Submitted by मंजूताई on 7 May, 2012 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धी वाटी मूगवड्या, वाटण (२ कांदे, ५-६ पाकळ्या लसूण, अर्धी वाटी किसलेलं सूक खोबरं, अर्धा चमचा जिरे), चवीनुसार मीठ, तिखट, पाव छोटा चमचा गरम मसाला (लवंग, दालचिनी, काळेमिरेची बारीक पूड) २ मोठे चमचे फोडणीसाठी तेल, सजावटीसाठी कोथिंबीर
http://farm8.staticflickr.com/7089/7005330462_650219b118.jpg"
width="360"
क्रमवार पाककृती:
कृती: कढईत मूगवड्या बारीक करुन थोड्या तेलात परतून घ्या. त्याच कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर वाटलेला मसाला टाकून तेल सुटपर्यंत चांगले परतून घ्या. त्यात परतलेल्या मूगवड्या व गरम मसाला व तिखट टाका. थोडे परतल्यावर तीन वाट्या पाणी टाकून मंद आचेवर शिजू द्या. शिजत आल्यावर मीठ टाकावे. कोथिंबीर टाकून सजवावे. कोण्त्याही भाकरी बरोबर ही भाजी छान लागते.
वाढणी/प्रमाण:
आवडीनुसार
अधिक टिपा:
काही नाही
माहितीचा स्रोत:
बहीण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्स्स........ कित्ती युगं
स्स्स........ कित्ती युगं लोटलीयेत ही भाजी खाऊन...
मस्त तोंपासु दिस्तीये...
माझीपण आवडती भाजी. या वड्या
माझीपण आवडती भाजी.
या वड्या घरी करायचा उद्योग करतो मी, आणलेल्या पुरत नाहीत.
मंगोडीची भाजी मलाही आवडते.मी
मंगोडीची भाजी मलाही आवडते.मी याच पद्धतीने करते.उन्हाळा स्पेशल ,"ऐन वेळी "कामी येणारी भाजी आहे.
छान, थोडा चिंचेचा कोळ आणि गुळ
छान, थोडा चिंचेचा कोळ आणि गुळ घालूनही छान लागते ही भाजी.
पावसाळ्यासाठीची सोय असायची ही पुर्वी
विदर्भात मुगवडी घरोघरी केली
विदर्भात मुगवडी घरोघरी केली जाते. खास पावसाळी सोय आहे ही.
मूगवड्या विकत मिळतात का?
मूगवड्या विकत मिळतात का? कुठे?
या वड्या कशा करायच्या ?
या वड्या कशा करायच्या ?
अगदी योग्य वेळी दिलीस ही
अगदी योग्य वेळी दिलीस ही रेसिपी, मंजूडी. दोनच दिवसांपूर्वी बहिणीनं मूगवड्या पाठवल्यात. आता करीन. धन्यवाद.
मस्त आहे कृती. मूगवड्या आता
मस्त आहे कृती. मूगवड्या आता भारतातून येताना घेऊन येईन.
पिहू, मूगाची डाळ ५-६ तास
पिहू, मूगाची डाळ ५-६ तास भिजवायची उपसून जाडसर वाटावी. त्यात थोडेसे मीठ ऐच्छीक मसाले - धने/कोथिंबीर, जीरे वाटताना घालावे. छोट्या हाताने/कोन करुन(मेंदी) वड्या घालाव्या. कडकडीत उन्हात वाळवाव्या. वर्षभर टिकतात. फार कष्टाचे काम नाही. करुन बघायला हरत नाही. वड्या घालायचा कंटाळा आलातर वाटलेल्या डाळीचे मुंगपकोडे किंवा डोसे करावे मी जरा डाळ जास्तच भिजत घालते त्यादिवशीच्या नास्त्याची सोय होते.
मला मूगवड्या इंग्रो मध्ये
मला मूगवड्या इंग्रो मध्ये दिसल्या परवाच त्यामुळे लगेच एक पाकीट घेतल्या. आता ही भाजी करून पाहीन.
फोटो दिसत नाहिये. मुगवड्या
फोटो दिसत नाहिये.
मुगवड्या म्हणजे डाळिचे सांडगे का?
मंजु तै
मंजु तै मस्तच....भाजी....
ह्या रविवारीच मी ही भाजी केली होती
येस्स्स. माझ्या माहेरी हा
येस्स्स. माझ्या माहेरी हा आवडता प्रकार आहे. पण मला विशेष कधी आवडला नाही.
घरी याचा अपभ्रंशित उच्चार "मुगोडे" असा आहे. ते मूळात मूगवडे आहे हे आताच कळलं
काल केलि ही भाजी, मुगाच्या
काल केलि ही भाजी, मुगाच्या वड्या ऐवजी सांड्गे वापरले (दोन्हीत काही फरक आहे का माहीत नाही). पण मस्त झाली होती - रेसीपी बद्दल धन्स.....
मंजुताई, लिंकसाठी आभारी आहे.
मंजुताई, लिंकसाठी आभारी आहे. पुढच्या आठवड्यात करून पाहीन. अजून सांडगे बनवण्यापासून सुरुवात आहे. पण तुम्ही उत्साहाने लिंक दिल्यामुळे मला पण करायचा धीर आणि उत्साह आला आहे.
रस्त्यावर पापड विकतात ,
रस्त्यावर पापड विकतात , त्यांच्याकडे ह्याची पाकिटे मिळतात
10 रु ला असतात
आमच्याकडे म्हणजे माहेरी मिक्स
आमच्याकडे म्हणजे माहेरी मिक्स डाळींचे किंवा फक्त चनाडळीचे वडे करतात. सासर वैदर्भीय असल्यामुळे ह्या मुगवड्या पहिल्यांदा खाल्ल्या. मुगाच्या असल्यामुळे अंगची चव विशेष नसते फार. एका नातेवाईकांकडे नंतर खाल्ल्या त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित तळून आणि शिजवून घेतल्या नसाव्यात. नवऱ्याला आणि मला जुलाबाचा प्रचंड त्रास झाला. बारीक तुकडे करून तळणे आणि नीट शिजवून करावे.
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद मंजुताई.... रेसिपी
धन्यवाद मंजुताई.... रेसिपी सोपी व एक चांगला पर्याय वाटते आहे. नक्की करणार. आधी मुगवडी करावी लागेल पण. कडक ऊन पडण्याची वाट बघत आहे.
आज मागच्या वर्षीच्या मुगोड्या
आज मागच्या वर्षीच्या मुगोड्या संपवल्या... नॉनव्हेज झाली एकदम!
खरचं की मी वेज आहे पण मलाही
खरचं की मी वेज आहे पण मलाही वाटते आहे. कधी जाणार आभाळ आणि कधी करणार मी मुगवड्या
Ekdam..nonveg sarkhich distey
Ekdam..nonveg sarkhich distey..yummy..