डाळमिरची

Submitted by Geetanjalee on 21 May, 2012 - 02:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूर डाळ ( १/४ वाटी ) , मिरची १2-15 , कडीपत्ता , कोथिंबीर, लसूण खोबरे मीठ लिंबू

क्रमवार पाककृती: 

१. तूर डाळ भिजवत ठेवावी
२. मिरची चे बारीक तुकडे करून घ्यावे आणि थोड्या तेलावर जिरे, हिंग,कडीपत्ता ,लसूण खोबरे फोडणी टाकून मिरची परतून घ्यावी
३. भिजलेली डाळ त्यात घालून, वरून लिंबू पिळावे आणि मिरची शिजली जाईपर्यंत गरम करावे....

अधिक टिपा: 

झणझणीत डाळ मिरचू ताज्या / शिळ्या भाकरी बरोबर खूप छान लागतो...

http://pot-puja.blogspot.com/

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे डाळगंडोरी सारखे वाटतेय पण त्यात डाळिबरोबर मिरच्या कुकरमधेच शिजवुन घेतात्...एकदम झणझणीत प्रकार असतो आणी पट्टिच्या तिखट खाणार्‍यांना जमतो( करायला नाही खायला!)

छान प्रकार आहे. पण मिरच्या जास्त वाटत आहेत. फोडणीला लसूण टाकून अजुन चव येईल असे वाटते.