मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.
आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.
फोटो मोबाईलवर काढल्याने क्लॅरीटी नसेल. तरी समजुन घ्या लोक्स!
आमच्याकडे व्हेजवाल्यांसाठी रविवारी हा पदार्थ असतो. पटकन होण्यासारखा कारण नॉनव्हेजींसाठी वाटलेला मसाला तयार असतो
डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे
मस्त आवडली. उन्हाळी रेसिपी.
मस्त आवडली. उन्हाळी रेसिपी. ईटीवीवर अशोक हांडेच्या बायकोने दाखवली त्यात भिजवून वाटलेल्या डाळीची भजी करुन रश्श्यात सोडली होती. ही पाकृ जास्त सोपी आहे नक्की करुन पाहीन.
मी केली होती आज डुबुकवडयांची
मी केली होती आज डुबुकवडयांची आमटी. जबरदस्त झाली होती. झणझणीत. रेसिपीसाठी थॅंक्स मी_आर्या
सह्हीये! लवकरच प्रयोग करण्यात
सह्हीये! लवकरच प्रयोग करण्यात येईल! थँक्स आर्या.
ही डुबुकवड्यांची आमटी पाहून
ही डुबुकवड्यांची आमटी पाहून डोके फिरले आहे. बहुतेक उद्या बायकोला करायला लावीन हा प्रकार
मस्त ! नक्की करुन बघीन .
मस्त ! नक्की करुन बघीन .
फोटो छान आहेत...
फोटो छान आहेत...
आम्ही 'गोळ्यांची आमटी' म्हणतो
आम्ही 'गोळ्यांची आमटी' म्हणतो याला. मला फार आवडते.
हं आमच्याकडे पण गोळ्याची
हं आमच्याकडे पण गोळ्याची आमटीच म्हणतात वाट्टं
वेका,पजो

कुणाचं काय तर कुणाचं काय
मी केली आज. धन्यवाद
मी केली आज. धन्यवाद आर्या.
माझी चूक झाली. एकतर सध्या घरी मिक्सर नसतानाही करायला घेतली आणि दुसरी चूक म्हणजे पिठ पातळ झाले. त्यामुळे तुझ्याएवढी चांगली नाही झाली तरी अंदाज आला.
बिल्वा, कालचे तुझे पोस्ट पाहुन जाम सुरसुरी आली. तुलाही थँक्स.
आता हात धुवूनच लिहिते
आता हात धुवूनच लिहिते आहे..मस्त, सोपी आणि झणझणीत..
मी केली होती आज. मस्त रंग
मी केली होती आज. मस्त रंग येतो, चवही खासच. मी भाताबरोबर खाल्ली पण ब्रेडच्या स्लाईसबरोबर खावीशी वाटत होती. पुढच्या वेळेस तशीच खाणार. धन्यवाद
हा फोटो

पीठ आमटीमधे मिसळत नाही का??
पीठ आमटीमधे मिसळत नाही का?? म्हणजे विरघळून जाते का?
फोटोत तरी डुबुकवड्या नीट दिसत आहेत. पीठ किती घट्ट भिजवायचे?
करुन बघितली . मस्त झाली होती.
करुन बघितली . मस्त झाली होती.
लसुण , आलं केव्हा वापरायच ते
लसुण , आलं केव्हा वापरायच ते लिहिल नाही? आज केली ही भाजी, भाकरी व भाता बरोबर मस्त, चव चांगली होती. खाल्ल्यावर समाधान झाले.
कांदा कच्चा भाजला तर थोडा कडु होतो का?
मला सांगा इतका अख्खा मसाला
मला सांगा इतका अख्खा मसाला आणी त्याबरोबर गरम मसाला तिखट.. हे जास्त स्पायसी नाही ना होणार
फोटो तोंपासु आहे अगदी
आज केली होती. खूप मस्त झाली
आज केली होती. खूप मस्त झाली होती
हे आर्ये .....तुजप्रत कल्याण
हे आर्ये
.....तुजप्रत कल्याण असो!
काल डुबुकवड्यांची आमटी ओरपून सगळे तृप्त झाले. विशेषतः माझी पुतणी खूषच. रिपीट ऑर्डर आली आहे.
मस्त रेसिपी आर्या. आम्ही
मस्त रेसिपी आर्या.
आम्ही सीकेपी अशाच आमटीला वड्याचे सांबारे म्हणतो. फक्त त्यात चिंच आणि अगदी नावाला गूळ असतो.
>>>>> नाही गं अवल, वड्यांचं सांबारं वेगळं. त्यातल्या वड्या किती खटाटोपाच्या असतात. व्हेज व्हीआयपी पाहुण्यांना वड्यांचं सांबारं केलं जातं.
ही गोळ्यांची आमटी तर एकदम घरगुती आहे. पण मला व.सां.पेक्षा हीच आवडते. आमटीत गोळे करून सोडताना, हाताशी एका वाटीत थोडं पाणी घ्यावं. प्रत्येकवेळी हात ओला करून अगदी लहान लहान गोळे सोडावेत, ते लहान असतील तर आतून व्यवस्थित शिजतात आणि शिजून जरा मोठे होतातच.
गोळ्यांच्या आमटीत कांदा-सुक्या खोबर्याचा मसाला (तळला मसाला) घालतात तर व.सां. खसखसही घातली जाते.
क्लास. खुप छान. रेसीपी आवडली
क्लास.
रेसीपी आवडली आणि फोटो सुद्धा.
खुप छान.
नक्कीच बनवून पाहणार. धन्यवाद.
मसाल्याचा वास घरभर पसरला
मसाल्याचा वास घरभर पसरला की.....>> आईग्गं, कल्पनेनेच तोंपासु.
मलाही हाच प्रश्न आहे की आमटीत टाकल्यावर पीठ पसरत नाही का ?
नाही पसरत. आमटी उकळली की
नाही पसरत. आमटी उकळली की टाकायचं पीठ, मग ते भज्यांसारखं गोळा होतं.
मस्त पाककृती. धन्यवाद! आज
मस्त पाककृती. धन्यवाद!
आज करून खाल्ली. कोथिंबीर बाजारात. ती आणली की चिरून, रश्श्यात टाकून पुन्हा उकळी आणणार.
मस्त आला आहे फोटो...
मस्त आला आहे फोटो...
मृ, मस्त दिसतीये आमटी. रंग
मृ, मस्त दिसतीये आमटी. रंग खूप सही आलाय. माझा एवढा लाल रंग नाही आला. काही टीप असेल तर दे
स्नेहा, राखी, धन्यवाद! राखी,
स्नेहा, राखी, धन्यवाद!
राखी, काश्मिरी मिर्च्यांचं तिखट घातलंय वाटणाबरोबर. त्याचा रंग खरंच फार सुंदर येतो.
धन्यावाद आर्या.
धन्यावाद आर्या.
आजच केली होती. मस्त चव!
आजच केली होती. मस्त चव! धन्यवाद आर्या!
आज 'आसाख' मध्ये दाखवल्या
आज 'आसाख' मध्ये दाखवल्या डुबुकवड्या. रेसिपी थोऽऽडीशी वेगळी होती.
Pages