विकेंड म्हणजे कोरेगाव पार्क/कल्याणीनगर आणि वीकडेज म्हणजे सहसा १-२ दिवस ऑफिसचं कॅन्टीन, एखाद दिवस फळं खाऊन डिटॉक्स ;), १-२ दिवस ढोलेपाटील रोडचे छोटेछोटे जॉइंट्स असं इक्वेशन होतं.

तर या सगळ्या मजेत अनेक मस्त रेस्टॉरंट्स सापडले. त्यातले काही अजूनही इतक्या वर्षानंतर चांगले चालले आहेत. काही नवीन उघडलेले रेस्टॉरंट्सही छान आहेत. आठवतील तसे त्याबद्द्ल लिहावे असा विचार आहे. तुम्हीही आठवेल तशी भर घाला.

प्रेम्स (Prem's): हे अगदी को.पा. च्या मध्यवर्ती भागात आणि ओशो आश्रमापासून जवळ असल्याने इथे सतत परदेशी लोकांची वर्दळ असते. मेन्यु सुद्धा त्या ग्राहकवर्गाला डोळ्यासमोर ठेऊनच बनवला आहे. उत्तर भारतीय, कॉन्टिनेन्टल आणि चायनिज. पैकी उत्तर भारतीय आणि चायनिज ठीक असते. पण कॉन्टिनेन्टल मात्र मस्त. अर्थात किती ऑथेन्टिक असते याची मला कल्पना नाही, पण मला आवडले. आउटडोअर सीटींग आहे. एकदा धुवाधार पावसात (फ्रेंडशिप डे असावा बहुतेक Wink लहान होतो हो आम्ही, सोडून द्या झालं ;)) तिथे आम्ही वेगवेगळ्या लोकांनी मिळून व्हेजि. ऑ-ग्राटिन, पास्ता विथ स्पिनाच, कुठलेतरी सिझलर्स, कुठलेतरी नुडल्स अन ग्रेव्ही, मसाला पापड-दाल माखनी-जीरा राइस वगैरे असा निव्वळ अतरंगी मेन्यु मागवला होता. ते जेवण खरंच टेस्टी होतं की वातावरणाचा परिणाम माहीत नाही, पण प्रेम्स अगदी प्रिय झालं.

पंजाबी रसोई: हे को.पा. तलं स्वस्त अन मस्त ढाबा टाइप, झालर रहित (नो फ्रील्स) रेस्टॉरंट होतं. एका गाळ्यात मालक पंजाबी पदार्थ बनवत असायचा. लेन नं ७ बहुतेक. बाहेर उघड्यावर (इमारतीच्या कंपाउंडच्या आत) टेबल- खुर्च्या मांडल्या असायच्या. मर्यादित मेन्यु होता. पण सगळेच प्रकार अफाट असायचे. पुण्यात एकमेव "ऑथेन्टिक" पंजाबी चवीचा हा ढाबा होता. लस्सी, काली दाल, माह की दाल, पनीर, कबाब, तंदुरी रोटी, मक्केकी रोटी-सरसोंका साग असं सगळंच मस्त. अन २ जणांना शाकाहारी जेवणाला १०० रुपये फारतर लागायचे. त्यामुळे आमचं फेवरेट. मध्यंतरी हे बंद पडलं (अतिक्रमणामुळे). आता थोड्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरु केलंय. पण मी जाऊन पाहिलं नाहीये.

नॉटी एंजल्स: खरं म्हणजे हे एक ७-८ टेबल्स असलेलं छोटंसं कॅफे आहे. बाहेरून काही विशेष असेलसं वाटतही नाही. पण इथे काही वेगवेगळेच प्रकार खायला/प्यायला मिळतात.मेन्यु बदलत असतो. वेगवेगळे सॅण्डविचेस, कोल्ड कॉफीज, आइस्ड टीज, जॅकेट पोटॅटोज, ज्युसेस,सॅलड्स, पास्ता यासाठी एकदम मस्त. एकदा आम्ही भर पावसात सकाळी ६ वाजता पुण्याबाहेर एक ४०-५० किमीची ट्रिप आखली. एका मित्राकडे कार होती. ती घेऊन सकाळी ६-८.३० वेड्यावाकड्या पावसात अन कॅन्टॉनमेंट, सोलापूर रोडच्या हिरवाईत नुसतीच नि:शब्द पणे कार फिरवली. (पेट्रोल बरंच स्वस्त होतं तेव्हा!) तिथून सरळ नॉटी एंजल्स मध्ये. तिथला माणूस आम्हाला पाहून थक्कच झाला. इतक्या पावसात कोण येणार असा विचार करून तो एक शाल गुंडाळून, वर्तमानपत्र टेबलवर पसरुन वाचत बसला होता. पाऊस, धुकं आणि हिरवाई यामुळे अगदी हिल स्टेशनला आल्यासारखं वाटत होतं. त्याने स्वतःच आम्हाला "हनी जिंजर ब्लॅक टी प्या, थंडीत मस्त वाटेल" असं सांगितलं. अन नंतर मॅश्ड पटेटोज खा असाही सल्ला दिला. Happy

