उद्दामपणाचा कळस - हझल

Submitted by अभय आर्वीकर on 20 May, 2012 - 04:39

उद्दामपणाचा कळस - हझल

भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू

पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू

नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू
उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू

ओंगळ तू, वंगाळ तू, जसा मल सांडव्याचा गाळ तू
साचलेल्या डबक्यामधील कुंठलेले जळ म्हणजे तू

राहू-केतू तू, असुरांचे दृष्ट हेवे-दावे तूच
स्मशानभूमीत पिशाच्चांची अशांत वर्दळ म्हणजे तू

छल-कट शिरोमणी शकुनी तू, कळीचा नारद मुनी तू
दुनियेस हैराण करणारी चुगलखोर कळ म्हणजे तू

वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू
उद्दामपणाच्या वृक्षाला आलेले फळ म्हणजे तू

ना नर तू, ना नारायण तू, दहा मुखाचा रावण तू
सर्व विकारास 'अभय'दाते, सोयीचे तळ म्हणजे तू

- गंगाधर मुटे
_____________________________________

गुलमोहर: 

>>वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू
उद्दामपणाच्या कळसाचे "ते" शेंडेफळ म्हणजे तू<<

व्वा मस्त शेर.....:फिदी:
मी एक पर्यायी शेर सुचवतो बदल करुन पहा....!!!

वात्रट तू, वाह्यात मी, असतो इंद्रियांच्या कह्यात मी
उद्दामपणाच्या कळसाचे "ते" शेंडेफळ म्हणजे मी

तौबा तौबा ही हगवण...

ही हगवण थांबवायला काय करावे लागते
गोळी घ्यावी लागते वा लंघन करावे लागते

मयुरेश,

ही हगवण नाही, हझल आहे.
शब्दांची केलेली कारागिरी नाहीये. जशी हातात हातोडी-छन्नी घेतल्याने आपोआप कलाकृती निर्माण होत नाही, त्यासाठी शिल्पकाराच्या अंतर्पटलावर एखादी पुसटशी का होईना पण कल्पना/ शिल्प/मुर्ती तरळायला हवी असते. अंतरपटलावर जे दिसते तशीच मुर्ती/ शिल्प आकार घेत असते.

काल सायंकाळी उदभवलेल्या स्थितीमुळे जी माझी मानसिक हालत झाली, खरे तर त्याक्षणी कागद हातात घेऊन खरडण्याऐवजी निवांत झोपायला हवे होते. पण असे म्हणतात की मनुष्य जोशात आला की होश गमावून बसतो. त्यावेळी माझे नेमके तेच झाले. जोशील्या अवस्थेत लेखणी उचलल्याने त्या विवक्षित अवस्थेत कल्पनेने ज्या भरार्‍या घेतल्या त्या कागदावर उतरत गेल्या आणि आकारास आली ही कविता. ही रचना हझलेशी जवळचे नाते सांगते म्हणून ही हझल. ज्याला हझलेसारखी वाटत नाही तो या रचनेला आपापल्या इच्छेप्रमाणे काहीही म्हणायला मोकळा आहेच.

या हझलेचा कुणाही एका व्यक्तीविशेषासी काहीही संबंध नाही. ही केवळ माझ्या मनाची आंदोलने आहेत.

सरते शेवटी एवढेच म्हणतो की ही कविता/हझल मला माझ्या अपत्यासारखी आहे.
ही चांगली असली काय किंवा वाईट असली काय, माझी प्रतिष्ठा वाढवणारी असली काय किंवा धुळीस मिळविणारी असली काय; मला कोणत्याही स्थितीत प्यारीच आहे. आणि मला तिचा अभिमान आहे.

धन्यवाद...!

छान

विस्मयाजी, प्रकाशजी धन्यवाद.
------------------------------------------------------------------------
<<<< http://www.maayboli.com/node/41869?page=1
तिलकधारी | 28 March, 2013 - 19:28
१. मुटे - उद्दामपणाचा कळस ही हझल नव्हे, ती नुसती गझलतंत्रातील टीकात्मक रचना आहे. >>>>

तिलकधारी, ही रचना हजल का नाही, याविषयी सविस्तर, पुराव्यादाखल, काही पटण्यायोग्य दाखले देवून अभ्यासपूर्ण विवेचन कराल काय? Happy

ही रचना हझलेशी जवळचे नाते सांगते म्हणून ही हझल. ज्याला हझलेसारखी वाटत नाही तो या रचनेला आपापल्या इच्छेप्रमाणे काहीही म्हणायला मोकळा आहेच हे मी आधीच प्रतिसादात नमूद करून मान्य केले आहे.
या रचनेला हझल म्हणावी असा माझा अजीबात आग्रह सुद्धा नाही.

पण

ही रचना गझल आणि हझल सुद्धा नाहीच, असे ज्यांना आग्रहाने मत मांडायचे आहे, त्यांना याविषयी आपली मते मांडण्यासाठी मी आग्रहाचे निमंत्रण देत आहे. मात्र मला न पटणारे मुद्दे असल्यास त्याविषयी मी आपले मतप्रदर्शन करण्याचा अधिकार कायम ठेऊन आहे. (हे या साठी नमुद केले की निमंत्रीतांशी यजमानांनी वाद घालायचा नसतो, केवळ आदरातिथ्य करायचे असते, असा आपल्या/आमच्या हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे.)

