Submitted by सीमा on 8 May, 2012 - 13:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बेसिक रेसीपी साठी :उडदाची डाळ १ वाटी
ऐनवेळी :
चवीनुसार तिखट किंवा हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
दही लागेल तस
फोडणीचे साहित्य
कांदा हवा असेल तर
क्रमवार पाककृती:
डांगराची कृती फार सोपी आहे. आजी ,आई भाज्या कमी मिळायला लागल्या कि नक्की करायच्याच.
डाळ तयार करुन ठेवली कि बाकी आपण ऐनवेळी काय मिक्स करु तसे. मेतकुटासारखे.
उडदाची डाळ स्वच्छ धुवून , कापडावर पसरुन कोरडी करुन घ्यावी. नंतर मंद आचेवर भाजुन घ्यावी. (चकलीच्या भाजणीसारखे)
मिक्सर मधुन रवाळ दळावी.
ऐनवेळी लागेल तेव्हा , त्यात दही घालून मिश्रण तासभर भिजवावे. कांदा,कोथिंबीर ,मीठ,तिखट घालून कालवून फोडणी घालावी.
डांगर तयार.
वाढणी/प्रमाण:
खाल तसे
अधिक टिपा:
आठवेल तशी रेसीपी लिहिलीये. आईला विचारुन आणखी काही बदल असले तर लिहिन.
माहितीचा स्रोत:
आजी , आई, सांगली जिल्हा :)
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असं आहे होय. मला वाटले
असं आहे होय. मला वाटले पोह्याचे पापड करताना करतात ते डांगर आहे.

चांगलं दिसतय
ह्या प्रमाणे मी मेतकूट+तिखट+कांदा+ताक/दही असं मिक्स करुन खातो मस्त लागतं.
कित्ती गुणाची बाय तू सीमा.
कित्ती गुणाची बाय तू सीमा. माझी आई पण सांगलीची म्हनजे मग तिची रेसिपी पण अशीच असणार यात काही वादच नाही.
मनापासून धन्यवाद!
आता ह्या विकेंडलाच डांगर कालवणार.
आता ते भडंगाची रेसिपी लिहाय्चं पण घे की मनावर
आणि मॅक्स मेतकूटापेक्षा डांगर
आणि मॅक्स मेतकूटापेक्षा डांगर जास्ती मस्त लागतं हे मा वै म.
आईग्ग्ग मी अगदी आजच खाल्लं
आईग्ग्ग
मी अगदी आजच खाल्लं डांगर
माझं जीव की प्राण आहे
आधी कळाल असत तर फोटो काधुन ठेवला असता इथे टाकायला
मेतकुटात दही ट्राय नाही केलं कधी
पाहिन हे पण खाऊन
मेतकुटात दही कालवुन वरुन
मेतकुटात दही कालवुन वरुन फोडणि की झाली झटपट चटणी!..
सीमा! क्रुती सही..फोटो हवा होता.
एवढी सोपी असते? धन्यवाद सीमा.
एवढी सोपी असते? धन्यवाद सीमा.
उगाचच विकत आणत होते म्हणजे.
आमच्याकडे पण सेम डांगर. फक्त
आमच्याकडे पण सेम डांगर. फक्त कांदा मस्ट होता. आता केलेच पाहिजे.
आमच्याकडे पण सेम कांदा -
आमच्याकडे पण सेम कांदा - कोथिंबीर मिरची व दही, वरून फोडणी. नुस्ते खायला पण मस्त लागते. म्हणजे गप्पा मारत मारत.
मला डांगर म्हणजे हे वाटलं
मला डांगर म्हणजे हे वाटलं

खुप वर्षात केलं किंवा खाल्लं
खुप वर्षात केलं किंवा खाल्लं नाही. छान प्रकार.
हे हे. विदर्भात डांगर म्हणजे
हे हे.
विदर्भात डांगर म्हणजे एक फळ आहे. केशरी रंगाचे मिळते ते. कलिंगड वाल्यांच्या गाडीवर असते ते. (मस्कमेलन - Musk melon म्हणतात इंग्रजी मध्ये!) त्या फळाला माझ्या सासरी चिबूड म्हणतात.
(श्री यांनी दिलेल्या फोटोत तो भोपळा वाटतोय!)
लग्न करून सासरी आल्यावर कळले की कोकणस्थांच्यात डांगर म्हणजे पोह्याचे पापड ज्यापासून बनवतात ते पीठ. हे पीठ मूळात कसे बनवतात माहीत नाही. आमच्या इथे रेडी पीठाचे पाकीट किंवा घरगुती बनवलेले रेडी पीठ मिळते. त्यात पाणी + मीठ + कच्चे गोडेतेल घालून आम्ही डांगर कालवतो. तिखटजाळ असेल तर बेस्ट लागते. पानात वाढून घेताना पुन्हा थोडे कच्चे तेल वरतून घालायचे.
खान्देशात डांगर म्हणजे खरबुज.
खान्देशात डांगर म्हणजे खरबुज. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घागरीवर ठेवायला लागतच.
ही रेसीपी भारी दिसतेय. कधीच ऐकलं नव्हतं याविषयी.
खरबुज >>> करेक्ट! मला नावच
खरबुज >>>
करेक्ट! मला नावच आठवत नव्हतं या फळाचं कधीपासून
डांगर! अत्यंत आवडता प्रकार..
