नमस्कार,
जामिनावर बाहेर असलेले नेते/अभिनेते
ए.राजा
कनिमोझी
संजय दत्त
सुरेश कलमाडी
अमर सिंग
शायनी आहुजा.
यातले संजय दत्त आणि अमर सिंग हे अगदी निर्दोष सुटल्यासारखे वागत आहेत. संजय दत्तचे लग्न वगैरेसुद्धा होउन त्याचे अगदी व्यवस्थित चालले आहे.
अमर सिंग यांच्या किडन्या तुरुंगात असताना बिघडल्या होत्या. आता काही दिवसापुर्वी त्यांचा एका पेज थ्री पार्टीत जया प्रदा बरोबर फोटो पाहिला. चांगला तंदुरुस्त वाटत होता.
कनिमोझी जामिनावर सुटल्यावर ती पक्ष उभारणीसाठी काम करणार आहे असे तिच्या मुलाखतीत वाचले.
कलमाडी साहेबानी मानकर भाउना उपमहापौर बनवले. ते ऑलिंपिक कमिटीच्या बैठका अजुन अटेंड करत आहेत.
ए. राजा सुटल्यावर ढोल ताशे यानी त्यांचे स्वागत झाले. मिठाई वाटण्यात आली. त्यांच्यावरही पक्ष उभारणीची जबाबदारी येइल.
जामिन मिळणे म्हणजे सुटणे आहे का? आणि एकदा बाहेर आल्यावर हे नेते त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत ते नष्ट करणारच नाहीत असे कोर्टाचा समज आहे का? हे एक प्रकारे आपल्या राजकारण्याना प्रोत्साहन वाटते की हवे ते करा..काही दिवस तुरुंगाची हवा खा आणि मग जामिनावर बाहेर येउन काय वाटेल ते करा. उद्या आदर्श वाले सुद्धा असेच बाहेर येउन मजा करताना दिसले तर त्यात काय नवल..
कोणी जाणकार या लोकांचे भवितव्य काय ते सांगु शकतील का?
>>> जामिनावर बाहेर असलेले
>>> जामिनावर बाहेर असलेले नेते/अभिनेते
ए.राजा
कनिमोझी
संजय दत्त
सुरेश कलमाडी
अमर सिंग
शायनी आहुजा.
वरील यादीत अजून अनेक नावे आहेत. पद्मसिंह पाटील, दीपक मानकर, पुण्यातले अनेक नगरसेवक (सुभाष जगताप, सुनील कांबळे इ.), सुखराम, लालूप्रसाद यादव, येडाप्पा . . . ही यादी खूप मोठी आहे. यातल्या एकालाही शिक्षा होण्याची सुतराम शक्यता नाही.
:|
:|
नुसत्या संसदेतील अशा
नुसत्या संसदेतील अशा महापुरुषांची यादी केली तर १५० पर्यंत तरी जाईल असे अण्णा म्हणतात, तर अण्णांनी निवडणुक लढवून दाखवावी असे हे महापुरुष व संसदेतील इतर सर्वसामान्यांपैकीही बहुसंख्य सदस्य अण्णांना आव्हान देतात. आता संसद म्हणजे सार्वभौम (होली काऊ?)! खरे तर अण्णा आणी कंपनीला ती संसदेत मुसक्या बांधून आणू शकते त्यांचा हक्कभंग झाला म्हणून! पण केवळ दयाबुद्धीने त्यांनी अण्णांना फक्त इशारा दिला. तो अण्णांना समजेल अशी त्यांना खात्री आहे कारण संसद सर्व शक्तिमान आहे.
आता एक विरुद्ध कमितकमी साडेपाचशे (आपणच निवडून दिलेले) महापुरुष असा हा विषम सामना आहे.
अण्णा आता लढाईत गुंतलेल्या प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे', मुरारबाजी देशपांडे, सदाशीवरावभाऊ यांच्याप्रमाणे वाटू लागले आहेत.
परमेश्वर अण्णांना उदंड शक्ति, आयुरारोग्य व यश देवो! आणि सर्वशक्तिमान, सार्वभौम आणि प्रतिपरमेश्वरच अशा संसदेला सदविवेकबुद्धी देवो!
मुख्य प्रश्नाचं उत्तर
मुख्य प्रश्नाचं उत्तर माझ्यामते हे आहे कि जामिन म्हणजे पुर्ण सुटका नव्हे. तात्पुरती सुटका ती ही त्या माणसाची भक्कम हमी देणार्या व्यक्तीच्या हवाल्यावर.
आता वरती ज्या ज्या दिग्गज(?) मंडळींची नावं दिली आहेत त्यांच्यासाठी बहुतेक सरकार किंवा त्यांचा पक्षच जामिन रहात असेल.
जामिनावरच्या काही अटी असतात, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला तर ज्याने जामिन दिलेला असतो अशा व्यक्तिला पकडतात. जामिनावर सुटलेल्या व्यक्तिला अधुनमधुन पोलिस स्टेशनला हजेरी लावावी लागते. शिवाय प्रांत/देश सोडताना संबंधित व्यक्तिंना आधी सुचना द्यावी लागते. यात काही बदल झालेले असल्यास मला कल्पना नाही.
जामिन मिळणे म्हणजे सुटणे आहे
जामिन मिळणे म्हणजे सुटणे आहे का? >>>> जामीन मिळणे पुर्ण सुटका नाहि पण पण काहि restritcions वर सुटका.
