पोपट

Submitted by Geetanjalee on 21 May, 2012 - 02:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल ओली मिरची १० ते १२ , लसूण, मीठ लिंबू , मोहरी तेल

क्रमवार पाककृती: 

एकदम लाल भडक ओली मिरची आणि लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
त्यात हवी असेल तर जिरे पावडर टाका मीठ आणि लिंबू पिळून घ्या

आता कडकडीत तेला मध्ये मोहरी फोडणी टाकून त्यावर ओता.
फ्रीज शिवाय सुद्धा ३ -४ दिवस टिकतो , उलट जसा शिळा होईल तसा छान लागतो

अधिक टिपा: 

ह्याच्या रंग पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल दिसतो म्हणून ह्याला पोपट म्हणत असावेत बहुतेक , पण चव एकदम मस्त !!! Happy

pot-puja.blogspot.com

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे रंगाने लाल पण तिखटाला कमी, अशा मिरच्या मिळतात. त्या वापरुन बघतो.
(या मिरच्या खास माझ्यासारख्या लोकांसाठीच असतात !)

हो तिखट असतो थोडा.... पण चव भन्नाट लागते..
दिनेशदा म्हणतात तसे रंगाने लाल पण तिखटाला कमी मिरच्य्याचाच करते मी पण....
आज आणला होता डब्यात ...खूप आवडला सगळ्याना.....