Submitted by पुरंदरे शशांक on 4 May, 2012 - 23:46
मऊ मऊ ससेभाऊ
लांब लांब कान
गोरे गोरे पान
मऊ मऊ ससेभाऊ
कित्ती छान छान
टुण टुण उड्या
मारतात कसे
लोकरीचा बिंडा
दिस्तात तसे
लाल लाल डोळे
शेपूट इवलेसे
नाक कसे उडवतात
मधून जरासे
खातात लुबु लुबु
पाला हिरवागार
लाल लाल गाजरावर
मारतात ताव
गुब्बु गुब्बु ससेभाऊ
बसतात अंग चोरून
हात नका लाऊ
जातील दूर पळून....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
कडक
कडक
वॉव, कित्ती छान आहे ही कविता
वॉव, कित्ती छान आहे ही कविता अगदी ससा उड्या मारताना डोळ्यापुढे आला
गोंडस
गोंडस