Submitted by धनश्री गानु on 21 May, 2012 - 00:22
मला "German" भाषेतील freelancing" मधील संधींबद्द्ल माहिती हवी आहे.(भाषांतरातील संधी) भारतात यामधे किती संधी आहेत? तसेच प्रोजेक्ट्स मिळू शकतात का? फुल टाइम करिअर म्हणून याची निवड करता येइल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनश्री >> धन्यवाद हा धागा
धनश्री >> धन्यवाद हा धागा काढल्याबद्द्ल. मजजवळ फार काहि मदत होवू शकेल अशी माहिती नाहिये, परंतु मला देखिल माहिती हवी आहे !
मलाही माहिती हवी आहे. खरंच
मलाही माहिती हवी आहे. खरंच सांगा कोणीतरी.
http://www.cuttingedge.co.in/
http://www.cuttingedge.co.in/Translation-Freelancer.htm
मी देखील साईड करियरसाट्ई हाच विचार करतेय ..

i hope this website will help..
and www.goethe.de <-- याच्या लेवल्स जर्मन degree sarkha manu shakto.. mhanje jevdhi jasta level tevha jasta nyan ani mag nokrisathi suddha higher placement
-झरु
झरु >> ग्यॉथ मध्ये
झरु >> ग्यॉथ मध्ये freelancing आहे का?
माझ्यामते फारशा संधी नाहीयेत.
माझ्यामते फारशा संधी नाहीयेत. पण माझी माहिती फारच म्हणजे १४ वर्षे जुनी आहे.
हल्लीचे ठाऊक नाही. कोणीतरी लिहीलच.
सरळ कारण म्हणजे
जर्मन उद्योग मला फारसा दिसत नाही. Siemens/ Krupp /Deutsche Bank/Mercedes Benz/Bayer/Mannesman Dematic वगैरे सोडले तर पटकन जर्मन उद्योगसमुहांची नावे (आणि पर्यायाने अनुवादाच्या संधी) पटकन आठवत नाहीत.
International Organizations मध्ये कितपत संधी आहेत पहायला हवे.
Manufacturing मध्ये किती संधी आहेत कल्पना नाही.
मी सुरवातीला टाईमपास म्हणुन हेअर ड्रायरचे मॅन्युअल अनुवादित कर वगैरे उद्योग केला आहे. उत्पन्न शून्य. बाकी मज्जा खूप.
अतिशय तकनीकी भाषांतर करायचे असल्यास त्या विषयात पदवी हवी. उदा. इंजिनियरींग संबंधित कागदपत्रे वगैरे. मला तरी कलाशाखेतील पदवीमुळे तकनिकी भाषांतर जड गेले.
तुमची जर्मनमध्ये पदवी आहे का? त्याला पुरक असे अजून कुठले शिक्षण आहे?
भाषांतर यात करियर करणे हा आवडीचा भाग झाला. धडपड केली की काहीतरी गावायचे. मुळात शिकणारी मुले तुरळक आणि तरीही नोकर्या नाही. परकीय भाषा भाषांतर करण्याइतपत आत्मसात करायला निदान ३-४ वर्षे अर्धावेळ येवढा तरी कालावधी गृहित धरावा.
म्हणून अध्यापनाची वाट बरीच मुली/मुले चोखाळत.
मध्यंतरी मटा मध्ये लेख
मध्यंतरी मटा मध्ये लेख प्रकाशित झाले होते याच विषयावर. कोणाकडे लिंक असेल काय?
LINGUAL CONSULTANCY SERVICES
LINGUAL CONSULTANCY SERVICES (LC)
Mobile: +91 955 585 7976
Office: +91 11 32317678
Skype: Avishek.Gupta7
Web: www.lingualconsultancy.com
avishek.gupta@lingualconsultancy.com
याना काँटॅक्ट करा
माझ्या काही मैत्रिणींनी यात
माझ्या काही मैत्रिणींनी यात करिअर केलीये. त्यातल्या बहुतेकजणी या बी.ए. जर्मन आणि मॅक्स म्युलर भवनचे सगळे कोर्सेस करून मग जेएनयूतून एम.ए केलेल्या आहेत. जेएनयूतल्या या अभ्यासक्रमात भाषांतरतंत्र हा विषयही शिकवला जातो. त्यातल्या एकीचा ट्रान्सलेशन ब्यूरो आहे आणि एकजणीने आणखी पुढे बिझनेस जर्मन हा कोर्स करून जर्मन चेम्बर ऑफ कॉमर्स मधे नोकरी मिळवली. एकीने जर्मनच्या क्वालिफिकेशन्सवर नोकरी मिळवली पण ती आता टेक्निकल रायटींग आणि संबंधित क्षेत्रात आहे. पण एकुणातच या क्षेत्रात पुण्या-मुंबईत अनेक अत्यंत क्वालिफाईड लोक आहेत. शिवाय या अशा फ्रीलान्सिंग च्या संधी मिळून बस्तान बसायला वेळ लागतो - नेटवर्किंग जबरदस्त लागते इ. इ. आहेच.
माझीही माहिती फार अपडेटेड आहे असं नाही पण रैना म्हणते तसं फार संधी आहेत असं मला वाटत नाही.
कुठलीही भाषा शिकून प्राविण्य मिळवण्यासाठी निदान ४-५ वर्षं तरी लागतात हे लक्षात असूद्यात.
@धनश्री - तुम्ही जर्मन किती शिकला आहात? कुठून? तुम्हाला एकूणच यासाठी दिवसातला किती वेळ देणं शक्य आहे?
हे मला पडलेले भोचक प्रश्न नव्हेत तर या कळीच्या प्रश्नांच्या उत्तरांवर तुम्हाला किती आणि काय करता येणं शक्य आहे हे अवलंबून आहे
शुभेच्छा!
वरदा, मी जर्मन फक्त ११ वी आणि
वरदा, मी जर्मन फक्त ११ वी आणि १२ वी मधे घेतलं होतं, पुढे इंजिनीरिंग करताना शिकयचा विचार होता.पण ते शक्य झाले नाही. आता जर शिकायचं असेल तर पूर्ण वेळ देण्याची माझी तयारी आहे. अभ्यासात मी कमी पडणार नाही. मी आत्ता टेस्स्टिंग मधे काम करते आणि बाळाच्या प्रतिक्षेत आहे. जर freelancing करता आले तर बाळालाही वेळ देता येइल हा करिअर स्विच करण्यामागचा विचार आहे. अजून काही माहिती तुम्हाला मिळाली तर नक्की सांगा.
धनश्री, म्हणजे तुम्हाला
धनश्री, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून करायला लागेल. आणि आधी म्हणल्याप्रमाणे भाषांतरासाठीच्या भाषाप्राविण्यासाठी पुढची किमान ४ वर्षं. मॅक्सम्युलरचे कोर्सेस बर्यापैकी खर्चिक आहेत. पण ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. शिवाय हे सगळं करून मार्केटमधे उतराल तेव्हाच्या संधी काय असतील ते आत्ता कसं सांगता येईल? बस्तान बसवायला वेळ लागेल तो वेगळाच.. जोपर्यन्त बस्तान बसत नाही तोवर दिवसातले १५-१५ तास काम करताना मी फ्रीलान्सर्सना पाहिलंय. तुम्हाला शक्य होईल?
सॉरी, पण तुम्हाला आधीच जर्मन भाषा येत असती तर हे फ्रीलान्सिंग करणं जास्त शक्य झालं असतं असं मला वाटतं.
तुम्हाला करिअर स्विच साठी लगेच रिझल्ट्स देणारं दुसरं आणखी काय करता येईल हे तुमचे स्किल सेट्स आत्ता काय आहेत यावर जास्त अवलंबून आहे
वरदा +१. धनश्री- आपल्या
वरदा +१.
धनश्री- आपल्या बॅकग्राऊंडसाठी हा पर्याय तसा योग्य वाटत नाही. म्हणजे रस आहे म्हणून, सहज गंमत म्हणून शिकायचे असल्यास अगदी उत्तम. त्यात करियर करायचे असल्यास मात्र +५ वर्ष हा कालावधी गृहित धरा.

