एकदा सगळ्या पक्ष्यांनी मिळुन काढला पक्ष
जमिन सोडु माणसांसाठी आभाळ करु लक्ष्य
उंच उंच उडणारे गरुड झाले अध्यक्ष
हळुच म्हणाले घारीला "तू होना उपाध्यक्ष!"
शहामृग म्हणालं "मित्रांन्नो! मला उडता येत नाही,
सांगा तुमच्या पक्षाचा मज उपयोग आहे काही?"
"सांगा उपयोग आहे काही?".....
शहामृगाला पक्षाचा केला त्यांनी सचिव
चिमण्या कार्यकरत्यांची आनंदे चिवचिव
कोंबड्या म्हणाल्या, "आमचं कसं कराल रक्षण?"
अध्यक्ष म्हणाले "काळजी नको, देतो आरक्षण"
शिंपी म्हणाला "पक्षाचे झेंडे देईन शिवुन"
सुगरणीच्या खोप्यात करा आराम मस्त जेउन
पिक पिक पेंग्वीन झाले सामिल असले जरी दुर
खंड्याही सामिल झाला पाण्यात मारत सुर्रर्रर्रर्र....
बदक, हंस म्हणाले
"मित्रांन्नो, आम्हीतर पाण्यात रहातो,
तळ्याकाठच्या सभांना भरभरुन येतो "
घुबड म्हणालं "रात्रीला देईन मी पहारा"
वटवाघुळांनो गस्त घालत तुम्ही चक्करा मारा
पोपट म्हणाला "पक्षाचा करेन मी प्रचार"
कोकीळ, बुलबूल गाण्यातुन माडंतील आपले विचार
कावळ्यानां देउ केलं घोषणा द्यायच काम
कबुतरांना मात्र हवा आरामच आराम
तेवढ्यात कुठुन तरी मोठ्ठा आवाज झाला (... धडाम....!!!)
तेवढ्यात कुठुन तरी मोठ्ठा आवाज झाला
पक्ष सोडुन पक्ष्यांचा थवा तो उडाला....
पक्ष सोडुन पक्ष्यांचा थवा तो उडाला....
-सत्यजित.
छान
छान कविता.
पण 'पक्षी' - पक्ष्यांना
पक्ष - पक्षांना..
चिन्मय...
चिन्मय... थॅक्स रे.. हे माझ्या लक्षात नव्हत आलं...
पक्ष सोडुन पक्षांचा थवा तो उडाला....
पक्षांचा पक्ष...ईथे पण हाच नियम लागु होतो का?
हो..पक्ष्या
हो..पक्ष्यांचा पक्ष असे हवे.
सत्यजित
सत्यजित नेहेमी प्रमाणे खूपच छान.....
मी शाळेत असताना आमचे एक सर होते त्यांना विचारले की तुम्ही कोणत्या पक्षाचे
तर ते म्हणायचे ( आकाशात बोट दाखवून) त्या......... उडणार्या....... पक्षाचे.........!
गोदेय........
मस्त आहे !
मस्त आहे !
लक्ष नव्हे
लक्ष नव्हे लक्ष्य!
>>शिंपी म्हणाला "पक्षाचे झेंडे देईन शिवुन"
सुगरणीच्या खोप्यात करा आराम मस्त जेउन
पिक पिक पेंग्वीन झाले सामिल असले जरी दुर
खंड्याही सामिल झाला पाण्यात मारत सुर्रर्रर्रर्र....>>
अगदी श्रमजीवी दिसतात सगळे. छानच!
छानच आहे.
छानच आहे.
कबुतरांना
कबुतरांना मात्र हवा आरामच आराम
अगदी अचुक. सत्या हा विभाग तुझाच बाबा.
हा हा...
हा हा... सर्वांचे मनःपुर्वक आभार..
चुका निदर्शनास आणून दिल्या बद्दल चिनू आणि चिन्मयचे विषेश आभार...
चिनु चिन्मय... मस्त नाव आहेत... चिनवरुन इंपोर्ट केल्या सारखी
कौतुक भाऊ आता जागुतई आहेत की बरोबर..
आवडला हा
आवडला हा पक्ष .. सत्याभाई आजकाल एकदम गाडी भरधाव सोडलीय हं
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
>>चिनवरुन
>>चिनवरुन इंपोर्ट केल्या सारखी
ए, मी चिन्नु आहे बरं. उगाच कायपण नावं नाय ठेवायची.