आणि एकदा बाहेर आल्यावर हे नेते त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत ते नष्ट करणारच नाहीत असे कोर्टाचा समज आहे का?>>>>>> हे नेते आत असतानाच हे काम आरामात करु शकतात
जामिनावर सुटुन आल्यानंतर खटला
जामिनावर सुटुन आल्यानंतर खटला लांबविणे आणि त्या दरम्यान निवडून येणे, आपल्याविरूद्ध असलेले साक्षीदार साम दाम दंड भेद इ. युक्त्या वापरून फितविणे आणि मानाची पदे मिळवून एखाद्या विजयी वीराच्या थाटात चैनीत उर्वरीत आयुष्य जगणे ही या मंडळींची Modus Operandi आहे.
<आता वरती ज्या ज्या दिग्गज(?)
<आता वरती ज्या ज्या दिग्गज(?) मंडळींची नावं दिली आहेत त्यांच्यासाठी बहुतेक सरकार किंवा त्यांचा पक्षच जामिन रहात असे<> ???? सरकार = सीबीआय =पोलिस खाते या आरोपींना अटक करते. त्यांच्या जामीनाला ते विरोध करतील . स्वतःच जामीन कसे राहतील?
संजय दत्तला खालच्या न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात त्याने वरच्या न्यायालयात अपील केले आहे. अपिलाचा निकाल लागेपर्यंत त्याची जमिनावर सुटका केली आहे. तोपर्यंत त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत (जसे देशाबाहेर जाणे) या अटी जामिनात समाविष्ट आहेत. लग्न करू नय, चित्रपटांत काम करू नये अशा अटी नाहीत. जामिनासाठी अमुक ठिकाण सोडता येणार नाही/ तमुक ठिकाणी जाता येणार नाही अशा अटी असतात. खटल्यावर विपरीत परिणाम होईल अशा गोष्टी करण्यास मनाई असते.
संजय दत्तला खालच्या
संजय दत्तला खालच्या न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात त्याने वरच्या न्यायालयात अपील केले आहे. अपिलाचा निकाल लागेपर्यंत त्याची जमिनावर सुटका केली आहे
जामिनाचा आधार घेऊन किती वर्षे मुक्त राहता येते? अणि ही सोय आहे तर आपल्या इथे लोक तुरुंगात का खितपत पडलेत? सगळेच बाहेर का नाही येत? आणि अपराध जर गंभीर असेल तर लगबगीने त्यासंबंधित खटल्यांचा निकाल लावता येत नाही का?
इथे तर असे दिसतेय की एखाद्याने केवळ भावनेच्या भरात माथे भडकुन कोणाचा खुन केला तर त्याच्या खटल्याचा निकाल लगोलग लागुन तो कायमचा कारावासात जातो. याउलट ज्या लोकांनी समाजविघातक कामे केलीत आणि काही कोर्टांमध्ये त्याबद्दल त्यांना शिक्षाही झालीय ते लोक जामिनावर बाहेर मोकळे राहतात, हवे ते आयुष्य जगतात आणि त्यांच्यावरच्या खटल्यांचा निकाल वर्षोनुवर्षे लागतोयच. धन्य ती भारतीय न्यायव्यवस्था आणि हे सगळे पाहणारी अगतिक जनता!!!
<<जामिनावर सुटुन आल्यानंतर
<<जामिनावर सुटुन आल्यानंतर खटला लांबविणे आणि त्या दरम्यान निवडून येणे, आपल्याविरूद्ध असलेले साक्षीदार साम दाम दंड भेद इ. युक्त्या वापरून फितविणे आणि मानाची पदे मिळवून एखाद्या विजयी वीराच्या थाटात चैनीत उर्वरीत आयुष्य जगणे ही या मंडळींची Modus Operandi आहे.>> पूर्ण अनुमोदन
साधना, तुमच्या पोस्टशी अंशतः
साधना, तुमच्या पोस्टशी अंशतः सहमत आहे.
सगळेच गुन्हे जामीनपात्र नसतात. खुनाच्या आरोपीला सहसा जामीन मिळत नाही.(डॉ नूपुर तलवार हे ताजे उदाहरण) संजय दत्तवर जोवर टाडाअंतर्गत आरोप होते तोवर त्याला जामीन मिळाला नव्हता. टाडा कोर्टाने त्याला या कायद्याअंतर्गत असलेल्या आरोपांत निर्दोष ठरविले. तोवर तो सक्तमजुरीची शिक्षा भोगत होताच.आता त्याच्यावर अवैध रित्या हत्यारे बाळगल्याचा आरोप आहे जो जामीनपात्र आहे.
<इथे तर असे दिसतेय की एखाद्याने केवळ भावनेच्या भरात माथे भडकुन कोणाचा खुन केला तर त्याच्या खटल्याचा निकाल लगोलग लागुन तो कायमचा कारावासात जात<> तुम्ही त्या कुप्रसिद्ध प्रकरणाबद्दलच बोलत असाल तर भावनेच्या भरात माथे भडकते तसेच खिशात पिस्तुलही पैदा होते का? भावनेच्या भरात खून गळा दाबून, एखाद्या वस्तूने प्रहार करून होईल. तसेच त्या व्यक्तीने आपल्याला झालेल्या शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते का याची कल्पना नाही.
अनेक सामान्य गुन्हेगार लहानसहान गुन्ह्यांसाठी तुरुंगात खितपत पडलेले असतात हे मत्र सत्य आहे. ज्या आरोपींना होऊ शकणार्या शिक्षेच्या मुदतीपेक्षा जास्त वेळ खटला प्रलंबित राहून/उभाच न राहिल्याने ज्यांनी तुरुंगात घालवला अशा आरोपींची सरसकट सुटका करावी असा आदेश न्यायालयाने दिल्याची बातमी वाचल्याचे आठवते.
तुमच्या पोस्टमधील शेवटच्या वाक्याशी सहमत आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी म्हण उगाचच पडलेली नसावी.