मॅक्सम्युएलर भवनचे कोर्स उत्तम पण ते संपले की लगेच भाषांतराची मनीषा धरणे हे म्हणजे विशारद करुन लगेच मैफलीत गायला बसण्यासारखे आहे. अतिशय टॅलेंटेड विद्यार्थ्यांना नक्कीच शक्य आहे. इतरांना अजून जास्त काळ मेहनत करायला हवी आणि करत रहायला हवी.
सर्वांना प्रतिसादाबद्द्ल
सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!
मॅक्सम्युएलर भवनचे कोर्स उत्तम पण ते संपले की लगेच भाषांतराची मनीषा धरणे हे म्हणजे विशारद करुन लगेच मैफलीत गायला बसण्यासारखे आहे.<रैना हे मात्र अगदी बरोबर आहे.> अगदी ५ नाही पण १-२ वर्षे यासाठी देण्याची माझी तयारी आहे. या काळात पार्ट टाइम छोटासा जॉब मिळाला तरी अनुभवासठी करण्याची माझी तयारी आहे. मुळात जर्मनला तेवढा स्कोप आहे का याची मला माहिती नाही. पण तुमची आणि वरदाची पोस्ट वाचून मी फेरविचार नक्कीच करीन.
बिट्स लि. या भाषांतर सेवा
बिट्स लि. या भाषांतर सेवा पुरवणार्या कंपनीने भाषांतरस्पर्धा आयोजित केली आहे.

फ्रेंच>इंग्लिश, जर्मन>इंग्लिश, जपानी>इंग्लिश, स्पॅनिश>इंग्लिश, इंग्लिश>हिंदी या जोड्यांमध्ये स्पर्धा घेतली जाईल.
विजेत्याला "Aspiring Professional Translator of the Year 2012" हे अॅवार्ड (रु. ११,००० कॅश प्राईज) दिले जाईल. भाषांतराचा उतारा इमेलद्वारे किंवा कंपनीत जाऊन घेता येईल. ईमेलः contest@bitsindia.co.in
अधिक माहितीसाठी खालील पोस्टर पहा.
वर्षा धन्यवाद्. ही माहिती
वर्षा
धन्यवाद्. ही माहिती दिल्याबद्दल.