डांगर! अत्यंत आवडता प्रकार.. मात्र कच्चा कांदा मस्ट.
धन्यवाद.
वरच्या फोटोतल्या फळाला आमी
वरच्या फोटोतल्या फळाला आमी लाल भोपळा म्हणतो. आ तुन केशरी किंवापिवल्ळा असतो तो.
झाली व्हती का?
याआधी यावर खूप चर्चा माबोबर झालेली आहे असे मला का बरे वाटून राहाल्येय ?
मस्त! कांदा मस्ट!! जेवढे
मस्त! कांदा मस्ट!! जेवढे मुरते तेवढे झकास लागते.
भाजलेल्या डाळीत अजूनही
भाजलेल्या डाळीत अजूनही मालमसाला असतो नं?
डांगर - लालभोपळा वेगळा, चिबूड वेगळे आणि खरबूजही वेगळे.
थोडेसे विषयांतर, पोह्याचे
थोडेसे विषयांतर,
पोह्याचे डांगर हे थोडेसे मजबुरीमधून घडते.
पोह्याचे पापड करताना, पोहे भाजून सर्व पिठात तिखट, मीठ, हिंग व क्वचित पापडखार घालतात. पण त्यापैकी
जवळ जवळ अर्धे कोरडे पिठ पापड लाटण्यासाठी म्हणून बाजूला ठेवावे लागते.
९ पेले पिठ असेल तर ४ पेले बाजूला ठेवतात.
मग एक एक पेला पिठ खलबत्यात घालून त्यावर आधणाचे पाणी ओतून कूटतात व त्याचे भराभर पापड
लाटावे लागतात. ते पिठ गरम असतानाच लाटावे लागतत नाहीतर पिठाला विरी जाते. पाणी जास्त झाले तर
जास्तच पिठ लाटतेवेळी लागते. पण नेहमी करणार्या बायकांना तेवढे पिठ लावावे लागत नाही आणि कोरडे पिठ
बरेच उरते. त्याचे डांगर करतात.
हे पापड फारच भरभर लाटावे लागतात, छोटे छोटे पापड लाटण्यात बराच वेळ जातो म्हणून मग एक मोठी
पोळी लाटून तिचे शंकरपाळे कापतात. त्यांना मिरगुंड म्हणतात.
लालभोपळ्याला ही डांगर म्हणतात
लालभोपळ्याला ही डांगर म्हणतात का कुणाकडे?
दिनेशदा, कसे काय सगळेच माहीत असते तुम्हाला?
हो नाशिक मालेगाव बाजुला लाल
हो नाशिक मालेगाव बाजुला लाल भोपळ्याला डांगर म्हणतात. आम्ही काशीफळ/लालभोपळा म्हणतो.
पण हे वरचे डांगर तोंपासुच. फक्त उडदाच्या डाळीबरोबर चमचा चमचा मुगडाळ्/हरभराडाळ घालतो आम्ही. कांदा कोथिंबीर मस्टच.
निंबूडा, माझ्या मेमरीला
निंबूडा, माझ्या मेमरीला बहुतेक ड्रेनेज सिस्टीम नाही. एकदा वाचलेलं राहतं लक्षात.
उडीद स्वच्छ धुवून वाळत ठेवले
उडीद स्वच्छ धुवून वाळत ठेवले आहेत.
>> कोकणस्थांच्यात डांगर
>> कोकणस्थांच्यात डांगर म्हणजे पोह्याचे पापड ज्यापासून बनवतात ते पीठ.
निंबुडा, कुठल्याही पापडाच्या भिजवलेल्या पिठाला डांगर म्हणतात.
सीमा, छान रेसिपी. नक्की करून बघणार.
कुठल्याही पापडाच्या
कुठल्याही पापडाच्या भिजवलेल्या पिठाला डांगर म्हणतात >>> होय का? आमच्याकडे मी कायम पोह्याचे पाहिले/ ऐकले आहे. त्यामुळे तसा समज झाला.
लहानपणीची अनेक जेवणे डांगरावर
लहानपणीची अनेक जेवणे डांगरावर सरलेली आहेत. गावच्या मातीतला खाद्यपदार्थ असे म्हणावे लागेल.
वाळले, भाजले आणि दळले आहेत
वाळले, भाजले आणि दळले आहेत ....उडीद!
मला पार्सल पाठव मग
मला पार्सल पाठव मग
आमच्याकडेही करतात उडदाचं
आमच्याकडेही करतात उडदाचं डांगर. पण मला अजिचबात आवडत नाही. कोकणातून तयार पीठच येतं. आईला दळताना पाहिलेलं नाही कधी. कच्चा कांदा, मिरच्या, कोथिंबीर, वरुन फोडणी हीच रेसिपी.
याआधी यावर खूप चर्चा माबोबर
याआधी यावर खूप चर्चा माबोबर झालेली आहे असे मला का बरे वाटून राहाल्येय ? झाली व्हती का?>> हो!
प्रॅडी तूच इथे खायला. सायो,
प्रॅडी
तूच इथे खायला.
सायो, मी पण आईला दळताना नाही पाहिलं कधी कारण आज्ज्यांकडूनच आयतं पीठ यायचं ना !
Pages