प्रत्येकी एक लाल,पिवळी,हिरवी सिमला मिरची.
१ मध्यम कांदा.
१ मध्यम टोमॅटो.
१०० ग्रॅम पनीर.
२ टेबलस्पुन कॉर्नफ्लोअर.
१ ईंच आले किसुन.
२ लसुण पाकळ्या बारीक चिरुन.
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली.
पाव टीस्पुन तिखट.[हे आवडीप्रमाणे वाढवले तरी चालेल.]
३ टेबलस्पुन तेल.
जिरे-मोहोरी दोन्ही मिळुन अर्धा चमचा.
हिंग पाव चमचा.
मीठ चवीनुसार.
१ लहान चमचा धनेपुड.
२टेबलस्पुन टोमॅटो केचप .
पाउण वाटी पाणी.
सिमला मिरचीतल्या बिया काढुन फोडी करुन घ्या.
कांदा व टोंमॅटो च्याही बेताच्या फोडी करुन घ्या.
कांद्याच्या फोडीच्या पाकळ्या सुट्या करुन घ्या.
पनीर लांबट आकारात कापुन घ्या.
कढईत तेल तापत ठेवावे.
१ चमचा कॉर्नफ्लोअर मधे पनीरचे तुकडे घोळवुन ,मंद आचेवर ,हलके गुलाबीसर होईपर्यंत तेलात तळुन घ्या.किंचित पिवळसर गुलाबी रंग आला कि पनीरचे तुकडे लगेच काढुन घ्या.तसेच एकावेळी ३-४ तुकडेच तळा.
ही या भाजीची प्राथमिक तयारी आहे.
आता उरलेल्या तेलाची मोहोरी-जिरे व हिंग घालुन फोडणी करा.
त्यात हिरवी मिरची,लसुण,किसलेले आले व कांदा घाला.परता.कांदा कच्चा असतानाच चिरलेल्या मिरच्या व टोमॅटो च्या फोडी,तळलेले पनीर घाला.तिखट,मीठ,धनेपुड घाला एक वाफ येवु द्या.यासाठी २ मिनिटे झाकण ठेवुन पुरतील.कारण मिरची अर्धकच्ची राहिली पाहिजे.
आता उरलेले कॉर्नफ्लोअर पाण्यात कालवुन ते पाणी भाजीत घाला.टोमॅटो केचप घाला.भाजी ढवळा.कॉर्न-फ्लोअर लगेच शिजते.
२-३ मिनिटात थोडीशी रसदार अशी भाजी तयार होईल.
ही अशी दिसली तयार झालेली भाजी..
चिली-पनीर करण्यासाठी भाजीची तयारी केली होती.पण काल घरी जेवायला आलेल्या दोघा मध्यमवयी आप्तांपैकी एकाना सोया सॉस /चिली सॉस वर्ज होते पण टोमॅटो केचप चालणार होते.त्यामुळे सिमला मिरचीची ही भाजी आवडली.हिंग-जिरे-धणेपुड ची किंचित चव मस्त लागली.ही भाजी तिखट,मसालेदार ही नव्हती सौम्य चवीची पण आलेल्यांसाठी वेगळ्या चवीची झाली होती.त्यामुळे इथे लिहीण्याचा प्रयास केला आहे.
हलके गुलाबीसर होईपर्यंत तेलात
हलके गुलाबीसर होईपर्यंत तेलात तळुन घ्या.किंचित पिवळसर गुलाबी रंग आला कि पनीरचे तुकडे लगेच काढुन घ्या>>> म्हणजे नक्की कोणता रंग येऊ द्यायचा? पिवळा की गुलाबी?
फोटो एकदम मस्त दिसतो आहे.
छान कृती. फोटो पण मस्त.
छान कृती. फोटो पण मस्त.
मंजुडी, काय हे ! तू असा
मंजुडी,
काय हे ! तू असा प्रश्न विचारावा का?
मला सांगायचे आहे कि पनीर अगदी थोडा वेळ -पिवळसर व किंचित गुलाबीसर रंग येईल इतकेच तळा मी नेमकी भाषा /नेमके शब्द चुकले.
सुलेखा, काय हे! त्या
सुलेखा,
काय हे! त्या वाक्यापुढचा स्मायली नाही का नोट केला?
ह्यालाच जालफ्रेजी म्हणत नाहीत
ह्यालाच जालफ्रेजी म्हणत नाहीत का? ती जरा कोरडी असते.