Submitted by अवल on 13 May, 2012 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तोंडली १० ते १२
दाण्याचे कूट
३ हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीप्रमाणे
दही वाटीभर
फोडणीसाठी २ चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
चिमुटभर हिंग
४-५ कढिपत्त्याची पाने
कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
तोंडल्याची दोन्ही बाजुची टोकं काढून ४ भाग करुन घ्यावेत.
ग्राईंडरमध्ये तोंडल्याचे तुकडे, मिरच्या भरड वाव्यात. अगदी जाडसरच ठेवावे.
आता हे कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवावे.
कुकर गार झाल्यावर त्यात दही, मीठ, साखर, कोथिंबीर, दाण्याचे कूट घालावे. वरुन जिरे, हिंग, कढिपत्त्याची फडणी द्यावी.
तयार आहे तोंडल्याची कोशिंबीर.
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
अधिक टिपा:
काकडीच्या कोशिंबीरीसारखीच चव लागते. तोंडलीची भाजी मुलं खात नाहित, किंवा काकडी मिळत नाही तेव्हा जरुर करुन बघा
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरडलेली
भरडलेली तोंडली
![1336902933866.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/1336902933866.jpg)
साहित्य
![1336902966147.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/1336902966147.jpg)
तोंडल्याची कोशिंबीर
![1336902995959.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/1336902995959.jpg)
मस्तच! मला तोंडली फार
मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तोंडली फार आवडतात. पण इथे ताजी मिळत नाहित आनि फ्रोझन तोंडल्यांची भाजी छान नाही लागत. आता त्यांची अशी कोशिंबीर करुन बघते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! मस्त रेसिपी. घरात
अरे वा! मस्त रेसिपी. घरात आहेत तेव्हा नक्की करून बघणार.
छान प्रकार. तोंडली मला पण
छान प्रकार.
तोंडली मला पण आवडतात. बर्याच दिवसात खाल्ली नाहीत.
(तोंडली ठेचून ती लसूण आणि लाल मिरच्यांवर परतलेली भाजी, खास आवडती)
मस्तच!
मस्तच!
हा नवीनच दिसतोय प्रकार.......
हा नवीनच दिसतोय प्रकार....... करुन बघायला हवा !
हा नवीनच दिसतोय प्रकार.......
हा नवीनच दिसतोय प्रकार....... करुन बघायला हवा !
तोंडली भरड वाटून घेतली नाहीत
तोंडली भरड वाटून घेतली नाहीत तरी चालतात. देठ काढून अक्खी तोंडली शिजवायची आणि नंतर ती mash करायची . हि कोशिंबीर खूप मस्त लागते.
तोंडली भरड वाटून घेतली नाहीत
तोंडली भरड वाटून घेतली नाहीत तरी चालतात. देठ काढून अक्खी तोंडली शिजवायची आणि नंतर ती mash करायची . हि कोशिंबीर खूप मस्त लागते.>>> अगदी अगदी. शिजवुन मग ठेचायची. यात थोडा चाट मसाला पण टाकल्यास मस्त चव येते.
ज्याना कच्ची तोन्डली आवड्तात
ज्याना कच्ची तोन्डली आवड्तात त्यानी किसून करून पाहा...बाकी साहित्य वरचीच
मि कालच केली , खुप मस्त
मि कालच केली , खुप मस्त रेसीपि
धन्यवाद !
छान आहे रेसिपी! परतलेल्या
छान आहे रेसिपी!
परतलेल्या तोंडल्यांच्या कुरकुरीत काचर्या / चकत्या घुसळलेल्या दह्यात घालून देखील एक वेगळे तोंडीलावणे तयार होते. दह्यातील कुरकुरीत भेंडीप्रमाणे.