कोयला: हैद्राबादी जेवणाच्या चहात्यांसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. चिकन/मटन बिर्यानी, हलीम, कुबानी का मीठा, डबल का मीठा वगैरे खास हैद्राबादी पदार्थ अगदी खास चवीसह मिळतात. आतली बैठकीची व्यवस्था ही निझामी पद्धतीची आहे. एफ्.सी. रोड चं कोयला तितकं खास नाहीये. म्हणजे चव जरा वेगळी असते. को.पा. मधल्या कोयला चीही चव आजकाल पहिल्याइतकी ऑथेन्टिक राहिली नाही असं मला वाटतं. किंमतही फार जास्त वाटते.

बार्बेक्यु नेशन: बार्बेक्यु प्रेमींसाठी स्वर्ग! हे कल्याणीनगरात आहे. इथे जायचे असेल तर आधी टेबल बुक करणे मस्ट. सदैव वाट बघावी लागते. अगदी वीक डेज ला सुद्धा. बुफे आणि आ-ला-कार्ते असे दोन्ही पर्याय आहेत. बुफे पर्याय जास्त चांगला. इथे टेबलवर शेगड्या असतात अन त्यावर बार्बेक्यु skewers आणून ठेवतात. हिवाळ्यात मजा येते. हे चेन रेस्टॉरंट असल्याने बंगलोर, मुंबई, दिल्ली वगैरे बर्‍याच शहरात आहे.

क्रमश:

गुलमोहर: 

मस्त लेख. शिवाय तुमची जीवनशैली आवडली. छान असतात हे दिवस. पुण्यात हैद्राबादी जेवण मिळते? धिस इज न्यूज टू मी.

वॉव नताशा. बोट क्लब रोडला रहाणं म्हणजे लकीच. कसला पॉश एरिया आहे तो. मी MMBला जायचे तेव्हा इतकं वेगळंच वाटायचं त्या भागात. एक रस्ता ओलांडुन गेलं कि ढोले-पाटील रोडला भरपुर खादाडी. Happy नंदु'ज, चैतन्य, मधुबन ( मी इथे कधी गेले नाही), पुर्वीचं बॉम्बे ब्राझियरी (आता ओह कोलकता), मेनलँड चायना, सिगरी, कपिलजवळचे काटी कबाब, जस्ट बेक्ड इ इ. न संपणारी यादी. हे बोटक्लब रोडवरच असताना कोरेगाव पार्कपर्यंत जायची गरजच नव्हती.

पण तरी जर ओलांडुन गेलंच तिथेपर्यंत तर को.पा. मधे - स्क्विसिटो ( यम्मी इटालियन फुड), कोयला ( एफ सी रोडवर आहेच, पण आता एक लुल्लानगरमधे ही चालु होतं आहे), ग्रेट पंजाब, प्रेमस मधले सिझलर्स, नॅचरल्स आइसक्रीम, मलाक्का स्पाइस, संजीव कपुरचं यलो चिली, पोस्ट ९१ थोडं पुढे रिवर व्ह्यु, हार्ड रॉक कॅफे, फ्लॅग्ज इ इ. होकी-पोकीमधली फंडु आइसक्रीम्स, आजुबाजुची चिल्लर शॉपिंग, टॅटु स्टुडियोज, स्पाज, पार्लर्स. कोरेगाव पार्क म्हणजे मस्त विकेंड्स. Happy

पुर्वी कोरेगाव पार्क म्हणजे माझ्यासाठी जर्मन बेकरी. तिथल्या अगणित आठवणींना कसं विसरता येइल? Sad

नताशा, केपीच्या नॉर्थ मेनमधील मार्केटाविषयीही लिही ना!! Happy

ही माझी काही (अल्पशी) भर :

मलाका स्पाईस.... इथे एकदा धो धो पावसात गरमागरम सूप व स्टार्टर्स चा आस्वाद घेतला होता. लै भारी!!