निष्कारण इगो न जोपासता खुल्या दिलाने चर्चा केली तर चर्चेअंती काहीतरी निष्पन्न होतेच, हा माझा आंतरजालाबाहेरचा अनुभव आहे.

एखादीवेळ अगदी तसाच रचनात्मक प्रयोग मायबोलीवर करून पाहायला काय हरकत आहे. Happy

तिलकधारी, ही रचना हजल का नाही, याविषयी सविस्तर, पुराव्यादाखल, काही पटण्यायोग्य दाखले देवून अभ्यासपूर्ण विवेचन कराल काय?<<<

साक्षी पुरावे करायला तू नागपूरच्या स्थानिक कोर्टाचा निवृत्तीस तीन दिवस राहिलेला न्यायाधीश आहेस काय?

हझल वाचून हसू तर यायला पाहिजे ना? मनातील भडास काढली, गरळ ओकली आणि चाबूक फिरवून थैमान घातले की हझला होत नाहीत. एक मायबोलीकर अजय अनंत जोशी याच्या हझला वाच. एक मायबोलीकर डॉ. कैलास गायकवाड याच्या हझला (जसे तंबाखू) वाच.

स्वतःचा इगो सोडून जे प्रश्न विचारतात त्यांच्याशीच तिलकधारी इगो सोडून बोलतो.

तिलकधारी,
आपण दिलेले उत्तर समाधान होण्याजोगे नाही, या रचनेला हजल का म्हणू नये याचा उलगडा तुमच्या वरील पोस्टीतून होत नाही.

गझलेमध्ये विडंबनात्मक शब्दामुळे हास्य निर्माण होत असेल तर, किंवा ग्राम्य, शिवराळ भाषा वापरली असेल तर त्याला हजल म्हणतात, असे आजवर मला बर्‍याच गझलकारांनी सांगीतले आहे.

तुमचे मत ऐकायला आवडेल. Happy

मुटे,

हजलेचा उद्देश केवळ मनोरंजन हा असावा. टीकेला त्यात स्थान नसावे, चिमटे जरूर काढावेत पण ते मिश्कील भाषेत. तुम्ही वरील रचनेत जहरी टीका केलेली आहे जी हजलेची प्रवृत्तीच नाही, गझलेची तर बातच सोडा.

सहज चर्चा करण्यासारखा मुद्दा वाटला म्हणून भाग घेतला. गैर्समज नसावा!

चर्चेतून नोंद घेण्यायोग्य मुद्दे संकलन :

१) वरील रचनेत जहरी टीका केलेली आहे जी हजलेची प्रवृत्तीच नाही. (विजय दिनकर पाटील)

२) हझल ही गझलतंत्रातील अशी रचना असते जी हास्योत्पादक, काही वेळा द्वयर्थी, खिल्ली उडवणारी असते. वरील रचना ही बरीचशी व्यक्तीगत रोख असलेली व 'प्लेन टीकात्मक' आहे. ती हास्योत्पादक नाही (तिलकधारी)

३) - हझलेची एक साधी व्याख्या अशी करता येईल: हझल म्हणजे हास्यगझल. (विश्वस्त. सुरेश भट डॉट इन)

४) हझलेत ग्राम्यपणा असू शकतो. असतोच किंवा असलाच पाहिजे असे नाही. (ग्राम्य हा शब्दाचा अर्थ ग्रामीण असा नाही. त्यामुळे शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद चुकीचा.) (चित्तरंजन भट)

उदाहरणार्थ:

सोचता क्या है कमीने कुत्ते
देखता क्या है कमीने कुत्ते

ये तो अपनीही तेरी परछाई
भौंकता क्या है कमीने कुत्ते
-------------------------------------------------------------------------------------------
(ग्राम्य या शब्दाचा अर्थ अश्लील, असभ्य असा होतो.)
-------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------
असे जे काही मुद्दे येतील ते येथे संकलीत करुयात.

हझल ही गझलतंत्रातील अशी रचना असते जी हास्योत्पादक, काही वेळा द्वयर्थी, खिल्ली उडवणारी असते.

(वरील रचना ही बरीचशी व्यक्तीगत रोख असलेली व 'प्लेन टीकात्मक' आहे. ती हास्योत्पादक नाही)

मागे एकदा सुरेश भट डॉट इन वर याविषयी विचारले होते. त्यावर श्री चित्तरंजनजी भट यांनी खालीलप्रमाणे मत नोंदवले होते.

- हझलेची एक साधी व्याख्या अशी करता येईल: हझल म्हणजे हास्यगझल.

- हझलेत ग्राम्यपणा असू शकतो. असतोच किंवा असलाच पाहिजे असे नाही. (ग्राम्य हा शब्दाचा अर्थ ग्रामीण असा नाही. त्यामुळे शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद चुकीचा.)

उदाहरणार्थ:

सोचता क्या है कमीने कुत्ते
देखता क्या है कमीने कुत्ते

ये तो अपनीही तेरी परछाई
भौंकता क्या है कमीने कुत्ते

"या हझलेचा कुणाही एका व्यक्तीविशेषासी काहीही संबंध नाही. ही केवळ माझ्या मनाची आंदोलने आहेत."

असे मी वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र एका विक्षिप्त गझलकाराला डोळ्यासमोर ठेवूनच ही रचना प्रसूत झाली, हे बर्‍याच अंशी खरे आहे. Happy