३ मध्यम बटाटे. उकडून, साले काढून फोडी केलेले किंवा न उकडता काचर्या.
१ पातीचा कांदा, पातीसह. कांदा फार मोठा नको. पात कोवळी असावी. कांद्यासह बारीक चिरुन घ्यावी.
१ चमचा वाटलेले/किसलेले आले.
१ हिरवी मिरची बारीक चिरुन.
मोहरी, जिरे, बडिशेप - प्रत्येकी १ लहान चमचा. (२ चमचे पंच फोडण चालेल. मेथी-कलौंजी पण येईल, हरकत नाही.)
१ चमचा धणे - खरंगटून. अगदी पूड नको.
अर्धा चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा साखर
१-२ चमचे तेल
१ चमचा लिंबाचा रस.
मीठ
थोडी कोथिंबीर चिरुन.
पसरट भांड्यात किंवा पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे.
हिंग घालावा.
मोहरी-जिरे-बडिशेप (किंवा पंच फोडण) आणि धणे फोडणीत घालावे.
आले, मिरच्या, हळद घालावी.
आले-मिरच्या थोड्या परतून घ्याव्या.
मग पात आणि कांदा घालून नीट परतावे. पात चांगली परतली गेली पाहिजे.
मग बटाट्याच्या फोडी, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून वाफ काढावी.
काचर्या असतील तर वाफेवर शिजवाव्यात.
वरुन कोथिंबीर घालून वाढावी.
पातीच्या कांद्याऐवजी ताजी मेथी, कसुरी मेथी, सुका पुदिना, शेपू यातले काहीही चालेल.
ही पद्धत 'नेहमीचीच, वेगळी, नवीन, सोप्पी, यम्मी, नो खस्ता, खस्ता' की कशी ते तुम्ही ठरवा.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
पातीचा कांदा कधी वापरला
पातीचा कांदा कधी वापरला नव्हता, नाहीतर ही भाजी माझी लहानपणापासून आवडती !!
मस्तच ( बाकी काही विशेषणे
मस्तच ( बाकी काही विशेषणे लावत नाही ) नक्की करुन बघणार.
तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला
मस्तच! करून बघणार.
मस्तच! करून बघणार. दोश्यामध्ये घालायला पण चांगलीये.
तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला >> +१
दोश्यामध्ये घालायला पण
दोश्यामध्ये घालायला पण चांगलीये. >> मला पण हेच वाटलं एकदम
सोपी, लहान मुलांना आवडणारी हे लावले विशेषणं
मस्त वेगळी,सोप्पी
मस्त वेगळी,सोप्पी ,यम्मी..........रेसिपी
दोश्याचे पीठ तयार आहे, आजच करेन ही भाजी.
मस्त दिस्तेय! करुन पाहणार!!
मस्त दिस्तेय!
करुन पाहणार!!
लोला , भाजी तर एकदम झकास
लोला , भाजी तर एकदम झकास सोबत पुरी पाहीजेल
मस्तच!
मस्तच!
पातीचा कांदा घालून केली
पातीचा कांदा घालून केली नव्हती कधी. आता करून पहावी म्हणतो!
मस्त. करको देखेंगा. खसखस
मस्त. करको देखेंगा. खसखस वाटून लावली तर आलू पोश्तो? की बोलछे दीदी?
>> तुझ्या सगळ्या रेसिपीजचे
>> तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला
+१
धन्यवाद. कधीतरी करुन खाऊन पण
धन्यवाद.
कधीतरी करुन खाऊन पण बघा.
अमामी, बघा लावून. पण ही कोरडी भाजी आहे, तेव्हा भाजून कोरडीच वाटा.
बिनधास्त प्रयोग करायचे हो. काही वाईट लागत नाही. खाणेबल तरी होईलच, फुकट जाणार नाही. फारच आवडले तर पुन्हा केले जाईल.
जरा स्ट्राँग फ्लेवर असलेली कुठलीही हिरवी पाने चालतील पातीऐवजी. लसणीची पात, थाई बेसिल, ऑरेन्ज-मिन्ट बेसिल, थाईम, टॅरॅगॉन, ओव्याची पाने इ.
मस्त दिसतेय... Pihu च वाचून
मस्त दिसतेय...
Pihu च वाचून आठवल माझ्या फ्रिजमध्येपण डोसा पीठ आहे. विसरून गेले होते डोसा पीठ. धन्यवाद Pihu.
डोसाबरोबर ही भाजी लवकरच करावी लागेल.
मस्त, ही भाजी मी ब्रेड मधे
मस्त, ही भाजी मी ब्रेड मधे भरुन सन्ड्विच करणार.
अरे वा, इंटरेस्टींग .. सोपी
अरे वा, इंटरेस्टींग .. सोपी पण बघण्यात्नक्कीच करेन ..
मस्त! बडिशेपा ने आणि कांदा
मस्त! बडिशेपा ने आणि कांदा पातीने चव वेगळी येईल. नेहमीची तीच तीच भाजी खाउन कंटाळा येतो. तेव्हा ही जरा वेगळी भाजी पुरी बरोबर छान लागेल.
फोटू सह्हीये... कृती पण
फोटू सह्हीये... कृती पण सोप्पी वाटतेय, करून खादडण्यात येईल. थँक्स.
वाहवा, आज ही भाजी करून, खाऊन
वाहवा, आज ही भाजी करून, खाऊन फस्त केली. भारी झाली होती चवीला.
छान!!
छान!!