झामूज प्लेस.... ढोले पाटील रोड.... पारसी क्यूझिन साठी मस्त. बर्‍याच वर्षांपूर्वी अनेक दुपारी इथे घालवल्यात :नॉस्तॅल्जिक भावली:

मधुबन... कधीही खिशाला परवडू शकेल असे. नन्दूज पराठाज... मस्त मस्त पराठे! Happy

ते पेस्ट्रीज मिळणारे ठिकाण... नाव विसरले :| चॉकलेट अफेअर का असंच काहीसं? तिथे एका थंडीच्या रात्री ब्राऊनीज वुईथ हॉट चॉकलेट सॉस... आणि गरमागरम कॉफी.... रात्री जवळपास १२ पर्यंत त्यांनी फक्त आमच्या ग्रूपसाठी इतर कोणी कस्टमर नसतानाही प्लेस ओपन ठेवले होते... तिथल्या २-३ प्रकारच्या पेस्ट्रीज चाखल्या होत्या तेव्हा. चव चांगली होती. सँडविच बरे होते. खास आवडले नाहीत.

आर्थर्स थीममध्ये त्यांच्या मर्यादित शाकाहारी डिशेस मधील ज्या पदार्थांची नावे मला आजही उच्चारता येत नाहीत त्या चीज युक्त पदार्थांची चव लाजवाब होती.

प्रतिसादांसाठी धन्यवाद लोकहो. बरेच दिवस रोमात असल्याने उशीर झालाय.

मनीमाऊ तुला तर अगदी पाठ दिसतोय हा भाग (माझ्यासारखाच) Happy
तू लिहिलेले सगळेच रेस्टॉ. मस्त आहेत. फक्त ते ग्रेट पंजाब मला नाही आवडत विशेष. मेन्यु फारच मर्यादित आहे अन चवही तितकी खास नाही वाटत मला.

अरुंधती, लिहिते गं जमेल तसं. नाही तर तूच लिहि ना त्या मार्केटविषयी. माझा कधी मुहुर्त लागेल काही भरोसा नाही. Happy ते झामुज मी नावामुळे नेहेमीच टाळलंय. फारच विनोदी नाव आहे "झामुज" Proud

स्वाती, जाफरान तर मला फार फार आवडतं. स्पेशली लंच बुफे साठी. किती प्रकार असतात.. कॉक्टेल्स, मॉकटेल्स, स्टार्टर्स, चाटचे ४-५ प्रकार, सॅलड्स चे ७-८ प्रकार, डिझर्टस मध्ये ८-१० पदार्थ, शिवाय मेन कोर्स मध्ये १५-२० पदार्थ (इंडियन, थाय, इटालियन, चायनीज, मेक्सिकन इ.इ.) मी मेन कोर्स सोडून सगळं खाते. मेन कोर्सला भुक उरत नाही Wink

महेश, वेगळेपणा हवाच नं? सगळीकडे तेच तेच बोअर नाही का होणार? Happy

अ.मामी, पुण्यात आल्यावर कोयला ला भेट नक्की द्या. अस्सल हैद्राबादी नसले तरी त्याच्या सगळ्यात जवळचे जेवण तिथेच मिळते.

श्री, कधीकाळी गेलात तर यातले काही बंद झालेले असतील. Wink

किरण, ते कॅफे डिलाइट नाही माहीत मला. कुठे आहे ते?

वाडियात असताना आम्ही now & then मध्ये सतत जायचो SPDP खायला.
ग्रेट पंजाब मसत आहे. मधुबन पण बरेचदा जायचो.
सिगरी मध्ये जेवण कसं होतं त्याची चव आठवत नाही पण माहोल मस्तच.

कॅफे डिलाईट ना ?
वाडीयाच्या समोरचा पेट्रोलपंप आहे ना... त्याच्या रांगेत. दोन इमारती सोडून.... तळमजल्याला आहे !

ढोलेपाटील रोडचं मधुबन आजही मस्त आहे.

आयडू! तू कधी गेलास पंजाबी रसोईला? आवडलं नं? मस्तच आहे ते.
क्रमश: पूर्ण होणारच नाहीये. जसं जसं नवीन ट्राय करेन, तसं इथे लिहेन. Happy

काल मी कल्याणीनगरला एक चॉकलेट स्टोरी म्हणून दुकान आहे, तिथे गेले. फार मजा आली. तिथली चॉकलेट बुकेज ही कल्पना आवडली मला. म्हणजे फुलाम्च्या ऐवजी रंगीत कागदात गुंडाळलेले फुलांच्या आकारांचे चॉकलेट्स. असा बुके मला कोण देणार? :ड्रीमी: शिवाय चॉकलेट्चे वेगवेगळे आकारांचे सेट्स होते..म्हणजे पेन्सील्स, क्रेयॉन्स, कॉइन्स, मेकप किट्स, बुद्धीबळ संच वगैरे..लहान मुलांनाच कशाला, मलाही ते घ्यावेसे वाटत होते.

नताशा, त्या चॉकलेट स्टोरीच्या मालकिणीची, निकिता मल्होत्राची मुलाखत मी इथे माबोवर दिली होती गेल्या वर्षी Happy http://www.maayboli.com/node/19588